जगज्जेता [भावानुवाद - शतशब्दकथा]
सेकंदाला हजारो मैल इतक्या झंझावाती वेगाने ब्रह्मांडातून भरारी मारताना कॅप्टन विजयच्या मनात त्याने मिळवलेल्या दैदिप्यमान विजयांच्या सुखद स्मृती क्षणभर डोकावून गेल्या. लढाईच्या सहाव्या टप्प्यात दुष्मनाला लालूच दाखवत विस्तीर्ण पर्वतरांगांच्या कड्याकपारींमधे अडकवून त्यांच्यावर तोफगोळ्यांचा जोरदार भडिमार करताना दाखवलेली अफलातून कल्पकता! त्या दिवशी त्याला एका पाठोपाठ एक अशी तीन शौर्यपदके मिळालेली होती. पुढे मोजून तीन दिवसात ३१ डिसेंबरच्या त्या अविस्मरणीय रात्री कॅप्टन विजय कुमार या जगातला सर्वश्रेष्ठ योद्धा ठरलेला होता.