नेनचिम - विज्ञान कादंबरी
नारायण धारपांच्या " नेनचिम " ही विज्ञान काल्पनिका कादंबरीत अतिप्राचीन काळात चंद्रावर मनुष्यसदृश्य जातीची वसाहत होती अशा विषयावर आधारित आहे ... त्या जातीची खूप वैज्ञानिक प्रगतीही झाली होती .. त्यातच त्यांचा ग्रह कालांतराने जीवनासाठी अयोग्य होणार , सर्व जीवित नष्ट होणार असा शोध तिथल्या शास्त्रज्ञांना लागतो आणि तिथे हलकल्लोळ माजतो ... हळूहळू परिस्थिती नियंत्रणाखाली येते आणि या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी एक मोठी शास्त्रज्ञांची संघटना उभारली जाते ... वसतीयोग्य असा दुसरा ग्रह शोधणं त्यांना शक्य होत नाही ...