नमस्कार मित्रांनो...
आज काल सगळ्यांच्याच खिशात स्मार्ट फोन विसावलाय, (विसावलाय कसला :-) ) किंवा ज्यांच्या कडे नाहि ते सुध्दा स्मार्ट फोनच घ्यायचा विचार करतायेत तसेच ज्यांच्या कडे आहे ते त्यांच्या माॅडेल ला कंटाळलेत, मार्केट मधे ईतक्या व्हरायटीज आहेत कि गोंधळुन जायला होतं, नेट वरिल रिव्हयुज पण एका मर्यादे पर्यंत मदत करतात कारण तेहि बर्याचदा पेड असतात,
तर या सगळ्यांन वर आपण मिपाकर एक मेकांची मदत करु शकतो BaseMark OS II हे टुल वापरुन, कदाचीत बर्याच जनांना कंम्प्युटर साठी असलेले belark adviser आठवत असेल त्याच धर्तीवर हे टुल काम करते. हे एक क्राॅस प्लॅटफाॅर्म टुल असुन Android, iOS व Windows Mobile साठी उपलब्ध आहे
http://www.rightware.com/consumer/basemark-os-ii/
हे अॅप. प्ले स्टोर, अॅप स्टोर व विंडोज मार्केट प्लेस वर उपलब्ध आहे या फ्रि व्हर्जन मधे overall performance, system performance, memory performance, graphic performance, व camera performance या टेस्ट घेता येतात.
तर हे भन्नाट app आपल्या मोबाईल मधे डाऊनलोड करा व टेस्ट रिझल्ट्स मिपा वर शेअर करा , मोबाईल,टॅब चे माॅडेल सांगायला विसरु नका :-)
टेस्ट कंप्लिट व्हायला 5 मिनीट तरि लागतात..पेशंन्स ठेवा.
मी सध्या micromax चा canvas 2 वापरतोय त्याचे रिपोर्ट कार्ड..... :_(
अजुनही काहि वेगळे साॅफ्टवेअर माहित असल्यास नक्कि सांगा
प्रतिक्रिया
22 Jan 2014 - 11:02 am | llपुण्याचे पेशवेll
नवीन माहीतीबद्द्ल धन्यवाद. असे काही टूल अस्तित्वात असेल असे वाटले नव्हते. परंतु मोबाईल घेताना असे टूल वापरून त्या मोबाईलची कार्यप्रवणता माहीती करणे अवघड वाटते. त्यासाठी हे टूल वापरून त्याचा विदा स्वतःहून पुरवणार्या प्रत्यक्ष वापरकर्त्यांच्या औदार्यावर अवलंबून राहावे लागणार हे ओघाने आलेच. परंतु ज्या वस्तू सध्या आपण वापरतो त्याची पडताळणी या टूल द्वारा नक्की करता येईल.
धन्यवाद जोशी.
22 Jan 2014 - 11:14 am | मुक्त विहारि
माझ्या द्रुष्टीने, मोबाईलचा उपयोग हा ऐन वेळी संभाषण करायला म्हणून योग्य.
फोन घेणे आणि फोन करणे, इतपतच मी मोबाईलचा उपयोग करतो.
आणि त्या साठी नोकिया १११० योग्य आहे.
आणि तसेही फेसबूक किंवा इंटरनेट वरील वाचनासाठी पी.सी. किंवा लॅपटॉप जवळ असतोच.
त्यामुळे स्मार्ट फोनचा नक्की उपयोग काय? हेच अद्याप समजले नाही.
जाणकारांच्या प्रतिसांदाच्या अपेक्षेत. (स्पा आणि नानबा यांनी ह्या वर प्रकाश टाकला तर बरे.)
23 Jan 2014 - 10:42 am | धन्या
+१
मी दैनंदीन वापरासाठी अगदी बेसिक फोन वापरतो. काळीमिरीचा वापर एमपीथ्री प्लेयर म्हणून करतो.
23 Jan 2014 - 1:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्मार्ट फोन च्या काळात धन्यासेठ फोनचा वापर ऐकने आणि बोलणे
करतात हे वाचून धक्का बसला आहे, निषेध म्हणून मी आज रात्रीचं जेवण घेणार नाही. :(
-दिलीप बिरुटे
23 Jan 2014 - 1:18 pm | अनिरुद्ध प
काळीमिरी?
23 Jan 2014 - 2:22 pm | धन्या
आमच्या हरामखोर मित्रांनी आमच्या ब्लॅकबेरीचा लिलाव करताना वापरलेलं नाव आहे ते.
23 Jan 2014 - 5:01 pm | बॅटमॅन
काळीमिरीपेक्षा काळंबेरं हे जास्त योग्य नाव आहे ;)
22 Jan 2014 - 3:26 pm | टवाळ कार्टा
Karbonn K12+
Overall = 121
System = 547
Memory = 84
Graphics = 85
Web = 55
किंमत रु.४९९९/- (on Flipcart.com) :)
22 Jan 2014 - 4:48 pm | कवितानागेश
फ्लिप्कार्टवर सगळ्या फोन्स चे व्यवस्थित रिव्ह्यू आहेत. ते बघा.
आमच्याकडे sony xperia M आहे. चांगला आहे.
22 Jan 2014 - 8:32 pm | जोशी 'ले'
फ्लिपकार्ट किंवा स्नॅपडिल सारख्या साइट्स वर रिव्ह्युज नसतात तर स्पेसिफिकेशन्स असतात जे कंपनीने डिक्लियर केलेत तेच...
तसं तर माझ्या Micromax A110 चा कॅमेरा चांगल आssठ मेगापिक्सल चा आहे :-D
23 Jan 2014 - 12:40 am | कवितानागेश
त्याच स्पेसिफिकेशन्स्च्या खाली रिव्ह्यूज असतात.
तो फोन मागवून वापरणाया लोकांनी लिहिलेले. बरे वाईट सगळे.
शिवाय गेमिन्ग्वाल्या लोकांनी शिव्या घातलेल्यापण वाचायला मिळतील.
23 Jan 2014 - 8:16 am | जोशी 'ले'
सहमत आहे, अत्ता पण तेच रिव्ह्यूज वाचुन मत बनवायला लागते, पण हे टुल वापरुन बघायला काय हरकत आहे?...जसे माझ्या हापिसातल्या एकाचा sony zr चा ओव्हराॅल परफाॅरमन्स 1024 आहे तर celcone च्या एका स्वस्त 7000 रु. च्या 5 " स्क्रिन वाल्या फोनचा 190 आहे तर माझ्या फोनचा 96 :_( तुमच्या फोन चा नक्कि 400+ असनार :-)
23 Jan 2014 - 10:47 am | धन्या
हे रिव्ह्यूज निर्णय घेताना मदत करण्याच्या ऐवजी अधिक गोंधळात टाकतात. लोक अशी उलट सुलट मतं मांडतात की आपल्याला "मैं कहा हूं" म्हणायची वेळ येते.
23 Jan 2014 - 12:47 am | कवितानागेश
उदाहरनार्थ इथे
http://www.flipkart.com/sony-xperia-e/product-reviews/ITMDGZK3GNH2TUWE?p...
22 Jan 2014 - 5:43 pm | जादू
काही काळापुर्वी मि.पा वर मोबाईल अप्स विषयी माहीती आली होती, त्याची लिंक मिळू शकेल का?
22 Jan 2014 - 6:38 pm | टवाळ कार्टा
http://misalpav.com/node/23241
22 Jan 2014 - 6:34 pm | भाते
जर तुम्हाला अॅन्ड्रॉईड अप्स विषयी माहिती हवी असेल तर ती इथे मिळु शकेल.
22 Jan 2014 - 8:14 pm | नांदेडीअन
Quadrant, Antutu, 3D Mark ही अजून काही उदाहरणं Benchmarking apps ची.
23 Jan 2014 - 6:22 am | वात्रट मेले
technosavy लोकांसाठी http://www.thinkdigit.com/ ही चांगली website आहे. सर्व नविन mobiles and gadgets ची चांगली माहिती मिळ्ते.
23 Jan 2014 - 10:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडी चा विषय. अप्लिकेशन टाकतो
-दिलीप बिरुटे
23 Jan 2014 - 3:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दाखवेना...! अप्लिकेशन चालना. :(
-दिलीप बिरुटे
23 Jan 2014 - 3:45 pm | टवाळ कार्टा
चाल्ते की
23 Jan 2014 - 4:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रिझल्ट म्हटल्यावर स्क्यान केल्यासारखं दहा मिनिताच्या पुढे दोनदा वाट पाहिली पण माझ्या मोबाईलची ताशीर त्याला काही समजेना :(
एक तर 44 MB साठी 3G नेटावरून डाऊनलोडासाठी लै वेळ लागला, ब्याट्री उतरून गेली, पैसे कपात झाले ते वेगलेच. रागारागाने अप्लिकेशन अनइंस्टाल केले :(
आता वायफायवरुन
चान्स घेऊन पाहतो.
-दिलीप बिरुटे
(लै लवकर राग येणारा)
23 Jan 2014 - 9:05 pm | जोशी 'ले'
थोडा पेशन्स ठेवा :-) थोडा वेळ लागतोच
23 Jan 2014 - 7:57 pm | कंजूस
स्माटफोन हे वापरणाऱ्यांना उल्लु बनवतात आणि अॅप्सकंपन्या ,फोनकंपन्यांना सतत श्रीमंत बनवतात असे माझे स्पष्ट मत आहे .
स्मार्टचा जनक जॉब्स याला त्याच्या 'आयट्युन्स' या म्युझिक कंपन्यांना त्यांचे हक्काचे पैसे ( ३ पैकी २ डॉलर आयफोनला आणि १डॉलर आर्टिस्टला मिळवून दिले या कलपनेला श्रेय देतात .
(बाकी आहे .)
25 Jan 2014 - 7:25 pm | कंजूस
स्माटफोनची तुलना त्याच्यातल्या प्रसेसरने होते .मिडिआटेक /क्वॉलकॉम/इंटेल आणि त्याचा नंबर .
फोनची कंपनी मोठी आहे पण जर त्यांनी मिडिआटेक ड्यूल /क्वॉडकॉर प्रसेसर वापरला असेल तर त्याची तुलना क्वॉलकॉम असणाऱ्या मॉडेलशी करता येणार नाही .त्याचे अंटुटु बेंचमाक पाहू नका .
काही मॉडेलचे परीक्षण "Gogi dot in "पाहा .
28 Jan 2014 - 10:13 pm | पैसा
४५ एम्बी चं अॅप्लिकेशन फोन मेमरीत टाकण्याऐवजी http://www.91mobiles.com/ असल्या एखाद्या साईटवर पण स्कोअर बघता येतो की!
28 Jan 2014 - 10:40 pm | जोशी 'ले'
या अॅप चा वापर समजुन घ्या, या अॅप द्वारे तुम्हि स्व:त मोबाईल चा performance audit करु शकतात, तो जर ईथे शेअर केला तर मिपाकरांना फायदाच होईल...मी स्वत: जे बघीतलेय त्यात जवळपास एकाच सेगमेंट मधले व स्पेक्स मधल्या मोबाईल ची तुलना केल्यास मायक्रोमॅक्स पेक्षा कार्बन व कार्बन पेक्षा सेलकाॅन चे रिझल्ट्स चांगलेय :-) तर सॅमसंग पेक्षा सोनी चे रिझल्ट्स चांगलेय..
बर्याच साईट्स वरचे रिव्ह्युज पेड असतात व बर्याच कंपन्या फेकु असतात जसं आता सगळेच जवळपास 8 mp कॅम देतात (छापायला काय जाते) पण आहे का तो 8mp त्या पेक्षा तर नोकिया चा 3.15 Mp बरा.. तर जरा बघा आपल्या मोबाईल चा स्कोर व शेअर करा , होऊ दे 44 Mb खर्च ;-)
29 Jan 2014 - 8:14 am | कंजूस
आपल्या मोबाईलचे परफॉमन्स पाहायला ४४ एमबि चे एप कशाला !
बरोबर .
डब्बा फोन आणि कैमरा आहे हा रिझल्ट आला तर काय टाकणार आहे का ?
पैसेंजर गाडीत बसून पोहोचायला किती वेळ लागतो पाहाण्यासाठी स्टॉपवॉच कशाला हवे ?
सध्या
दहा हजारात साठी
१)नोकिआ लुमिआ ५२०/५२५
२) सैमसंग डयुओस २ ७५८२
३)जोलो क्यु ८००
आणि थोडे महाग
१)मोटो जी
२)सोनी इक्स्पेरिआ एम
३)मायक्रोमैक्स टर्बो
विचार करण्यासारखे आहेत .
29 Jan 2014 - 10:43 am | नांदेडीअन
Xolo Q800 पेक्षा Q700 चांगला आहे.
29 Jan 2014 - 9:32 am | जोशी 'ले'
विषय कल्लाच नाय काय ...बोला टाकायचा नाय कै ,पुढच्यास ठेच मागचा शहाणा या प्रमाणे मदत करा
29 Jan 2014 - 9:36 am | जोशी 'ले'
अन् 19-20 हजार टाकायचेत मायक्रोमॅक्स नावाची कंपनी आहे हे विसरुन जा .
29 Jan 2014 - 10:22 am | कंजूस
मला असं म्हणायचं आहे की आपलं एक बजेट असतं .दुकानदार त्या रेंजमधले सर्व चालू फोन दाखवतो .
एकात हे आहे आणि ते नाही असा प्रकार आहे . तरीही आपण घेतोच .
कोणती गोष्ट नाही म्हणून अडणार आहे का नाही याचा विचार करायचा .
29 Jan 2014 - 10:32 am | जोशी 'ले'
माफ करा मला वाटतं कि धागा विषय व उद्देश पोहचवण्यास कमी पडलो :_(
29 Jan 2014 - 10:57 am | पैसा
माझ्याकडे एक जुना सॅमसुंग गॅलेक्सी वाय फोन आहे. त्यात तर एवढी फ्री शिल्लक मेमरीच नाहीये! दुसरा कार्बन ए१५ आहे. त्यात मेमरीचा प्रॉब्लेम नाही पण माझा अनुभव असा की एक अॅप इन्स्टॉल आणि अन इन्स्टॉल केलं की थोडीशी मेमरी कमीच होते. या अॅप्सचे काही रेसिड्यूज शिल्लक रहात असावेत. ती परत मिळवता येते का?
29 Jan 2014 - 11:14 am | नांदेडीअन
App Cache Cleaner वापरा.
जर असे 3rd party app वापरायचे नसेल तर कोणतेही App uninstall करण्याआधी App Manager मधून ते App थांबवा, स्टॉप करा आणि मग त्याचा Data & Cache उडवा.
30 Jan 2014 - 3:10 pm | मदनबाण
माझा अनुभव असा की एक अॅप इन्स्टॉल आणि अन इन्स्टॉल केलं की थोडीशी मेमरी कमीच होते. या अॅप्सचे काही रेसिड्यूज शिल्लक रहात असावेत. ती परत मिळवता येते का?
पै तै... या ठिकाणी दिलेले Clean Master (Cleaner) - FREE वापरुन पहा. अॅप अनइस्टॉल करताना रेसिड्यूज डिलीट मारायचे का ? हा पर्याय यात आहे. जर तुझ्या फोन मधे बोल्टवेअर असतील तर ते जागा खातात्,त्यांना काढण्यासाठी रुट अॅक्सेस हाच एक पर्याय आहे.
जाता जाता :- जर तुमचा फोन नेटला कनेक्टेड असेल तर गुगल तुमच्या फोन मधले त्यांना हवे ते अॅप अनइनस्टॉल करु शकते हे तुम्हाला ठावुक आहे का ?
31 Jan 2014 - 8:07 pm | पैसा
म्हणजे फोन रूट करणे आवश्यक!
29 Jan 2014 - 12:04 pm | कंजूस
धागा पुन्हा वाचला .ठिक आहे .अमुक एक अॅप सांगेल परफॉरमन्स .ते प्रत्येकाने आपल्या मॉडेलचे द्यायचे आहे .
मी एवढेच म्हणेन की रोज नवीन मॉडेल्स बाजारात येतात ते घेण्याअगोदर याचे सर्व बेंचमार्कस त्याच दिवशी काही वेबसाईटवर येतात ते पाहू शकता .आणि तुमच्याकडच्या मॉडेल्सचेही डेटा आहेतच .
ते वाचून आपण ठरवायचे कमीतकमी वाईट कोणता आहे .
कोणत्याही मॉडेलचे वाईट गोष्टी सांगणाऱ्या (चांगला रिव्यु)वेबसाईटही आहेत .
29 Jan 2014 - 12:06 pm | जोशी 'ले'
ओके
29 Jan 2014 - 6:23 pm | कंजूस
पन्नासच्या वर डिवाईसचे डेटा रिव्युसह
येथे
(१)http://www.gogi.in/tag/video-review/
आहेत .
29 Jan 2014 - 8:35 pm | जोशी 'ले'
तुम्हाला खरच कळलं नाहिये का मला काय म्हणायचेय ते?
29 Jan 2014 - 8:59 pm | कंजूस
नाही .
जाऊ द्या .
30 Jan 2014 - 2:22 pm | स्पा
माहितीपूर्ण धागा
:)
31 Jan 2014 - 8:22 pm | मुक्त विहारि
काही तरी प्रकाश टाका की राव...