नोकरी आणि पकोडे

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture
डॉ. एस. पी. दोरुगडे in जनातलं, मनातलं
20 Feb 2018 - 10:45 am

ज्यांना तुम्ही सांगताय-
नोकरी नाही, तर रोजगार करा
मुद्रा योजनेतून कर्ज घ्या
आणि 'पकोडे' तळा!

ऐका, त्यांच्याकडे खऱ्या पदव्या आहेत
त्यांना खऱ्या नोकऱ्या हव्या आहेत
त्यांचे पालक त्यांच्यासाठी झिजलेत
त्यांच्या कष्टातून फीचे पैसे आलेत
त्यांचे स्वप्न चांगल्या नोकरीचे होते
हे नाही कि त्यांनी 'पकोडे' तळावेत!

त्यांच्या पदव्या हव्या तर डोळ्यांनी बघा
त्या खऱ्या असल्याबद्दल खात्री करून घ्या
या त्या पदव्या नाहीत की ज्यांवर
कोर्टात केसेस चालू आहेत
वा ज्या संशयास्पद आहेत
ज्यांबद्दल माहितीच्या अधिकारातही
माहिती दिली जात नाही!
ज्या मुळात आहेत का नाही तेच माहित नाही!

हे तेच लोक आहेत
जे खऱ्या शाळेत गेलेत
खऱ्या महाविद्यालयांत शिकलेत
खऱ्या विद्यापीठांनी यांना पदव्या दिल्यात
(ज्ञानेश्वर विद्यापीठाने नव्हे!)

यांच्या शिक्षणाची पूर्ण नोंद आहे
यांनी परीक्षेत मेहनत केलीय
दिवसरात्र अभ्यास केलाय
त्याशिवाय का त्यांना नोकऱ्या मिळतात!
ज्यांना तरीही मिळत नाहीत,
आपण त्यांच्याविषयी बोलतोय!
स्वयंरोजगाराबद्दल नव्हे!
कि जो केला जातो नाईलाजास्तव
आला दिवस ढकलण्यासाठी!
चांगली नोकरी मिळवणं, प्रगती करणं
हे स्वयंरोजगाराहून भिन्न असतं!

यांनी खऱ्या विषयांमधून पदव्या प्राप्त केल्यात
पदव्युत्तर पदव्याही खऱ्याच विषयांत मिळवल्यात
हे ते खोटे चहा विकणारे नाहीत,
त्या चालूच न झालेल्या रेल्वे स्थानकावरचे!
किंवा जेथे फक्त दोन गाड्या थांबतात!

बोलण्याआधी थोडा विचार करा!
नोकरी म्हणजे काय,
रोजगार म्हणजे काय
सारे आधी नीट जाणून घ्या!
स्वतःचे अपयश झाकण्यासाठी, कृपया,
उच्चशिक्षितांना, 'पकोडे' तळावयास सांगू नका!

*अनुवाद-* डॉ. एस. पी. दोरुगडे
*मूळ लेखक-* विनोद चंद

धोरणविचारलेख

प्रतिक्रिया

याला अनुवाद म्हणता येणार नाही, कारण..
''ज्ञानेश्वर विद्यापीठाने नव्हे!'' ही अकारण टिप्पणी आहे. तिथे एकदा नक्की भेट द्या असे सुचवतो.
दर्जाच काढायचा तर अनेक मान्यताप्राप्त महाविद्यालयं त्याहून सुमार आहेत. ज्ञानेश्वर विद्यापीठ 'आम्ही लय भारी' म्हणून सांगायला जात नाही.
बाकी रोख शिक्षणमंत्री यांच्याकडे असेल तर शुभेच्छा. आम्हाला राजकीय चर्चांचा कंटाळा येतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Feb 2018 - 11:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पकोडे तळायचेच तर डिग्री कशाला ? सालं लै वाईट आहे.
पोरांना शिकवू की नये अशी अवस्था झाली आहे.

-दिलीप बिरुटे

आमच्या इथे एक पकोडेवाला आहे, दिवसाला दहाहजाराचा धंदा आहे शिवाय कर भरत नाही ही गोष्ट वेगळीच. आता बोला.

चांदणे संदीप's picture

20 Feb 2018 - 12:14 pm | चांदणे संदीप

जाऊन पाहून (खाऊन) येतो ;)

Sandy

प्रचेतस's picture

20 Feb 2018 - 12:53 pm | प्रचेतस

चापेकर चौकात हातगाडी आहे. :)

जेम्स वांड's picture

20 Feb 2018 - 1:12 pm | जेम्स वांड

सध्या चापेकर चौकात जितके पकोडेवाले आहे, त्याच्या दसपट झाले तर त्यापैकी प्रत्येक पकोडेवाल्याचा दिवसाचा गल्ला उरेल का तितका? पकोडे तळणे लुक्रेटिव्ह वगैरे नाहीये इतकं मान्य करायला हरकत नसावी

कपिलमुनी's picture

20 Feb 2018 - 1:44 pm | कपिलमुनी

भजी तळून दिवसाला १०,००० मिळतात म्हणजे एखाद्या शिक्षणाची असलेल्या मुलाने महिना ३०,००० ची युनिवर्सिटी फेलोशिप सोडून भज्या तळत बसाव्या ?

भज्या वडे तळणे वाईट नाही , पण सर्वसामान्य आवडीच्या क्षेत्रात जॉब उपलब्ध असावेत एवढीच अपेक्षा !

नाखु's picture

20 Feb 2018 - 3:20 pm | नाखु

आपण घेतलेल्या शिक्षणाचं "भजं"होऊ नये अशीच माफक अपेक्षा!!!

नित्य भजे रामास निमित्य भजे खाण्यास संघाचा संसारी सामान्य सदस्य नाखु पांढरपेशा

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Feb 2018 - 4:49 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

खरे आहे. फक्त पैसाच श्रेष्ठ असा मानणारा समाज पूर्वी माफक प्रमाणात होता. आता मध्यम-उच्च मध्यम वर्गातही ती विचारधारणा आहे.
त्यात आपल्या कुडमुड्या अर्थव्यवस्थेने 'पेश्शल वडापाव,खमंग भजी' विकणार्यांना गब्बर केले.. व एम.एस.सी/बी.ई. करणारे नोकरीसाठी वणवण फिरू लागले.

manguu@mail.com's picture

20 Feb 2018 - 5:57 pm | manguu@mail.com

भायखळा ईस्टला वडापाव स्टॉल आहे.

ग्रॅज्युएट वडापाव

नोक्री न मिळाल्याने त्याने वडापावचे दुकान काढले म्हणे.

Vada

गेले काही दिवस 'पकोडे बनाना' यावर बरेच चर्वित चर्वण होत आहे. वानगी दाखल दाखल काही उदाहरणे द्यायचा मोह टाळता येत नाही.
सर्व प्रथम पकोडे तळणे वाच्यार्थाने न घेता 'लक्ष्यार्थाने' घ्या.
१) माझ्या माहितीतील एक बाई स्वयंपाक पाणी, धुणी भांडी (मुंबईच्या भाषेत 'झाडू पोता') ही कामे करतात. दोन्ही मुलांचे पदवी पर्यंतचे शिक्षण या कमाईवरच पूर्ण केले.
२) माझ्या घरी वायरिंग अथवा तत्सम कामे करायला एक इलेक्ट्रिशियन गेली अनेक वर्षे येतो सुरुवातीला सायकलने येत असे हल्ली मोटर सायकलने येतो.
३) सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी आमच्या सोसायटी मध्ये रखवालदाराचे काम करणारा 'गुरखा' आज आमच्याच भागात (एरीयात) स्वतःचे कार्यालय थाटून इस्टेट ब्रोकर बनला आहे.
या तिन्ही उदाहरणानमधून सुचवायचे हेच आहे की, मेहनत घेतल्यास अर्थार्जन नक्की शक्य असते.
पदवी घेतली म्हणजे नोकरीच केली पाहिजे हा समज मनातून काढून मेहनतीने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करायलाच हवा.

बिटाकाका's picture

21 Feb 2018 - 8:08 am | बिटाकाका

जाऊ द्या हो, ज्यांना टिका करायचीय त्यांना त्याचा अर्थ कळला नाही असे नाही पण मग अंधविरोध कसा काय करणार? जणू काही सरकारने सगळ्या डिग्र्या बासनात गुंडाळून ठेवा आणि पकोडे तळायला घ्या असे सांगितले आहे ह्या थाटात विरोध चालू आहे.

शब्दबम्बाळ's picture

21 Feb 2018 - 9:33 am | शब्दबम्बाळ

हो ना!!
याच अर्थाने "गरिबी हि मानसिक अवस्था आहे" हे देखील म्हणता येईल नाही का?
कारण ज्यांची "मानसिक" इच्छाशक्ती आहे ते गरिबीवर मात करूच शकतात! मग रागा ला इतके दिवस त्या वाक्यावरून का बरे पिडत आहेत?
जिथे तिथे सरकारची तळी उचलायची कामे करणारे इथेही येतीलच नुसता शब्दांचा खिस पडायला!

माझे काही मित्र मास्टर्स ची डिग्री घेतलेले आहेत, इंजिनीरिंग मधून बर का, तेही नावाजलेल्या कॉलेजमधून... त्यांना चांगली नोकरी नाही.
कारण कंपन्या नुकतेच पास झालेले फ्रेशर(आणि त्यात मास्टर) शक्यतो घेत नाही आणि कॉलेजमध्ये शिकवायचे म्हणाल तर अवस्था सगळ्यांना माहिती आहे(सिंहगड सारखे)

तर मग, अशा लोकांनी "पकोडे"च विकायचे का? सरकार जे रोजगार निर्मितीचे गाजर(कि जुमला?) दाखवत होते त्याचे काय झाले?
प्रत्येक जण व्यावसायिकच व्हायचा असला तर त्याच्या खाली काम करायला कोण मिळणार?
पण असले प्रश्न विचारायचे नसतात आजकाल...
फेकणाऱ्यांची झेलणे इतकेच काम करणारे आणि स्वतः खाऊन पिऊन समाधानी असणारे लोक प्रवचन देतात इतरांना कि "हेच" सरकार कसे तारणहार आहे. असो, हा प्रतिसाद तुमच्यावर वैयक्तिक नाही. सो, ह. घ्या.

चिर्कुट's picture

21 Feb 2018 - 9:39 am | चिर्कुट

+१

manguu@mail.com's picture

21 Feb 2018 - 10:34 am | manguu@mail.com

सहमत

तुमचे इंजिनीरिंगच्या लोकांना नौकऱ्या मिळत नाहीत हे वक्तव्य कशाच्या आधारावर आहे ते कळले नाही. गल्लीबोळात इंजिनीरिंग कॉलेजेस झाल्याने इंजिनिअर्स गरजेपेक्षा जास्त वाढले हि मुख्य समस्या नाही का? अशाच कॉलेजेसमधून पास झालेले माझे अनेक मित्र चांगल्या नौकऱ्या करत आहेत. कॉलेजेस मधून शिकवणारेही व्यवस्थित कमवत आहेत, आणि मुख्य म्हणजे आवडीने काम करत आहेत. पकोडे तळण्याचा चुकीचा अर्थ तुम्ही काढत आहात असे वाटत नाही का? इंजिनीरिंग डिग्री असेल आणि मुलाखत पास करण्याची पात्रता नसेल तर अजून अनेक मार्ग आहेत कमावण्याचे एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि हे शिवसेनेच्या शिववडाने आधीच सिद्ध केलेले आहे. स्वतःचा विरोध धारदार आहे हे दाखवण्यासाठी काही ठराविक उदाहरणे घेतली जातात हे निरीक्षण नमूद करतो. इंजिनीरिंग सोडून अजूनही अनेक शिक्षण शाखा आहेत, तिथे बरीच स्पर्धा आहे आणि जो त्या स्पर्धेत यशस्वी होतो त्यालाच नौकरी मिळते. म्हणून नौकरी हाच एक पर्याय म्हणून बघू नका हे सांगण्यात चूक ते काय? भजी तळणे म्हणजे रस्त्याच्या कडेला मोडक्या गाड्यावर कळकट्ट कपड्यात भजे तळणे इथे अपेक्षित नसावे एवढी समज अंध विरोधकांना नक्कीच असते पण विरोध कुरवाळणे अपरिहार्य आहे. पुण्यातलीच चकचकीत भजी पाव वडा पाव सेंटर्स डोळ्यासमोर आणून बघा, काय वाईट आहे असा पर्याय आजमावून बघण्यात? ज्यांना आवडणार नाही त्यांनी घेऊ नये तो पर्याय, पण सरकारने तो व्यवसायाचा एक पर्याय आहे हे सांगणेच खुपावे एवढी असहिष्णुता कशाला?
*************************************
प्रत्येक जण नौकरीच करणार तर त्याला नौकरी द्यायला व्यावसायिक होणार कोण? पण असले प्रश्न विचारायचे नसतात.
*************************************
हे सरकार कसे बुडवणारे आहे आणि आधीचे सरकार कसे आमचे फेवरेट होते आणि कश्या प्रत्येकाला दोन दोन नौकार्यांच्या संध्या देत होते असल्या थाटात बोलणाऱ्यांचेही पोट भरलेलेच असते आणि त्यांनाही चिखलफेक करण्यापेक्षा काही वेगळे काम नसते हे नम्रपणे नमूद करतो.
************************************
हा प्रतिसाद वैयक्तिक नाही हे वेगळे सांगणे न लगे!

शब्दबम्बाळ's picture

21 Feb 2018 - 10:53 am | शब्दबम्बाळ

ओ काका! थंड घ्या जरा... इतक्या धाग्यांवर बरोब्बर फक्त बीजेपी बद्दल विषय आला कि आहातच हजर! दम लागेल हो!! :D

इंजिनीरिंग डिग्री असेल आणि मुलाखत पास करण्याची पात्रता नसेल तर अजून अनेक मार्ग आहेत

त्यांची पात्रता आहे कि नाही हे मुलाखत झाल्यावर कळेल, आणि मुलाखतीला बोलवायला, ती पदवी लागणारी जागा रिकामी असणे गरजेचे आहे हे आपल्याला कळत नसावे का? बाकीपण डिट्टेलवार बोललो असतो पण काही अंधसमर्थकांना तर्क चालत नाही... त्यामुळे जाऊदे!

हे सरकार कसे बुडवणारे आहे आणि आधीचे सरकार कसे आमचे फेवरेट होते आणि कश्या प्रत्येकाला दोन दोन नौकार्यांच्या संध्या देत होते असल्या थाटात बोलणाऱ्यांचेही पोट भरलेलेच असते आणि त्यांनाही चिखलफेक करण्यापेक्षा काही वेगळे काम नसते हे नम्रपणे नमूद करतो.

सरकारला सामान्य माणूस विरोध करूच शकत नाही, विरोध करणार्यांना आधीचे सरकार आवडतच होते असे "नेहमीचेच" ठरलेले पांचट शब्द" फेकू" नका हो... जरा तरी नावीन्य दाखवा...

बाकी भाजपच्या आयटी सेल मध्ये पण पुष्कळ नोकऱ्या असतील नाही का आता? मध्यंतरी विचारलं होत मी कसे पगार वगैरे असतात तिकडे...पण कोणी उत्तर नाही दिल... तेवढाच कोणाचा तरी फायदा होईल...

बिटाकाका's picture

21 Feb 2018 - 11:11 am | बिटाकाका

तुम्हाला काही प्रश्न (तुम्हाला अंधविरोध करून, त्याच त्याच (पांचट?) प्रतिक्रिया देऊन दम लागला नसेल तर उत्तर द्या) -
१. आताचे सरकार चांगले करते आहे - म्हणजे इम्प्रुव्हड आहे - कि नाही हे तुम्ही कसे ठरवता?
२. मी बिजेपी चा विषय निघाल्यावर येतो, हे तुम्हाला कसे माहित? माझ्या सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही बघत बसता का? स्वतःच्या प्रतिक्रिया काढून बघा, बिजेपी वर टिका करण्यासाठी तुमच्या प्रतिक्रिया दिसतात. त्यावर तुमचा काही आक्षेप नाही मग माझ्यावर का?
३. मी इथे प्रतिक्रिया तुम्हाला विचारून टाक्यव्यात असे तुम्हाला सुचवायचे आहे का? तुम्ही सरकार समर्थकांवर शाब्दिक दादागिरी करू इच्छिता का?
४. मुलाखती नाहीत हे कशाच्या आधारावर सांगत आहात? कॉलेजेस चे इन-कॅम्पस, ऑफ कॅम्पस जाऊन पहिले तर लक्षात येणार नाही का? कंपन्यांनी तुमचे गुण कितीही असू देत सरसकट नौकऱ्या द्याव्यात असली अपेक्षा आहे कि काय? पण काय आहे कि (अंध विरोधक म्हणावे कि नाही?) तर्क चालत नाही म्हणतात ता काय खोरे आहे काय?
५. ते आयटी सेल, फेकू वगैरे नाविन्यात येत असेल नाही? अंधविरोधकांचा असतो का काही आयटी सेल वगैरे? कि त्याबातीतही मागेच आहेत?

विशुमित's picture

21 Feb 2018 - 11:26 am | विशुमित

<<<मी इथे प्रतिक्रिया तुम्हाला विचारून टाक्यव्यात असे तुम्हाला सुचवायचे आहे का?>>
==>> याच्याशी प्रचंड सहमत.

विशुमित's picture

21 Feb 2018 - 11:18 am | विशुमित

संबित पात्राला सगळीकडे तोंड देऊन दम लागतो म्हणून त्यांनी नवीन भरती सुरु केली आहे.
बिनपगारी फुल्ल अधिकारी...!! एकदम इज्जतच इज्जतच.
बाकी ठिकाणी जाऊ नका बरं, ते पैसे देतील कामाचे पण किंमत छ्या !!
सुरवातीला फक्त सहमत आहे सहमत आहे म्हणायचे. मग थोड्या दिवसांनी ह्याह्याह्या हसायचे, मग उलूउलुलु लिहायचे, मग बुबुडा वगैरे काहीतरी असते असे लिहायचे, मग ६० वर्ष्यात/१५ वर्ष्यात काय केले असे विचारात राहायचे, खांग्रेस- व्याधी वगैरे लिहण्यासाठी २ प्रोमोशन्स नंतर चान्स मिळणार, निवडणूक आकडेवारी फेकायचे हे तुमचे अंतिम ध्येय, पण त्यासाठी खूप अभ्यास वाढवावा लागेल स्वतःचा कामधंदा सोडून. सॉरी तुम्हाला कामधंदा नाही आहे नाय का?
येताय का मग शिबिराला ??

बिटाकाका's picture

21 Feb 2018 - 11:31 am | बिटाकाका

बर्रोब्बर! अगदी पक्की माहित आहे रेसिपी.
--------------------------------
याउलट विरोधकांच्या बाजूने बोलायला (याला तळी उचलणे म्हणत असतील का बरे?) काहीच करावं लागत नाही ते एकदम सोप्पंय! शिवाय पैसाही मिळतो असे तुम्ही म्हणताय (ते शब्दबंबाळ साहेब पैसे चांगले मिळत असतील असे म्हणत आहेत, आता त्यांना काय सांगणार कप्पाळ?). म्हणूनच आजकाल संबित पात्रा कमी दिसतात आणि ते सुरजेवाला, मलिक वगैरे अभ्यासू मंडळी जास्ती दिसतात. बाकी ते त्रिपाठी आजकाल दिसत नाहीत, बरे बोलायचे.

विशुमित's picture

22 Feb 2018 - 2:49 pm | विशुमित

<<<बर्रोब्बर! अगदी पक्की माहित आहे रेसिपी.>>>
==>> राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः क्लास चालवतात याचा. बातमी आता पेपर आऊट पण झाली आहे.
आता कर्नाटक मध्ये शाखा खोलली आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/amit-shah-guides-bjps-cyber-so...

मार्मिक गोडसे's picture

22 Feb 2018 - 3:07 pm | मार्मिक गोडसे

मोदी सरकारच्या योजना कुठल्या असा प्रश्न विचारला असता 112 योजनांपैकी 15 योजनादेखील उपस्थितांना सांगता आल्या नाहीत.

तिकडे माबोवरील भक्ताडांना (माबोवर भक्तांना 'भक्ताड ' म्हणतात. ) अद्याप एकही योजना सांगता आलेली नाही. आयटी सेलला बरीच मेहनत घ्यावी लागणार असं दिसतंय.

छिद्रान्वेषी अंध विरोधकांना योजना सांगून उपयोग असतो तरी का हे भक्ताड्यांना कळायला नको? ते शहा लोकांना सांगण्याबद्दल बोलत आहेत.
*************************
बाय द वे, ते अमित शहा अधिकृत आयटी सेल ला संबोधित करत होते. ट्रोल लोकांना काय करायचे हे सांगावे लागत नाही. गुलामगिरी कशी करायची आणि लोकांना भक्ती कशी शिकवायची/दाखवायची हे त्यांना चांगलं ठाऊक असतं.
*************************
बाकी स्वतःला हुशार हुशार म्हणवणारे लोक अशा छोट्या मोठ्या गोष्टींची माहिती भक्ताड्यांकडे कशाला मागतात देव जाणे! आता हेच बघा, ती योजनांची यादी ईथे पाहता येईल.
https://www.sarkariyojna.co.in/complete-list-schemes-launched-pm-narendr...

विशुमित's picture

21 Feb 2018 - 12:14 pm | विशुमित

<<<तुमचे इंजिनीरिंगच्या लोकांना नौकऱ्या मिळत नाहीत हे वक्तव्य कशाच्या आधारावर आहे ते कळले नाही.>>>
==>> मला वाटते हि माहिती बऱ्या पैकी EPFO ऑफिस मधून समजू शकेल. गेली ४-५ वर्ष्यात नोंदणीचा काय ट्रेंड आहे. अनोंदणीकृत आणि २० कामगारांपेक्षा कमी असणारे लघु उद्योग आणि सेवानिवृत्त यांची काही टक्केवारी गृहीत धरली तर किती नोकऱ्या उपलब्ध झाल्या हे समजेल. पण हि आकडेवारी पब्लिक डोमेन ला उपलब्ध नाही.
<<< गल्लीबोळात इंजिनीरिंग कॉलेजेस झाल्याने इंजिनिअर्स गरजेपेक्षा जास्त वाढले हि मुख्य समस्या नाही का?>>>
==>> चालू सरकारची याबाबत काय धोरणे आहेत, हे सरकारी समर्थक या नात्याने तुम्ही देऊ शकता.
<<<अशाच कॉलेजेसमधून पास झालेले माझे अनेक मित्र चांगल्या नौकऱ्या करत आहेत. कॉलेजेस मधून शिकवणारेही व्यवस्थित कमवत आहेत, आणि मुख्य म्हणजे आवडीने काम करत आहेत.>>>
==>> तुमच्या मित्रांचे अभिनंदन. ते ह्या ३-४ वर्ष्यात पासआऊट झाले आहेत का ? असतील तर त्यांचे खरेच खूप खूप अभिनंदन.
<<< इंजिनीरिंग डिग्री असेल आणि मुलाखत पास करण्याची पात्रता नसेल तर अजून अनेक मार्ग आहेत कमावण्याचे एवढाच त्याचा अर्थ आहे.>>>
==>> बरोबर आहे. पण सहसा ज्या गोष्टी साठी इंजिनीरिंग केली त्यात भजी बनवणे हा मार्ग येत नसावा बहुतेक. तसे असते तर हॉटेल मॅनेजमेंट करायला पाहिजे होते. पोरांचे अभ्यासक्रम निवडण्यात खरच खूप गफलत होते. गायडन्स द्यायला कोणी नसते. मला वाटते सरकारने जर वर्षी घोषित केले पाहिजे, कि ह्या क्षेत्रात नोकऱ्यांचे प्रमाण वाढेल त्यानुसार पात्रता आणि आवड या नुसार अभ्यासक्रम निवडावा. चार वर्षांनी कशाची किंमत वाढेल याचा पुरेसा अंदाज मिळायला हवा. सजेशन आहे फक्त हे.
<<<म्हणून नौकरी हाच एक पर्याय म्हणून बघू नका हे सांगण्यात चूक ते काय?>>
==>> चूक नाही पण नोकरी देण्याचे/उपलब्ध करण्याचे जे दावे केले त्यात ते अपयशी ठरले असे सरकारने विनम्रपणे कबूल करावे. कोणी फासावर लटकावणार नाही. आजकालच्या जगात सगळे स्वयंभू होत चालले आहेत.
<<<भजी तळणे म्हणजे रस्त्याच्या कडेला मोडक्या गाड्यावर कळकट्ट कपड्यात भजे तळणे इथे अपेक्षित नसावे एवढी समज अंध विरोधकांना नक्कीच असते पण विरोध कुरवाळणे अपरिहार्य आहे.>>>
==>> इंजिनेर झाला काय आणि भजी तळले काय, कपडे काळेकुट्ट होणारच. आयटी वाल्यांचे पिवळे होत असतील (विनोद म्हणून घ्या)
<<<पुण्यातलीच चकचकीत भजी पाव वडा पाव सेंटर्स डोळ्यासमोर आणून बघा, काय वाईट आहे असा पर्याय आजमावून बघण्यात?>>>
==>> मोक्याच्या ठिकाणची जागा मिळायला महिना ७०-८० हजार (काही ठिकाणी लाखात आहेत0 रुपये भाडे, अन्न प्रशासन, पोलीस प्रशासन, नगरसेवक प्रशासन, एरियातील भाई-दादा प्रशासन असे बरेच स्टेकहोल्डर सांभाळावे लागतात. उद्योजक खमक्या आणि डिप्लोमॅटिक पाहिजे.
माझा एक पोलीस मित्र (हवालदार रँक) त्याने आपल्या सख्ख्या भावाला कामधंद्याला लावावे म्हणून मनपा कडून परमिशन घेऊन स्वतःच्या पोलीस चौकीच्या हद्दीत गाडी लावली होती. तिसऱ्या दिवशी हातगाडीसकट सगळे उचलून फुरसुंगीच्या कचराडेपोत फेकून दिली. (आखोदेखी आहे, फोन नंबर देऊ शकतो मित्राचा). ऑन ग्राउंड काय परिस्थिती आहे हे थोडे समजून घ्या. रोज १० हजार गल्ला होतो आणि गळ्यात चैनी घालतो हे खूप दर्शनी आहे.
हे सगळे गाडे नगरसेवक-पुढारी- दादा-भाई- पुरस्कृत असतात. तळणाऱ्याला फक्त पगार मिळतो. तेलाच्या वासाने दमा आणि शरीर खंगून जाते यासाठी मला नाही वाटत त्याचा मालक मेडिकलईम काढत असावा.
त्यामुळे वडापाव खाणाऱ्याने फक्त त्याचा आस्वाद घ्यावा. तरुण पिढीला तिकडे जाण्यासाठी बोट करून रस्ता दाखवून देऊ नये असे वाटते.
....
<<<प्रत्येक जण नौकरीच करणार तर त्याला नौकरी द्यायला व्यावसायिक होणार कोण?>>
==>> हे उलटे पण होऊ शकते- प्रत्येक जण व्यावसायिक च होणार तर त्याच्या व्यवसायासाठी नौकरी करणार कोण?
...................
हा प्रतिसाद वैयक्तिक नाही हे वेगळे सांगणे न लगे!

बिटाकाका's picture

21 Feb 2018 - 12:37 pm | बिटाकाका

तुमचे बहुतेक सगळे मुद्दे रास्तच आहेत की, त्याबद्दल दुमत नाही. पण रोजगारांची संख्या म्हणजे नौकऱ्यांची संख्या याबद्दल तो वाद आहे. सरकारचे म्हणणे असे आहे कि मुद्रा/स्टार्टअप योजने तुन रोजगारासाठी कर्जे घेतलेल्या लोकांना रोजगार मिळतोय हे तुम्ही गृहीत धरणार कि नाही?
------------------------------------------
धंदा म्हणाला कि रिस्क आलीच! त्यामुळे तो पर्याय निवडताना काही गोष्टींचा सामना करावाच लागेल. खरेतर या गोष्टीला स्वतःला मध्यमवर्गात गणनारा सरकारी अधिकारी आणि कर्मचारी वर्ग जबाबदार नाही का? प्रत्येक ठिकाणी पैसे काढायची खोड कशी मोडायची हा खरेतर खूप मोठ्ठा प्रश्न आहे. कायदे हि गोष्ट थांबवू शकत नाहीत हे तर उघड आहे.
-----------------------------------------
सरकारी समर्थक? तुम्हाला सरकारचा समर्थक असे म्हणायचे असेल. नाही मला उगाच वाटून गेलं कि मी काय सरकारची फुकट बिकट नौकरी करतोय कि काय? कॉलेजेस काढू द्यात कि हो किती काढायची तेवढी पण प्रवेश घेणाऱ्याने विचार करून घ्यावा ना. व्यवसायाभिमुख शिक्षण देणे हि जशी सरकारची जबाबदारी आहे तसं तो मार्ग निवडणे/निवडण्यास मदत करणे हे वैयक्तिक/पालकांचे कर्तव्य आहे. पण मग "मुलाला इंजिनिअर केला" हे कसे सांगता येणार?
----------------------------------------
ते व्यासायिक-नौकरी-उलटे -- तोच मुद्दा आहे, वर शब्दबम्बाळ साहेबांच्या वाक्याचा संदर्भ आहे तिथे.

विशुमित's picture

21 Feb 2018 - 1:15 pm | विशुमित

<<<सरकारचे म्हणणे असे आहे कि मुद्रा/स्टार्टअप योजने तुन रोजगारासाठी कर्जे घेतलेल्या लोकांना रोजगार मिळतोय हे तुम्ही गृहीत धरणार कि नाही?>>>
==>> हो धरणार ना. काही आकडेवारी देता का रेफेरेंससाठी.
<<<धंदा म्हणाला कि रिस्क आलीच!>>>
==>> हि रिस्क हिंसक आणि जीवावर बेतणारी नसावी. बाकी कष्ट करण्यासाठी बरेच हसत हसत तयार असतात. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे सरकारचे काम आहे, ते त्यांनी चोखपणे सांभाळावे .
<<<व्यवसायाभिमुख शिक्षण देणे हि जशी सरकारची जबाबदारी आहे तसं तो मार्ग निवडणे/निवडण्यास मदत करणे हे वैयक्तिक/पालकांचे कर्तव्य आहे. पण मग "मुलाला इंजिनिअर केला" हे कसे सांगता येणार?>>>
==>> पालकांना ढेकळे समजत नाही (ग्रामीण भागाकडे सहसा). माझ्या मायबापले अजून माहित नाही माझे नक्की शिक्षण काय झाले ते. कंपनीत कामाला जातो एवढे माहित आहे. मागे शाळेतील शिक्षक भेटले. त्यांनी विचारले काय करतोस आता, म्हंटले ICWAI केले सर, म्हंटले बरे झाले डिप्लोमा केलास, लगेच नोकरी मिळून जाते. घ्या कप्पाळ.

मार्मिक गोडसे's picture

21 Feb 2018 - 1:34 pm | मार्मिक गोडसे

@विशुमित, मुद्देसुद प्रतिसाद.

मुद्राच्या अधिकृत संस्थळावर सगळी माहिती उपलब्ध आहे. नुसत्या महाराष्ट्रासाठी २०१७-१८ या वर्षासाठी "तरुण" वर्गातील ५ ते १० लाखांची ५९००० कर्जे मंजूर होऊन देण्यात आली आहेत. यातली किती नवीन उद्योजकांनी घेतली आहेत हे माहिती नाही पण ज्यांनी घेतली ती उद्योगातच लावली असावीत. यातून रोजगार निर्माण झाले नसावेत का?
http://www.mudra.org.in/PMMYReport
शिवाय खालील लिंक्सवर स्टार्टअप इंडिया आणि स्टॅन्डअप इंडियाचे रिपोर्ट उपलब्ध आहेत.
https://startupindia.gov.in/status.php
https://www.standupmitra.in/
------------------------------------------
धंदा सुरु करण्यात कसल्या हिंसक अडचणी आहेत हे काही कळले नाही, विस्कटून सांगाल का? अर्थात अशा हिंसक अडचणींची सरकार कडे तक्रार आली तर नक्कीच कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे.
-------------------------------------------
पालकांना माहीत नसते हा मुद्दा वेगळा आणि माहीत असायला हवे हा वेगळा. मी दुसऱ्या मुद्द्याबद्दल बोललो. पण तरीही तुमच्याबद्दल माहिती नाही पण माझ्या ओळखीतल्या (आठवत असलेल्या, इथल्या आणि गावाकडल्या) अंदाजे ९० % इंजिनिअरिंगच्या मुलांच्या आई वडिलांना नक्की माहिती आहे कि इंजिनिअरिंग काय आहे. गावाकडच्या लोकांना माहिती नाही हा दावा पण सरसकटीकरण आहे असे मला वाटते. अगदी काही माहीत नसले तरी पालक म्हणून त्यांनी जागरूक व्हावे हाच तर मुद्दा आहे. शिवाय फक्त गावाकडच्या लोकांचा, तुलनेने कमी शिकलेल्या लोकांच्या पाल्यांचा नौकरीचा प्रॉब्लेम आहे असे नाही. शहरातल्या लोकांनाही तितकाच लागू होतो. एकतर मुलाला काय आवडते ते करू देतात किंवा स्वतःला आवडतं ते करायला लावतात.

उपयुक्त लिंक्स दिल्या बद्दल आभारी आहे.
सगळे वाचून काढायला थोडा (म्हणजे बराच) वेळ लागेल.
परंतु ही आकर्षक आकडेवारी मार्केट मधे दृश्य स्वरूपात दिसत नाही.
तूर्तास सरकारचे अभिनंदन.
....
हिंसक अडचणी भजी-वडापावची गाडी संदर्भात उदाहरण दिले होते. छोटे उद्योग चालू करण्यासाठी अशा unhealthy कंपेटिशन च्या अडचणी येतात. प्रसंगी हिंसक देखील असतात.
.....
<<<अंदाजे ९० % इंजिनिअरिंगच्या मुलांच्या आई वडिलांना नक्की माहिती आहे कि इंजिनिअरिंग काय आहे.>>>
=>> गावाकडे अजून पण लोकांना डॉक्टर- इंजिनीरिंग शिवाय बाकी काही माहीतच नाही. ते नाही झाले तर पोलीस किंवा मिलटरी भरती एवढाच ऑपशन नोकरीसाठी उरतो. MPSC UPSC ची हालत आता काय आहे दिस्तायच.
<<< एकतर मुलाला काय आवडते ते करू देतात किंवा स्वतःला आवडतं ते करायला लावतात.>>>
==>> हे वाक्य आवडले. दोघांनी पण काही मार्केट रिसर्च केलेला नसतो. सगळे ऐकीव माहितीवर मटका खेळतात.
इथे सरकारचा रोल जास्त वाढतो. त्यांनी घेतलेल्या संसदेत घेतलेले निर्णय आणि इतर आंतराष्ट्रीय करारांमुळे कोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध होऊ शकतात याची आगाऊ अंदाज जर वर्षी वर्तवले पाहिजेत.

जिथे तिथे सरकारची तळी उचलायची कामे करणारे इथेही येतीलच नुसता शब्दांचा खिस पडायला!

काय आत्मविश्वास!!!
मी बोललो तो शब्द शेवटचा... बाकी सगळा फक्त शब्दांचा किस!!

धन्यवाद!

शब्दबम्बाळ's picture

21 Feb 2018 - 11:14 am | शब्दबम्बाळ

यु आर वेलकम! :)

बाकी तुम्ही कोट केलेलं वाक्य

याच अर्थाने "गरिबी हि मानसिक अवस्था आहे" हे देखील म्हणता येईल नाही का?
कारण ज्यांची "मानसिक" इच्छाशक्ती आहे ते गरिबीवर मात करूच शकतात! मग रागा ला इतके दिवस त्या वाक्यावरून का बरे पिडत आहेत?
जिथे तिथे सरकारची तळी उचलायची कामे करणारे इथेही येतीलच नुसता शब्दांचा खिस पडायला!

या परिच्छेदात होत जो कि 'रागा'शी संबंधित होता. नंतरचे परिच्छेद वेगळे केलेले आहेत हे तुम्हाला दिसले असेल हि आशा आहे.

manguu@mail.com's picture

21 Feb 2018 - 11:47 am | manguu@mail.com

भाकरी नाही तर केक खा.

हे आठवले.

सतिश गावडे's picture

21 Feb 2018 - 11:48 am | सतिश गावडे

कवितेचा भावार्थ लक्षात न घेता इथे भाट लोकांनी धुळवड चालू केली आहे.

कुठलेही काम हलक्या प्रतीचे नसते. अगदी भजी तळणे हे ही नाही. मात्र या (मुळ) कवितेचा उद्देश सरकारनिर्मित रोजगार आणि एखाद्याने पोटापाण्यासाठी सुरु केलेला स्वयंरोजगार यात फरक आहे हे दाखवणे आहे असे मला वाटते.

अप्पा जोगळेकर's picture

21 Feb 2018 - 12:03 pm | अप्पा जोगळेकर

मॅग्नेटिक महाराष्ट्र कमालीचे यशस्वी झाले. फडणवीस यांचे अभिनंदन.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Feb 2018 - 3:19 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

उत्तम रे अप्पा. अभिनंदन. MOU का काय म्हणतात त्यांची अंमलबजावणी व्हावी ही अपेक्षा.

बिटाकाका's picture

21 Feb 2018 - 12:05 pm | बिटाकाका

काय आहे, काही विरोधकांना पकोडे तळणे = स्वयंरोजगार हे समजून घ्यायचे नाही किंवा आंधळेपणाने विरोध करत रहायचा आहे. आता यात सरकारचा काय संबंध? तर संबंध असा आहे कि किती नौकऱ्या तयार केल्या या प्रश्नाला उत्तर देताना पकोडे तळणे हे दिलेले उदाहरण आहे. पकोडे तळून कोणी २००रु. घरी नेत असेल तर तो रोजगार गणनार कि नाही? जर याचे उत्तर हो असेल तर सरकार मुद्रा योजना आणि स्टार्टअप इंडिया या माध्यमातून असे रोजगार तयार करण्यास मदत करत आहे असा सांगण्याचा उद्देश होता हे (अंध)विरोधकांना समजले नसावे का बरे?
***********************************
नौकरी मिळत नसेल तर तुमचं तुम्ही (कुठून तरी) गाडा आणा आणि कळकट्ट कपडे घालून भजी तळायला लागा असं सरकार सांगत आहे हा खोडसाळ प्रोपोगंडा करण्याचा हेतू काय असेल?

नाखु's picture

21 Feb 2018 - 8:41 pm | नाखु

भावार्थ समजून घ्या, पदवी प्राप्त केल्यानंतर जर परवड होत असेल तर आलेली उद्वीग्नता असावी असं समजा

बाकी आक्रस्ताळेपणा प्रसिद्ध वाहीन्यांनी/माध्यमांनी अख्ख्या भाषणातून फक्त भजीच उचलून आपापले "घाणे" तीन चार दिवस तळते ठेवले हेही लक्षात ठेवायलाच हवे.

कसल्याही कामाला कमी प्रतीचे समजू नये तरी सत्ता परिवर्तन झाल्यावर आपलं शिक्षण, कौशल्य सरकारदरबारी दखलपात्र असावे ही अपेक्षा अवाजवी नाही.

मिपावरील धुरीणांच्या धागा चर्चा सत्रातील अदखलपात्र नाखु वाचकांची ही पत्रेवाला

मराठी_माणूस's picture

21 Feb 2018 - 12:28 pm | मराठी_माणूस

दोन बातम्या.

http://epaper.loksatta.com/1552413/loksatta-mumbai/21-02-2018#page/1/1

अजुन एक अश्वासन. वर्षानुवर्षे मरगळ आलेल्या एम आय डी सींचे काय ?

डॉ.नितीन अण्णा's picture

22 Feb 2018 - 5:27 pm | डॉ.नितीन अण्णा

कोडग्या कोडग्या लाज नाही
कालचे बोलणे आज नाही