महाभारत प्रवचन माला - मंगला ओक

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
6 Feb 2020 - 8:54 pm

महाभारत प्रवचन माला ब्लॉग १ब्लॉग२

मंगला ओक यांचा परिचय आपणांस अंधारछाया या कादंबरीतून झालेला आहे. त्यांच्या नंतरच्या जीवनातील पुण्यातील वास्तव्यात मी व माझी बहीण *सुनीता ओक उर्फ नंदा करमरकर यांनी आईला आग्रह करून तिच्या स्मृती व्याख्यान रुपात नोंद करून ठेवल्या. आमच्या विनंतीला मान देऊन आईने तिच्या जवळील मोबाईलवर या प्रवचनांचे रेकॉर्डिंग तिचे तिनेच केले. त्याला पूरक अशा काही व्हिडिओ क्लिप्स मधून त्या त्या दिवसाचे कथानक थोडक्यात काय तेही तिने नंतर करून ठेवले.
कालांतराने त्या कथनांचे दोन ब्लॉग बनवले गेले. त्याच्या लिंक्स वर सादर आहेत.

कालांतराने ते कथन पुसले गेले. अनेकदा आम्हाला ऐकायला हवे अशी मागणी आईच्या चाहत्यांकडून होत राहिली. म्हणून पुन्हा दुसऱ्या एका साईटवरून ते पुन्हा तयार करून सादर केले होते. त्यालाही वर्षे लोटली.

आईच्या कथनातील भागांचे श्रवण कानात खुंट्या घालून सायंकालीन फिरताना तिच्या आवाजाच्या स्मृतीमधून तिला प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद होत असे.
अनेक भागातील एक उत्तंक नामक ऋषीं आणि श्रीकृष्ण यांचा संवाद मला भावला. (रेकॉर्डिंग २७.९)

महाभारत युद्ध झाल्यावर श्रीकृष्ण द्वारकेला परतत असताना एका मरुस्थलापाशी त्यांचा उत्तंकाशी संवाद झाला. 'तू प्रत्यक्ष हजर असताना हे संहारक युद्ध तू का टाळू शकला नाहीस'? म्हणून त्यांनी श्रीकृष्णांना दूषण दिले. नंतर श्रीकृष्णांना शाप देण्यापर्यंत गोष्ट गेली! पुढे काय झाले? ते संक्षिप्तात आईच्या मुखातून ऐकल्यावर एक उत्सुकता जागृत झाली की प्रत्यक्ष महाभारत ग्रंथात ही कथा कशी नोंदली गेली ? तेही शोधून इथे सादर केले. तेंव्हा आईने त्या कथेला संक्षिप्तात सादर करताना किती कष्ट घेतले असतील याची झलक मला मिळाली.

हे कथन एकूण २३ तासांचे आहे. ऐकायला व शोधायला सोईचे व्हावे म्हणून दोन ब्लॉग मधून सादर केले आहे. ते शोधायला सोईचे व्हावे म्हणून
Shashikant Oak at a Glance या weebly.com साईटवर त्या ब्लॉगरच्या लिंक्स उपलब्ध आहेत.

मिपाकरांपैकी कोणी त्यातील एक दोन कथने जरी ऐकली तरी मला आईच्या कष्टांचे सार्थक झाले असे वाटेल.

* कादंबरीतील घटनांच्या नंतरच्या काळात मला एक बहिण मिळाली.

वाङ्मयविरंगुळा

प्रतिक्रिया

समीर वैद्य's picture

7 Feb 2020 - 3:20 am | समीर वैद्य

पण नक्की ऐकणार

शशिकांत ओक's picture

2 Mar 2020 - 4:26 pm | शशिकांत ओक

आपणास ऐकायला सवड मिळाली असेल तर