मिपाकरांच्या वाचनखुणा.
नमस्कार मिपाकरांनो,
नमस्कार मिपाकरांनो,
तू जीव माझा -
तू प्राण माझा -
घ्यावया
नच होतीस आली
मालूम होते मला
शौच्यालयात घुसता
मग सावरून बसता
मोबाइलात रमता
आलीस तू अवचिता
जवळि जवळ येता
मग कडकडून डसता
मम उष्ण रक्त प्रशिता
मेरा चैन-वैन सब लुटिता
वाजवून टाळिका
मी जीव तुझा - मी प्राण तुझा
- हरिला -
अल्विदा मच्छरिनी -
अल्विदा.

Storytel, Amazon audible बुक्स ह्या गोष्टी आपल्याला फारशा नवीन राहिलेल्या नाहीत, किमान ऐकून तरी माहित झाल्या आहेत. मी उत्सुकतेपोटी हे प्रकरण नेमकं आहे तरी काय हे बघावं म्हणून किमान ६ महिने वापरून बघितलं आहे. अनेकांनी मला विचारलं की “कसं वाटतं रे audio book ऐकताना?”, मी ही तेव्हा नेमका ह्याच प्रश्नावर विचार करत होतो. काहीतरी राहून जातंय असं काहीतरी जाणवायचं मला पण audio book ही सोय चांगली वाटायची. म्हणूनच मला त्याबद्दल नेमकं काय वाटतं हे ठरवायला बराच वेळ लागला.
1992 पासून मी दरवर्षी दिवाळी अंक विकत घेतो. सुरूवातीला काही वर्षे, म्हणजे साधारण 2006 पर्यंत, हवे असलेले सगळे अंक लगेच विकत घेत होतो, पण 2006-07 च्या सुमारास समजले की, डोंबिवली येथे मार्च-एप्रिल मध्ये, हेच दिवाळी अंक, कमी पैशांत मिळतात. त्यामुळे, 2-3 वाचनालयातून हे अंक गोळा करतो.
नमनाला, इतके तेल भरपूर झाले.
आता मुळ मुद्द्याकडे येतो....
ह्यावर्षी खालील अंक घेतले
एकदा जन्म झाला की आत्म्याच्या तोडीची म्हणता येईल अशी साथ आपल्याला देणारे अश्रूंशिवाय दुसरे काय असते. माध्यमं आणि भाषा यांनी कितीही उंची गाठली तरी व्यक्त होण्यातली अश्रूंची हुकुमत त्यांना कधीच साधता येणार नाही. अश्रू हा नात्यांचा पहिला पाया असतो. ज्या नात्यांनी डोळे कधीच पाणावले नाहीत ती सारी नाती खोटी!औचित्यभंग नको म्हणून मनुष्याला एकवेळ हसणं आवरता येईल, पण मनाचा वज्रबांध जमीनदोस्त करत गालावर ओघळणारा अश्रू भावनांचं गाठोड जपून ठेवण्याच्या भानगडीत पडत नाही. विद्युल्लते सोबत तेज चमकावे तसे भावनां सोबत अश्रू वाहतात. स्वतःला चाणाक्ष आणि व्यवहारी म्हणवणारे आपण जगाची किंमत पैशांत करतो.
- डॉ. सुधीर रा. देवरे
(दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ च्या शिवजयंतीच्या मुहुर्तावर माझी ‘सायको’ नावाची कादंबरी इचलकरंजीच्या ‘तेजश्री प्रकाशना’कडून प्रकाशित होत आहे. त्या कादंबरीतील विशिष्ट अंश दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ च्या ‘अक्षरनामा’त प्रकाशित झाला. तोच आजच्या ब्लॉगवर...) :
अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे सादरीकरण - अ १ ...पान १ ते ५
संत महंतांच्या जीवनावर आधारित काव्यातून किंवा गद्यातून केलेले लेखन पोथी लेखन म्हणून मानले जाते. अद्भूत रम्यता, पारलौकिक अनुभव, चरित्र नायकांचे अचाट किंवा अवास्तव वर्णन त्यांच्या भक्तगणांना मान्य असते. ते श्रद्धा भावनेने पोथी लिखाण वाचतात, पारायणे करतात. त्यांनाही अदभूत अनुभव येतात. ते खाजगीत सांगितले वा बोलले जातात. पण मुद्दाम ते सार्वजनिक करून सांगण्याचे साहस करायच्या भानगडीत पडत नाही... असो.
एक पोथी माझ्या वाचनात आली. यावर प्रकाश टाकावासा वाटला म्हणून सादर...
"श्रीपाद श्रीवल्लभ लीला वैभव" पोथी परिचय-
शालेय वयात असताना पेपरांत मनोरंजनाच्या पानावरती विजय तेंडुलकर लिखित ‘शांतता ! कोर्ट चालू आहे’ या नाटकाची जाहिरात नेहमी दिसायची. जाहिरातीची रचना आणि या वैशिष्ट्यपूर्ण नावावरून त्याबद्दल खूप उत्सुकता वाटायची. पुढे कॉलेज जीवनातही अधूनमधून ती जाहिरात पाहिली. पण ते नाटक काही पाहणे झाले नाही. कॉलेजच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केलेले ‘घाशीराम कोतवाल’ पाहिले होते. सन 2000 च्या सुमारास टीव्हीवर तेंडूलकरांच्या नाटकांवर आधारित काही कार्यक्रम पाहण्यात आले. तेव्हा त्या चर्चांमधील दिग्गजांनी ‘शांतता’चा आवर्जून विशेष उल्लेख केलेला आढळला. दरम्यान ‘तें’ ची काही मोजकी पुस्तके मी वाचली.
गतवर्षी मार्च ते नोव्हेंबर हा काळ आरोग्य-दहशतीचा होता. त्याकाळात घराबाहेरील करमणूक जवळपास थांबली होती. साहित्य-सांस्कृतिक आघाडीवरही शांतता होती. त्यामुळे घरबसल्या जालावरील वावर जास्तच राहिला. तिथे चटपटीत वाचनखाद्याला तोटा नसतो, पण लवकरच तिथल्या तेच ते आणि प्रचारकी लेखनाचा कंटाळा येतो. आता काहीतरी सकस वाचले पाहिजे असे तीव्रतेने वाटत होते. साहित्यिक पुस्तकांची ऑनलाईन खरेदी मी अद्याप केलेली नाही, कारण मला त्याद्वारे पुस्तक निवडीचा निर्णय घेणे कठीण जाते. प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन थोडेतरी चाळल्याशिवाय मी ते विकत घ्यायचे धाडस करीत नाही. डिसेंबरमध्ये सामाजिक वावर तसा वाढू लागला.