महाराष्ट्राचा गवगवा वाढत आहे

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
8 Jan 2020 - 3:54 pm

मी मागे एक महाराष्ट्रीय स्त्री जेव्हा देशाची लाज काढते ? :( नावाचा लेख लिहिला. इंटरेस्टींगली संदर्भाचा व्हिडीओ कदाचित माजी पाकिस्तानी राजदूतांनी चुक उमगल्या नंतर कधितरी हळूवार डिलीट केला त्यामुळे त्या लेखात पोक्ळी निर्माण झाली होती. त्याच महाराष्ट्रीयन स्त्री लेखिकेस स्वदेश विरोधाचे काम सध्या कसे चालू आहे हे माहित नाही पण केवळ स्वदेश विरोध पुरेसा नसतो त्याचा गवगवाही झाला पाहिजे तर गवगवा चालू ठेवणारे आणखी नव्या मराठी कथालेखिकेचे नाव पुढे आले आहे.

तर सदर मराठी लेखिका हिवाळ्याची गार हवा खाण्यासाठी बाहेर निघते. प्रसिद्ध जे एन यु शहरी डाव्या नक्षलींच्या समर्थनार्थ मुंबईत मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया परिसरात एक सभा होणार असते. तिथे नक्षल कलाकार मंडळींचा जथा सभे दरम्यान टिव्हीवर झळकवता आणि झळकता येईल असे पोस्टर्स कि प्लाकार्ड नावाच्या पाट्या बनवत असतात काही कुणि वाली न मिळालेल्या पाट्या इतस्ततः विखुरलेल्या असतात त्यातील सहृदयी लेखिका नेमकी चांगल हस्तलेखन पाहून तिच्या स्वतःच्या सहृदया प्रमाणे उर्वरीत भारतीयांचे दुष्ट हृदय सहृदयात परिवर्तन करण्याच्या उदात्त हेतुने 'फ्री काश्मिर' नावाची पाटी उचलते आणि प्रदर्शित करण्यासाठी उभी रहाते.

प्रखर पत्रकारीतेची रक्षक एनडिटीव्ही वाहिनी या नवख्या स्त्री निदर्शकाच्या हातातील फ्री काश्मिरची पाटी उत्साहाने देशभर झळकवते. स्पर्धेत राजदिप सरदेसाईंच्या इंडिया टुडे आजतक चा वार्ताहार मागे कसा राहील तो हसत हसत पुढे सरकतो आणि फ्रि काश्मिर ची पाटी कशा संदर्भात आहे हे विचारतो. तर या सुहास्य वदनेच्या हातात टिव्हीवरील तो प्रसंगी प्रश्न विचरणार्‍या पत्रकाराचे स्वागत करण्यासाठी निसर्ग की इश्वर कृपेने अचानक एक फुल येते ज्याने ती पत्रकाराचे स्वागत करते. पत्रकार तिला विचारतो की महनीय स्त्री तुझे हे फ्री काश्मीरया पाटीचा अर्थ इंटरनेट विषयक बंधनातून काश्मिरची सुटका असा आहे का तर त्यास ती नाही नाही इतरांना जसे स्वातंत्र्य लाभते तसे सर्वांना लाभावे ह्यास माणुसकीची झालर असल्याचे स्मीतपुर्वक फुल दाखवत सांगते.

नंतर भारतातील पाषाण हृदयी भारतीय विवीध माधमे, समाज माध्यमातून तिची निंदा नालस्ती करतात -त्यात काही पाषाण हृदयी माजी मुख्यमंत्रीही हि कोण कुठली असे काही माहिती न घेता टिका करतात असे (कोण कुठली आहे माहित नसताना टिका करणे बरोबर आहे का?)

पाषाण हृदयी लोकांच्या दुष्टाव्याने गहिवरुन मग ती स्वतःचा व्हिडीओ जारी करते एन डि टिव्ही तिच्यावरील पाषाण हृदयी भारतीयांच्या हल्ल्यास परतवणारी मुलाखत ती देते त्यातून ती पोस्टर तिने स्वतः बनवले नाही अकस्मिक आढळले होते हे पुन्हा पुन्हा आळवते. मी महाराष्ट्राची मराठी मुलगी आहे तेव्हा माझे विचार सेपरेटीस्ट कसे असू शकतील मी तर केवळ मानवतेचा दृष्टीकोण मांडत होते. आणि इंटरनेटसारख्या जाचक बंधनांपासून मुक्तता असा फ्री काश्मिर पाटीचा अर्थ होता असे सांगते. कथा लेखिकाच कथा लेखिका शब्द जरासे बदलल्याने फरक कुठे पडतो. एन डि टि व्ही पत्रकार तिला तिच्या कुटूंबींयांचा आधार सपोर्ट आहे का विचारतो त्यास हो हो अगदी आहेना असे उत्तर देते (पण प्रत्यक्षात माहेरचे कुटूंब दुर्दैवाने बर्‍याच वर्षांपुर्वी देवाघरी गेलेले असते सासरच्यांशी घटस्फोट घेतलेला असतो) तर घरात सपोर्ट देणार्‍या अपत्याशिवाय कोण ते देव जाणे पण त्या काश्मिरींशी असलेल्या व्यावसायिक संबंधांना मिडिया अनावश्यक प्रसिद्धी देण्याचा दुष्टपणा करतो हे असे मिडियाने आणि सोशल मिडियाने करणे कसे बरोबर असू शकते?

तर एकुण प्रभूंच्या व्यथा जाणून प्रभूंवर मुख्यप्रभू आणि प्रभूपुत्र प्रसन्न होतात सबंध भारतात महाराष्ट्राचा एवढा गवगवा होत असताना जळणार्‍या तुच्छ पाषाण हृदयी भारतीयांच्या समाधानापुरती कारवाईचे कागदी घोडे फिरवून त्यांची जागा त्यांना दाखवून देतात

मन सकारात्मक असेल तर सगळे चांगलेच दिसेल आहे की नाही! चला नावारुपास येऊ घातलेल्या महाराष्ट्रास जुना तथाकथित देशप्रेमी महाराष्ट्र मागे टाकून नव्या महाराष्ट्राचा गवगवा अनुभवा.

संस्कृतीधर्मइतिहासवाङ्मयमुक्तकसाहित्यिकबातमी

प्रतिक्रिया

तुम्ही तथाकथित बुद्धीवादी आहात का ? तुम्ही तथाकथित विचारवंत आहात का ? तुम्ही इतर कोणत्याही देश उपयोगी कार्यक्रमात न दिसाणारे परंतु देशविघातक रॅली मध्ये आवार्जुन भाग घेणारे बॉलिवूड कलाकार आहात का ? जरा कुठे खुट्ट झाल कि तुम्ही विचार स्वातंत्र्य, प्रदर्शन स्वातंत्र्य यावर ट्विट करुन देशाला उपदेश देता का ?
वरील प्रश्नांचे उत्तर जर नाही असेल तर तुम्हाला काश्मिर बद्धल जिव्हाळा, ममत्व, चिंता आणि काळजी करणार्‍या, त्रिभुवनात एकमेव असलेल्या त्या रणरागिणीच्या भावना कश्या बरे समजतील ?

असो...

लोकांचे मनोरंजन करण्यासाठी खाली उपाय योजना करुन जात आहे :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mushkil Bada Yeh Pyaar Hai... :- Gupt

मदनबाण, बाहेरचे तर बाहेरचे महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची आडनावे देशाच्या एकसंघतेस खिळखिळ्या करु इच्छित बाजूंनी दिसली कि स्वतःच्या पंचेंद्रीयांवर विश्वास ठेऊ नये वाटते पण जे होते ते सत्यही आहे. अनेक मराठी आडनावे मंडळी हिंदी इंग्रजीतून बोलताना दिसणारी देश विरोधी वक्तव्यात दिसली की खरेच मराठी आहेत का तपासून पहातो मूळची मराठी कुटूंबातलीच आहेत हे पाहिले कि वैषम्य वाटते.

केवळ माध्यमांचा प्रभाव आहे, पालक चुकताहेत की देशाच्या एकात्मतेची आस देण्यास गुरुजन अपयशी होत आहेत ? अपयश नेमके कुणाचे आणि नेमकी कारण मिमांसा काय आहे ?