अभिनव वैचारिक शब्दप्रवास
रविवार दिनांक 22-9-2019 च्या सकाळ, सप्तरंग पुरवणीत प्रा. विनिता देशपांडे (पुणे) यांनी लिहिलेले माझ्या कादंबरीवरचे परीक्षण:
- विनीता श्रीकांत देशपांडे
रविवार दिनांक 22-9-2019 च्या सकाळ, सप्तरंग पुरवणीत प्रा. विनिता देशपांडे (पुणे) यांनी लिहिलेले माझ्या कादंबरीवरचे परीक्षण:
- विनीता श्रीकांत देशपांडे
प्रास्ताविक आणि मनोगत :-
राजकारणात पीए नावाची जमात म्हणजे जरा अवघड जागेचं दुखणं असतं. कारण त्यांना नेत्याच्या सगळ्या भानगडी माहीत असतात. त्याचा पैसा कुठून येतो, कधीपर्यंत टिकणार आहे ते कोणाच्या कोण सोबत त्याची सेटिंग आहे. अनेक ठिकाणी नेत्यांचा अर्धा कारभार हे पीए लोकंच निभावून नेतात. लोकसत्तेतलं दोन फुल एक हाफ किंवा महाराष्ट्र टाइम्स मधलं दिड दमडी मध्ये तंबी दुराई ने राजकारणावर केलेलं खुसखुशीत भाष्य तुम्ही कधी ना कधीतरी वाचलंच असेल, त्याच तंबी दुराई म्हणजे श्रीकांत बोजेवार यांची पावणेदोन पायांचा माणूस हि कादंबरी सुद्धा तशीच चिमटे काढणारी आहे.
शुभ्र रुपेरी हव्यात लाटा बटाबटांच्या डोक्यावरती
नकोच तेव्हा काळीकुरळी बट डोळ्यावर सळसळणारी
शेलाटीशी रेघ वक्रशी हातावरती उमटून जावी
टिचकी मारून गिरकी घेता झोका माझा खाली यावा
डोळ्यांवरती जरा खालती ग्रहण हवे मज चंद्राचे
त्या ग्रहणाला मोक्ष नसावा, केवळ अनुभव साक्ष असावा
नाजुक साजुक पेरांवरती खोडावरचे रिंगण यावे
साल कोवळी मधुमासाची गंध फुलांचा उडून जावा
पोटामधले उदंड पाणी खळखळ अवघी डोळ्यांमधली
एक मोजता दुजी उठावी लाट बोलकी मिटून जावी
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.....
मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर
लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर
सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात
घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस....
तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे
बघू देत लोकांना देवांना साधुंना
माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून
तिच्या देहात लयदार मिसळताना.....
नारायण धारपांच्या " नेनचिम " ही विज्ञान काल्पनिका कादंबरीत अतिप्राचीन काळात चंद्रावर मनुष्यसदृश्य जातीची वसाहत होती अशा विषयावर आधारित आहे ... त्या जातीची खूप वैज्ञानिक प्रगतीही झाली होती .. त्यातच त्यांचा ग्रह कालांतराने जीवनासाठी अयोग्य होणार , सर्व जीवित नष्ट होणार असा शोध तिथल्या शास्त्रज्ञांना लागतो आणि तिथे हलकल्लोळ माजतो ... हळूहळू परिस्थिती नियंत्रणाखाली येते आणि या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी एक मोठी शास्त्रज्ञांची संघटना उभारली जाते ... वसतीयोग्य असा दुसरा ग्रह शोधणं त्यांना शक्य होत नाही ...
भाग १ : http://misalpav.com/node/45068
असतो मा सद्गमय
तमसो मा ज्योतिर्गमय
मृत्योर्मामृतम् गमय
बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28
म्हणजेच
मला असत्याकडून सत्याकडे ने
अंधाराकडून प्रकाशाकडे ने
मृत्यूकडून अमरत्वाकडे ने
देवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला
पहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला
दिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला
बोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला
देव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते
त्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते
समईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती
मध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती
हार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो
मागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो....
-शिवकन्या
मूळ कवीता आशयसंपन्न आहे,हा फक्त साचा तिथून उचलला आहे...
*******
नेहमीच मुदलातून वाचण्याची नाही हौस
अफवा मूळ शोधण्याचा मज नाही सोस
मूळ बातमी शोधण्यात कसली आलीय (?) मौज
भरपेट मीठ मसाला सुद्धा मिळत नाही रोज
सोसायटीत (मला)ओळखीत कुणीच नाही
जालात तर नाव सुद्धा घ्यायचे नाही
विधायक पाहण्यात तर मला रस नाही
दिप पणती भेटण्याचा मला आनंद नाही
विघ्नसंतोषी तरी प्रसिद्धीचा सुटेना वसा
मंगल दाखवून तुम्हीच दिला घुस्सा
अनुमान खालावले तर्कबुद्धी खुंटली
आत्ता मात्र हाव सुद्धा प्रखर वाढली