आठवणीतील मराठी (इमेल) ग्रूप्स आणि संस्थळे
खर म्हणजे मागच्याच महिन्यात इंटरनेट चा उदय होऊन पंचविस वर्षे झाली. सर्नचे अभियंता टिम बर्नर-ली यांनी १९९० मध्ये आंतरजालाची सुरुवात केली[१]. सर्न या संस्थेने ३० एप्रील १९९३ पासून आंतरजाल संकल्पना सर्वांना मुक्त केली.[२] सायबर विश्वात मराठीचे पहिले पाऊल रोवण्याचा मान ‘मायबोली‘ या संकेतस्थळाला जातो. १९९६ मध्ये (www.maayboli.com) हे संकेत स्थळ सुरू झाले[३] म्हणजे मराठी आंतरजालावर येऊनही जवळपास १८ वर्षे झाली.