फुल्ल प्रुफ पिलानः एक हसीन सपना

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जनातलं, मनातलं
11 Jan 2017 - 6:16 pm

म्येंरें प्यारँ द्येषवाषियों,

जनता की खास मांगपर, सतत की डीमांडपर, एटीएमकी रांगपर फुल्लपुरुफ प्ल्यान लाया हूं. बोलो जाहीर करुं के नं करुं.... बोलो करुं के नं करुं.... करुं के नं करुं.... लो कर दिया.....

--------------------------------------
नोटाबंदीच करायची असती तर कशी करता आली असती तर ही एक आयडीया. मनोरंजन आहे, फिक्शन म्हणून वाचा. पण आता पर्यंतचे नोटाबंदीबद्दलचे सर्व वाचलेले विसरून वाचावे लागेल. लर्न टू अनलर्न! (पण हे अनलर्न लर्नलेले कसे अनलर्नलायचे??)

मुख्य व एकमेव उद्देशः नोटाबंदीने फक्त काळा पैसा 'नष्ट' करायचा आहे.

थेट नष्ट करायचा. बाहेर आणणे, ५०-५० स्किम सारखे फालतू प्रकार नाही. आम्हा नको मनी कोणताच भ्रष्ट! नष्ट म्हणजे नष्ट!

खतम, फिनिश, चुकीला माफी नाही. ढिंच्यक्यांव!

पार्श्वभूमी: काळापैसा बाळगणारे मोठ्या नोटांमधे साठवतात असं एक गृहितक आहे. जागा कमी लागते, हाताळायला सोपी वगैरे... तर आता काही स्टेप्स आहेत. ज्या अगदी गुप्ततेत करायच्या आहेत पण त्यालाही किमान तीन ते पाच वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. कॅशलेसची साथ अतिआवश्यक. पण आधी उजेडात कॅशलेसचा बोभाटा मग अंधारात काळ्या पैशाचा काढायचा काटा.

१. सन २०१४ जुलै: सणांचा सिझन येतोय. खूप खरेदी विक्री होणार आहे. कॅशलेस करणार्‍यांना डिस्काउंट सरकारतर्फे. युद्धपातळीवर कॅशलेस कॅशलेस, बॉबी देओल ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर, लांब केस उडवत कोंबड्यासारखी मान हलवत नाचत येतोय, एका हाताने चेकवर अकाउन्ट पेयीसाठी मारतात तशा रेषा मारत येतोय, गाणं सुरु होतंय... "कॅशलेस कॅशलेस... करना है भारतदेस, पेमेंट स्वाईपसे कर तेरा..."

बॉबी नै, अमिताभ घेऊ... "कुच्छ दिन तो गुजारिये कॅसलेसमें..." विद्या बालन..."देखो विद्यादिदी नोटोंसे बात कर रही है... और नहीं तो क्या, आप लोग तो कॅशलेस लेन-देन करोगे नही, अब नोटोंसेही कहती हुं बॅन्कमें वापस चली जाओ, और वापस मत आना." इन्क्रीडिबल कॅशलेस इन्डिया.... कार्डस्वाइपर देवोभवः... आमिरखान...

नो नो... आमिर-देशद्रोही-खान क्यान्सल! स्नॅप द डिल... ट्विट ट्विट!

'देशभक्ती जागवा' चा गजर. पण हे असेल ऐच्छिक, प्रत्येक जण कॅशलेस होऊ शकेल ह्या दृष्टीने तुफान घोडदौड. सगळीकडे वीज, मोबाईल रेंज, अ‍ॅप्स, उप्स, युसेसायडीची जनजागृती..... गावांतल्या खेड्यांतल्या घराघरांच्या भिंतींवर घोषणा रंगवा.... कॅशलेस पाळा - रोख व्यवहार टाळा!

हा लढाईच्या मैदानावर निर्माण केला जाणारा स्मोक-स्क्रीन आहे. जनधन खात्यांचे धमाकेदार लॉन्चींग, सर्व सरकारी सबसिडी खात्यावर, कोणाचाही पगार असो जाईल खात्यावर, बॅन्केत खातं नसेल तर पगारच होणार नाही. सगळी खाती आधार+मोबाईल इनेबल्ड असलीच पाहिजेत. बड्या छोट्या सर्व कारखाने, कंपन्या, रोजंदारीवर माणसे ठेवणार्‍या सर्वांना सूचना, खात्यांशिवाय पगार द्यायचा नाही. रोख पगार द्यायचाच नाही. रोख पगार देणार्‍याचे सगळे लायसन्स रद्द. स्मोकस्क्रिनः टॅक्सबेस वाढवायचाय. व्यवहार कळले पाहिजेत.

२. स्मोकस्क्रिन च्या मागे: कोण व्यापारी-उद्योजक कॅशलेसला काचकूच करतोय त्यावर लक्ष, हे लक्ष एक वर्ष ठेवायचंय. बॅन्क, पॅनकार्ड, टॅक्सट्रेल, आवक-जावक, पगारपाणी, पेट्रोलपाणी सब कैद करो कम्पुटरमें ऑनलाईनसे थेट आयकरमें. ज्याच्याकडे कॅशलेस सुविधा नाही त्याचे सगळे लायसन्स रद्द करायचे. ग्राहकाला ऐच्छिक, विक्रेत्याला सक्तीचे. कॅशलेस कॅशलेस.

एक ग्राम सोने घ्याल तर पॅनकार्ड सक्तीचे. नोंदणी होईल करविभागात थेट. पिंपळगाव बुद्रुक च्या चंद्रकलाबाईंनी जळगावला येऊन सोने घेतले चार ग्राम, द्या बाई पॅन आणि आधार. मोबाईल वर करतो काम त्याशिवाय पावती नाही बनणार सोनाराच्या दुकानात. पावती म्हणजे थेट बाईंच्या पॅन-अकाउंटवर हरिभाऊ सोनाराच्या दुकानातल्या खरेदीची नोंद. हरिभाऊ सोनार, तुमच्याकडचा रोजचा सोन्याचा हिशोब थेट आयकरविभागाच्या स्क्रिनवर दिसतोय बरं का. पावती, रजिस्टर, खतावण्या-बतावण्या सब बकवास बंद.

तीन महिन्याआधी घेतले सोने, पोराच्या साळंला फीस भरायची, इकायचं गं बाई. तात्याराव सोनाराच्या दुकानात. बाईंनी सोनं विकलं, पैसे गेले खात्यात, एसेमेस वाजला. टॅडेंग!.... युसेसाआयडी केलं, थेट शाळेच्या खात्यात. टॅडेंग!..... पॅन-अकाउंटला नोंद, तिघांच्याही, तात्याराव, चंद्रकलाबाई आणि शाळा.

"भाऊ, एक विल्स द्या" "घ्या, आणि इकडे अंगठा द्या, रक्कम टाका" "मिळाले पैसे?" "हो." पानवाल्याच्या दुकानातही आधार-पॅन-बॅन्क-लिन्क्ड फिंगरप्रिन्ट स्कॅनर-स्वाइप मशिन. नो कार्ड, नो कॅश, नो मोबाईल, नो झंझट, बस एक बोट. कॅशलेसची ही लाट पसरत चालली आहे, गावागावात. पैसा बाळगणे जणू गुन्हा.

३. सन २०१५ मे: २००० ची नोट गुपचूप आणायची. लॉन्चींग नको, फार वेगळी साइझ, पिन्क नको, अगदी साधी-सुधी. (५०० व १००० च्या नोटांमधून काळा पैसा २००० मधे शिफ्ट होईल) बॅन्केतून मोठ्याला रकमा काढणार्‍यांना हीच द्यायची. २५,००० च्या पर्यंत द्यायच्या १००० च्या नोटा.२,००० रुपयांपर्यंत रोख काढणारांना द्यायची १०० ची चळत. "काय राव पाचशेच्या चार द्याना. अहो, शॉर्टेज आहे," पाचशेच्या नोटांचं शॉर्टेज? वो क्यों भला...

४. सन २०१५ मे ते २०१६ जानेवारी: ५०० ची शांततेत दुर्मिळ करायची. हळू हळू बाजारातून गुपचूप काढून घ्यायची व नंतर बंद करायची. पाचशेच्या ऐवजी १०० च्या नोटा वाढवायच्या. छोटे व्यवहार करणार्‍यांना १००-५० च्या नोटांचा काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम होईल मोठे व्यवहार करणार्‍यांना, ते सरकतील २००० च्या नोटेकडे. कॅशलेस आधीच प्रमोट केलंय त्यामुळे आता ५०० च्य नोटेची गरज नाही. मेरा दिल ले गई ओये कम्मो किधर, मैं ढूंढू उसको इधर उधर....

५. सन २०१६ सप्टेंबरः ५,००० व १०,००० ची नोट आणायची. फेस्टीवल सिझन. घर खरेदी, दसर्‍याला बुकींग करणारे, टक्केवारी, मोठी कॅश देणार्‍यांच्या हाती ह्याच नोटा. गुपचुप आणायची बोभाटा नको, जे मोठे कॅश विड्रॉ करतात त्यांना ह्याच नोटा द्यायच्या असा बॅन्कांना आदेश, करा लेको चैन, काढा कॅश. मोठ्या कॅशमधे व्यवहार करणारे काळा व्यवहार करण्याची शक्यता जास्त असते, करु द्यावेत. इमानदार लोकांसाठी कॅशलेस आहेच. ही दहा हजारची नोट कुणाच्या तरी कपाटा, तिजोरीत बसून राहिल. कारण ती एकटी नसेल. कुठेही गेली तरी. बॅन्केत गेली तर तीची पावले कळतीलच, रक्कम मोठी आहे. पाच नोटा केल्या की आली पॅनपंचाईत. छोटे दुकानदार, पेट्रोलपंप, सुटे नाय देणार कोण. तिकडे खर्च नाही होणार, कोनी करणार पण नाय. कारण त्यांना थोडी माहिती काल के अंतराल में क्या छुपा है.

मनुष्य का जीवन उम्मीद और भरोसा इन दोनोसे चलता है.
पर उसे नही पता, कालके अंतराल में क्या क्या पलता है.

६. सन २०१६ नोव्हेंबर ते २०१७ जानेवारी: १००० ची नोट दुर्मिळ करुन काढून घ्यायची जशी ५०० ची काढली तशी. (५००, १००० व २००० चा काळा पैसा ५००० व १०,००० च्या नोटेत शिफ्ट होईल)

७. सन २०१७ ऑगस्टः आता २००० ची नोट हळू हळू काढून घ्यायची. सर्व काळापैसा शक्यतो १० ह च्या नोटांत सरकेल. सर्व काळे व्यवहार ५ व १० ह च्या नोटांत चालत असतील. मोठ्या कॅश काढणार्‍यांना अटकाव नाहीच. द्या त्यांना ह्याच नोटा. पण आयटी लक्ष ठेवून आहे, ह्या पाच पेक्षा जास्त नोटा कोण काढतंय, कोण भरतंय. वर्षभर लक्ष ठेवून आहे आयकर विभाग तुमच्यावर. स्मोक आणि स्क्रिन. कॅशलेस चा स्मोक आणि कंप्युटरची स्क्रिन. आयकरविभाग म्हणजे षड्रिपूंनी मत्त असलेली माणसे? ती तर दगाबाज, माणसे दगाबाज कुठेही असली तरी. आता रोबो आहेत हो लक्ष ठेवून... जेव्हा विचाराल तेव्हाच कळवतील. जेव्हा कळवतील तेव्हा भल्याभल्यांच्या झोपा पळवतील. आयकरविभागातल्या जीवंत माणसांना हे रोबो पळवतील. जाओ पहले उस आदमी का साईन लेके आओ, पुच्छो तीन लाख का कॅश क्यूं निकाला.

८. सन २०१९ च्या निवडणुकांच्या अगदी तीन महिने आधी: कोणतातरी रविवार, देश के नाम संदेश, पंतप्रधान, आणि "आज अचानक रात आठ बजेसे ----- " नाही नाही नाही, थांबा थांबा. उद्या सकाळी बघू, आता झोपायची वेळ झाली. ठिक आहे, गुडनाईट.

शुभप्रभात. सकाळी ११ वाजता. मस्त चहा-नाश्ता करुन. गल्ल्यावर बसलो, टीवी ऑन केला.... तेवढ्यात दाण्णकन राष्ट्र के नाम प्रधानमंत्री का संदेश.

"मेंरें प्यांरे ड्येंशवाषियों, आज, आत्ता, ताबडतोब, ह्या क्षणापासून ५,००० व १०,००० च्या नोटा रद्द करण्यात येत आहे असे आरबीआय व सरकारतर्फे जाहीर करत आहे..... बसा बोंबलत तिच्यायाला ......................................... सोन्याच्या दुकानाकडे धावताय? कोनो चानस नही बबुवा, आजपासून पाच दिवस सोन्याच्या दुकानात कोणतीही खरेदी-विक्री होणार नाही. शुक्रवारपर्यंत वेळ आहे, नोटा फक्त बॅन्केत, आणी फक्त तुमच्याच खात्यात भरा. उसके बाद आये तो हम पुछेंगे..............हम आपके हैं कौन?"

स्टॅच्य्यु. ह्या दिवशी जास्तीत जास्त १० हजाराच्या नोटा ह्या काळ्यापैशावाल्याकडे सापडतील, कारण छोटे-मोठे व्यापारी, सर्व इमानदार नागरिक गेल्या पाच वर्षात स्वेच्छेने कॅशलेस झालेले असतील. १० हजाराच्या नोटेची कोणाला गरज आहे? ज्याला काळे धंदे करायचे त्यालाच.

देशभरात एक जल्लोष. ह्ये धतडततड, ह्ये ह्ये धतडततड! ठिंका चिका, ढिंका चिका... दंगल दंगल!!!

काळ्यापैशावाल्या मस्तवालांच्या गळ्यावर पाय, कण्यावर गदा आणि .$$$वर चाबुक!. सरकारचा खराखुरा सर्जिकल स्ट्राइक. काळेपैसेवाले आयसियुत. कारण पाचशे हजारच्या तुलनेत १०,००० च्या नोटेत खूप जास्त पैसा बसतो म्हणून केला होता भरमसाठ साठा. आता बसला सोटा.

आपल्या ५ व १० हजारच्या नोटा बॅन्केत आपल्या खात्यात भरा, बदलून वगैरे मिळणार नाही. एक असो, दोन असो, दहा असो की हजार सगळ्या नोटा स्वतःच्याच खात्यात भराव्या लागतील. ५०-५० स्किम नाही, १५% स्किम नाही, दया नाही माया नाही कोणतीही सबब नाही. चुकीला माफी नाही. इतकाच भरा, तितकाच भरा, असल्या फालतू अटी नाहीत. सगळा भरा. कुठून आणल्यात तेवढं सांगा. एवढ्या कॅशची तुम्हाला काय गरज होती ते सांगा. सफाई द्यायला लावा आता रांगा.

सन २०१९ च्या निवडणुकीचा एकच मुद्दा. काळ्यापैशावाल्यांना झोपवलं, इमानदाराला जगवलं, गरिबाच्या जीवनात कमळ फुलवलं. दंगल दंगल! दंगल दंगल!
नरेंद्र मोदी परत एकदा प्रचंड बहुमताने पंतप्रधान. पुढच्या २० वर्षांची निश्चिंती. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे.....

ह्या प्लानचा विरोध करणारे, ह्यात दोष काढणारे, ह्याला नावं ठेवणारे, नाकं मुरडणारे, वाचून वाचलं नाही सांगणारे सर्व खान्ग्रेसी, आप्टार्ड, लिब्टार्ड, पेड प्रतिसादक, प्रेस्टीट्युट्स, देशद्रोही, अंधविरोधक, खुपसट काढणारे, विरोधासाठी विरोध करुन देशाचं भलं बोंबललं तरी चालेल पण आम्ही तुमच्याविरुद्ध सतत बोंबलणारच असा हट्ट धरुन बसलेले, सब के सब देश के नमकहराम!

हुश्श! चला झालं आता? गप कामाला लागा परत, स्वप्नं बघताय जागेपणी. ह्यो चानस गेला. आता थेट विस वर्षांनीच. तोपर्यंत जगलो वाचलो तर तेव्हा येणार्‍या कोणत्या तरी मोदीपर्यंत हा प्लान पोचवा... अशी माझी विनंती.

धोरणविचार

प्रतिक्रिया

सिद्धार्थ ४'s picture

11 Jan 2017 - 6:52 pm | सिद्धार्थ ४

लय भारी

शलभ's picture

11 Jan 2017 - 7:31 pm | शलभ

चांगला प्रयत्न आहे..

अंतु बर्वा's picture

11 Jan 2017 - 8:41 pm | अंतु बर्वा

वेळ्खाउ असला तरी पिलान चांगला दिसतोय, फक्त ते हळुच काढुन घ्यायचा प्रकार एवढा सोपा असेल असं वाटत नाही कारण ज्यांनी साठा केलाय तो साठा तर तसाच राहील. इथे ग्रुहितक असं आहे की ही लोकं तेवढे एफोर्ट्स घेउन आपला आताचा साठा नवीन मोठ्या नोटांमधे बदलतील... जर हा साठा बदलला गेलाच नाही आणि ऑफिशिअली 'हळुच काढुन घेतलेल्या नोटा' कधीच कॅन्सल केल्या नव्हत्या म्हणजे हा साठा अजुनही त्याची वॅल्यु बाळगुन आहे...

फिक्शन म्हणून काहिही बरळायला काय हरकत आहे? ओपन platform आहे ......

Ram ram's picture

12 Jan 2017 - 12:51 pm | Ram ram

बरळायला? हैला.

ऐ धत्तड तत्तड...ऐ धत्तड तत्तड...ऐ बजा रे गनपत...!!...ऐ धत्तड तत्तड

काय आयड्या देल्ली संदीप भौ....मानलं ना..मी म्हंतो घ्या एखांदी अपेनमेन्ट मोदीभौ ची...त्याईले सांगा ह्यो आयड्या..त्याईले म्हना,येक डाव फुस्स गेला तुम्चावाला त कायले कावता?? येकडाव अजून खेळा ह्यो आयड्या वापरून..
मी म्हंतो प्रशांत किशोरच्या म्होरं न्हाय तुमाला उभं केलं स्ट्रॅटेज्या कराले त नाव बदलून टाकजा आमच्यावालं!!

पैसा's picture

12 Jan 2017 - 4:45 pm | पैसा

भारी आहे!

नितिन थत्ते's picture

12 Jan 2017 - 9:10 pm | नितिन थत्ते

अहो पण हा पुन्हा काळ्या पैशाच्या साडेचार टक्के कॅशवरचाच उपाय ना? काळ्या पैशाच्या निर्मितीवर काहीच नाही !!!

संदीप डांगे's picture

12 Jan 2017 - 9:17 pm | संदीप डांगे

त्याबद्दल दुसरा प्रतिसाद मार्मिक यांच्या धाग्यावर आहे.....

आर्रर्र... थांबा थांबा..... तुम्ही देशद्रोही. खुपसट काढलेच ना! =))