काही प्रश्र्न......

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
12 Mar 2014 - 8:08 pm
गाभा: 

गेली कित्येक वर्षे काही प्रश्र्न मनांत आहेत.

१. गुजरात मधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर आग गाडी जाळलीच नसती तर दंगल झाली असती का?

२. मुझफ्फर नगर दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे जाट मुलीची छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का?

३. आज काल हिंदी सिनेमांतील हिंदू नायकांचे प्रमाण कमी का झाले आहे?

४. अफगणीस्तान मधील मुर्तींचा नाश केला गेला तेंव्हा, भारताची नक्की भुमिका काय होती?

५. काश्मीर मधील हिंदूंचे प्रमाण अचानक कमी का झाले?

६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले?

७. भिवंडी, मुंब्रा ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत?

८. पाकिस्तान आणि बांगला देशातील हिंदूंचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या क्रिकेटच्या संघात हिंदू व्यक्ती का नसतात?

९. गुन्हेगारीत हिंदू व्यक्तींचे लोकसंख्येच्या प्रमाणात, भाग का नसतो?विशेषतः सामुहीक बलात्कार आणि स्त्रियांची छेड छाड.

१०. तेलाच्या आणि सोन्याच्या आयातीचा, भारतीय अर्थ कारणावर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी तेल आणि सोने आयात केले तर, आपला रुपया बलवान होईल का?

मला ह्याची उत्तरे माहीत नसल्याने, क्रुपया कुणी दिलीत तर फार बरे.

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

12 Mar 2014 - 8:31 pm | आदूबाळ

८. पाकिस्तान आणि बांगला देशातील हिंदूंचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या क्रिकेटच्या संघात हिंदू व्यक्ती का नसतात?

हिंदूंचे प्रमाण स्थलांतरामुळे कमी झाले असावे.

क्रिकेट संघात हिंदू व्यक्ती असतात ना. पाकिस्तान संघातला जुना विकेटकीपर अनिल दलपत आणि सध्याच्या संघातला फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया ही चटकन आठवणारी उदाहरणं.

१०. तेलाच्या आणि सोन्याच्या आयातीचा, भारतीय अर्थ कारणावर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी तेल आणि सोने आयात केले तर, आपला रुपया बलवान होईल का?

हा प्रश्न नीट कळला नाही. रुपया बलवान म्हणजे नक्की काय? "स्थिर" याअर्थी बलवान का?

डॉलर/पाऊंड/युरोच्या तुलनेत दुसर्‍या चलनाचे किती युनिट्स मिळतात हा बलवानतेचा निकष नाही. [समजा, उद्या "होन" असं नवीन चलन काढून त्याची किंमत ठेवली आजचे शंभर रुपये, तर १ होन = $०.६५ अशी किंमत होईल. पण याचा अर्थ होन हे रुपयापेक्षा सरस चलन ठरत नाही.]

एका येनची डॉलरच्या तुलनेत किंमत खूपच कमी आहे, पण येन हे जगातले एक बलवान चलन आहे.

तेलाची / सोन्याची आयात कमी करून "बॅलन्स ऑफ पेमेंटस" सुधारेल, हे नक्की.

मुक्त विहारि's picture

12 Mar 2014 - 10:13 pm | मुक्त विहारि

"स्थिर" याअर्थी बलवान का?

हो. बहूदा अर्थ कारणात, एखादे चलन "स्थिर" असणे, म्हणजेच ते चलन "बलवान" असते, असे मला वाटते.नक्की असेच असते का? हे इथले अर्थ तज्ञ सांगतीलच.

तेलाची / सोन्याची आयात कमी करून "बॅलन्स ऑफ पेमेंटस" सुधारेल, हे नक्की.

म्हणजेच, आजच्या घडीला, जो भारतीय जास्त प्रमाणात स्वयंचलीत वाहने वापरत नाही (आणि वापरायची वेळ आलीच तर, सार्वजनिक वाहनेच वापरतो) आणि जो सोन्यात गुंतवणूक करत नाही तो राष्ट्राभिमानी होवू शकतो का?

आदूबाळ's picture

12 Mar 2014 - 10:52 pm | आदूबाळ

बलवान ही सापेक्ष (रिलेटिव) कल्पना आहे. कशाच्या तुलनेत बलवान? दुसरं चलन हा मापदंड होऊ शकत नाही. मग दुसरा काही मापदंड असू शकतो का?

पर्चेसिंग पॉवर पॅरिटी (पीपीपी), बिग मॅक इंडेक्स असे काही मापदंड सुचवले जातात. पण प्रत्येकाला आपापले फायदे-तोटे आहेतच.

-

जो भारतीय जास्त प्रमाणात स्वयंचलीत वाहने वापरत नाही (आणि वापरायची वेळ आलीच तर, सार्वजनिक वाहनेच वापरतो)

मानवतावादी आहे असं म्हणता येईल.

राष्ट्राभिमान आर्थिक बाबींत आणणं गैर आहे असं मला वाटतं. "स्वदेशी वापरा" हा सल्ला आजच्या जगात आत्मघातकी ठरेल.

मुक्त विहारि's picture

12 Mar 2014 - 11:13 pm | मुक्त विहारि

आत्मघातकी कधीच ठरणार नाही.

किंबहूना "जागतीक दर्जाच्या आणि सामान्य माणसाला पण परवडतील अशा किंमतीच्या आणि त्वरीत उपलब्ध होणार्‍या स्वदेशी वस्तू वापरणे तर अजिबातच नाही."

दुरुस्ती: स्वदेशी वापरा हा आग्रह आत्मघातकी ठरेल.

त्यानिमित्ताने: स्वदेशी म्हणजे नेमकं काय?

भारतीय उत्पादकाने भारतात बनवलेली वस्तू (नॅनो)
परदेशी उत्पादकाने भारतात बनवलेली वस्तू (बकार्डी)
भारतीय उत्पादकाने परदेशात बनवलेली वस्तू (लँड रोव्हर)

??

"जागतीक दर्जाच्या आणि सामान्य माणसाला पण परवडतील अशा किंमतीच्या आणि त्वरीत उपलब्ध होणार्‍या कोणत्याही वस्तू वापरणे तर अजिबातच आत्मघातकी ठरणार नाही"

यात स्वदेशी/परदेशी किंवा राष्ट्राभिमान वगैरेचा काहीच संबंध नाही. नसावा.

मुक्त विहारि's picture

13 Mar 2014 - 8:21 am | मुक्त विहारि

गेल्या ५०/६० वर्षांत झालेला निर्यात प्रधान (ज्यांची निर्यात, आयाती पेक्षा जास्त आहे) देशांचा आर्थिक महासत्तेत झालेला उदय (उदा. साउथ कोरिया.जर्मनी,जपान) हेच दाखवते.

आणि मनापासून धन्यवाद....मला (नॅनो),(बकार्डी)आणि (लँड रोव्हर) ह्या संज्ञा माहीत न्हवत्या.

सुनील's picture

13 Mar 2014 - 8:38 am | सुनील

मला (नॅनो),(बकार्डी)आणि (लँड रोव्हर) ह्या संज्ञा माहीत न्हवत्या.

बकार्डी पिऊन नॅनो चालवली की आपण लॅन्ड रोवर चालवीत असल्याचा भास होतो (असे म्हणतात)

बाकी मुवी, हे प्रश्णबिश्ण सोडा आणि एखादी पाकृ टाका नाहीतर कट्ट्याचं जमवा!

मुक्त विहारि's picture

13 Mar 2014 - 10:08 am | मुक्त विहारि

आपण लॅन्ड रोवर चालवीत असल्याचा भास होतो

(आणि मग अपघात झाला, की माणूस त्याच्या कुवती प्रमाणे शिक्षा भोगतो किंवा मग महानायक तरी होतो.)

मुवि तुमी गहन विचार कदी पासुन कारायला लागला ?

मुक्त विहारि's picture

12 Mar 2014 - 10:18 pm | मुक्त विहारि

ह्यालाच "गहनविचार" म्हणतात का?

असेल; असे पण असेल.

श्रीगुरुजी's picture

12 Mar 2014 - 8:49 pm | श्रीगुरुजी

प्रश्न क्र. (१) ते (९) ची खरी उत्तरे जो देईल त्याला/तिला "जातीयवादी", "हिंदुत्ववादी", "संघाचा हस्तक", "पुराणमतवादी", "प्रतिगामी", "फूट पाडणारा" इ. शेलक्या विशेषणांनी झोडले जाईल. या प्रश्नांची जे खोटी/चुकीची उत्तरे देतील त्यांचा "निधर्मी", "सर्वधर्मसमभावी", "उदारमतवादी", "पुरोगामी" इ. विशेषणांनी गौरव केला जाईल.

>>> १०. तेलाच्या आणि सोन्याच्या आयातीचा, भारतीय अर्थ कारणावर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी तेल आणि सोने आयात केले तर, आपला रुपया बलवान होईल का?

आयात कमी करून रूपया बलवान होणार नाही. आयात ही वाईटच असते व निर्यात ही चांगलीच असते हा गैरसमज आहे. तेलाची आयात कमी झाली तरी तेलाचे देशांतर्गत भाव वाढतील. त्यामुळे इतर सर्व वस्तूंचे भाव वाढून व्याजदर वाढतील. त्यामुळे चलनफुगवटा होऊन प्रत्यक्षात रूपया कमजोर होईल. याचा अर्थ आयात वाढवून रूपया मजबूत होईल असे पण नाही. आयात निर्यातील समतोल असणे महत्त्वाचे आहे.

फारच व्यापक प्रश्न आहेत .

विकास's picture

12 Mar 2014 - 8:49 pm | विकास

फारच मोठा आवाका आहे!

बिरबलाची गोष्ट आठवली... बादशहा विचारतो की, "भाकरी का करपली?, घोडा का अडला?, पान का सडलं?" सगळ्याचे उत्तर एकच - न फिरवल्याने. तसेच काहीसे या सगळ्याचे समान उत्तर आहे असे वाटते.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2014 - 9:16 pm | बिपिन कार्यकर्ते

कालचाच गोंधळ बरा होता त्या मानाने!

संपत's picture

12 Mar 2014 - 9:58 pm | संपत

++++++++++१

प्यारे१'s picture

12 Mar 2014 - 10:08 pm | प्यारे१

+७८६

आत्मशून्य's picture

12 Mar 2014 - 10:11 pm | आत्मशून्य

.

यसवायजी's picture

12 Mar 2014 - 10:36 pm | यसवायजी

+००७
;)

सूड's picture

12 Mar 2014 - 10:45 pm | सूड

+१८५७

अत्रुप्त आत्मा's picture

12 Mar 2014 - 11:10 pm | अत्रुप्त आत्मा

+१९४७ ;)

कवितानागेश's picture

12 Mar 2014 - 11:20 pm | कवितानागेश

+१९९३

प्रसाद गोडबोले's picture

12 Mar 2014 - 11:49 pm | प्रसाद गोडबोले

वेल लेफ्ट !!

आनन्दिता's picture

13 Mar 2014 - 12:52 am | आनन्दिता

+९११

चौकटराजा's picture

13 Mar 2014 - 11:35 am | चौकटराजा

++++++++++++++++++++२६/१/१९५०

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Mar 2014 - 10:34 am | llपुण्याचे पेशवेll

+१

मुक्त विहारि's picture

12 Mar 2014 - 11:33 pm | मुक्त विहारि

अहो, हे तर सामान्य प्रश्र्न आहेत.गोंधळ कसला?

स्पा's picture

13 Mar 2014 - 6:52 am | स्पा

++--//?::#$%&#@!

संपत's picture

12 Mar 2014 - 10:17 pm | संपत

माझेदेखील काही प्रश्न:
१. ९२ सालची मुंबईमधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर बाबरी मस्जिद पडलीच गेली नसती तर दंगल झाली असती का?
२. आज काल हिंदी सिनेमांतील मुस्लीम नायकांचे प्रमाण कमी का झाले आहे? पूर्वी खान मंडळींचे राज्य होते.. आता जुने नायक सोडल्यास नवीन नायकात मुस्लीम चेहरा अभावानेच दिसतो.
३. भारताच्या क्रिकेटच्या संघात मुस्लीम, ख्रिश्चन व्यक्ती लोकसंख्येच्या मानाने इतक्या कमी का असतात?
४, आर्थिक गुन्हेगारीत गुजराती व्यक्तींचे लोकसंख्येच्या प्रमाणात भाग खूप जास्त का असतो?विशेषतः शेअर बाजार प्रकरणात

बाकी प्रश्न सुचतील तसे..

विकास's picture

12 Mar 2014 - 10:50 pm | विकास

९२ सालची मुंबईमधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर बाबरी मस्जिद पडलीच गेली नसती तर दंगल झाली असती का?

कारण इतिहासात चारएकशे वर्षांपूर्वी बाबराने देऊळ पाडले म्हणून आणि नजीकच्या सेक्यूलॅरीजमच्या नावाखाली स्युडोसेक्यूलर्सनी समाजात दुही निर्माण केली म्हणून.

प्रश्न#२ ते ४: प्रत्येकास व्यक्ती म्हणून (कलाकार ते गुन्हेगार म्हणून बघण्याऐवजी) धर्म-भाषा आधारीत बघत असल्याने असे वाटत असावे. अशाच (स्युडोसेक्यूलर) वृत्तीने गांधीहत्येनंतर एका व्यक्तीने केलेल्या गुन्ह्यासाठी समाजाच्या एका घटकासच गुन्हेगार समजले गेले, इंदीरा हत्येनंतर हजारो शिखांचे हत्याकांड झाले, गोध्रानंतरच्या दंगलीत केवळ एकाच धर्माच्या लोकांची झालेली हत्या दिसली, वगैरे वगैरे...

प्रश्न#२ ते ४: प्रत्येकास व्यक्ती म्हणून (कलाकार ते गुन्हेगार म्हणून बघण्याऐवजी) धर्म-भाषा आधारीत बघत असल्याने

मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला कळले आहे तर..

कारण इतिहासात चारएकशे वर्षांपूर्वी बाबराने देऊळ पाडले म्हणून

आणि तरीही तुम्ही तसेच बघता आहात.

विकास's picture

12 Mar 2014 - 11:23 pm | विकास

मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला कळले आहे तर..
स्युडोसेक्यूलर्स कसे बघतात हे सांगितले आहे. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुम्हालाच माहीत. :)

कारण इतिहासात चारएकशे वर्षांपूर्वी बाबराने देऊळ पाडले म्हणून

आणि तरीही तुम्ही तसेच बघता आहात.

माझे अर्धेच वाक्य घेऊन तुम्ही निष्कर्ष काढत आहात यात सर्व काही आले. त्यापुढे मी "आणि नजीकच्या सेक्यूलॅरीजमच्या नावाखाली स्युडोसेक्यूलर्सनी समाजात दुही निर्माण केली म्हणून. " असे देखील म्हणले होते. पण ते अजून पचायला अवघड जातयं असे दिसते. असो, मी फक्त इतिहास बघतोय. तो न लक्षात न घेता अथवा त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून स्युडोसेक्यूलर्सप्रमाणे निष्कर्ष काढत नाही आहे.

मुळात जर बाबरी मस्जिद पडलीच गेली नसती तर दंगल झाली असती का?
माझ्या वाचना नुसार बाबरी मस्जिद पाडली गेली नसुन,तो फक्त बाबरी ढाचा होता.{गुगलबाबा वर या बाबतीत शोध घेतला जाउ शकतो.या वर अधिक वाचायला नक्कीच आवडेल.}
एक असाच दुवा देतो :- सहमति में ही है समाधान

मुवि यांनी त्यांना पडलेले प्रश्न दिलेलच आहेत त्यात भर टाकतो.

१) काश्मिर मधे गेल्या दोन दशकात २०८ पेक्षा अधिक मंदिरे पाडली गेली, त्यावर या देशातील किती {तथा कथित धर्मनिरपेक्ष्}पक्षांनी, वॄत्तवाहिन्यांनी,वॄत्तपत्रांनी आरडा-ओरड केली ?कोणत्या हिंदुत्ववादी संघटनांनी यावर आंदोलन केले ? ते किती सफल झाले आणि त्याला किती प्रसिद्धी मिळाली ?किती मुस्लिम संघटनांनी,मुल्ला /मौलविंनी यांची निंदा केली ?इतके झाल्यावर सुद्धा तिथे दंगली झाल्या का ?
{या पैकी काही देवळांची यादी :- List of Temples Destroyed by the Islamic Terrorists }

आजानुकर्ण's picture

14 Mar 2014 - 2:12 am | आजानुकर्ण

१९९२ च्या दंगलीला श्रीकृष्ण आयोगाच्या रिपोर्टानुसार जबाबदार असलेले मुसलमान गुंड व बाळ ठाकरे, मधुकर सरपोतदार वगैरे शिवसैनिक आणि हिंदू गुंड ही सर्व मंडळी स्युडोसेक्युलर आहेत ही नवी माहिती या प्रतिसादातून मिळाली.

विकास's picture

14 Mar 2014 - 4:26 am | विकास

आता नुसते हिंदूंना गुंड म्हणत झोडपणे संपले वाटतं ... बराच फरक पडलेला दिसतोयं!

आजानुकर्ण's picture

14 Mar 2014 - 5:59 pm | आजानुकर्ण

तसे फरक बरेच आहेत... गुजरात दंगलीच्या बाबतीत न्यायालयीन आदेशांचे स्वागत मात्र मुंबई दंगलीच्या बाबतीत न्यायमूर्तींनी दोषी ठरवेल्यांव्यतिरिक्त इतरांनाच झोडपणे. किंवा एका नरराक्षसाचे विकास*पुरुषात रुपांतर होणे.... किंवा भारताच्या आद्य लोहपुरुषांनी ज्या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली होती त्याच संघटनेची 'पूर्वपीठिका' असणाऱ्यांना ते आद्य लोहपुरुष अचानक सरकारी पैसा खर्च करुन पुतळा उभारण्याइतके प्रातःस्मरणीय होणे... किंवा भारताच्या आद्य राष्ट्रपित्यावर आडून आडून वा उघडपणे टीका** करणाऱ्यांना सोयीस्कररीत्या त्या राष्ट्रपित्याचा गौरव करावा लागणे असे अनेक फरक सृष्टीत होतच असतात. The Only Thing That Is Constant Is Change

* यात वैयक्तिक उल्लेख नाही.
** टीका म्हणजे हत्या नाही.

विकास's picture

14 Mar 2014 - 6:37 pm | विकास

** टीका म्हणजे हत्या नाही.
मस्तच की हो! अजून एक सुधारणा!

गुजरात दंगलीच्या बाबतीत न्यायालयीन आदेशांचे स्वागत मात्र मुंबई दंगलीच्या बाबतीत न्यायमूर्तींनी दोषी ठरवेल्यांव्यतिरिक्त इतरांनाच झोडपणे.

वाक्य बरोबर लिहीले आहे. कदाचीत चुकून हे कोणी वाचले तर त्यातील फरक कळणार नाही म्हणून लिहीतो. गुजरात दंगलीची चौकशी ही न्यायालयीन कामकाज (कोर्ट केस) म्हणून झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व आले. मुंबईच्या संदर्भात तुम्ही म्हणत असलेले न्यायमूर्ती म्हणजे बी. एन. श्रीकृष्ण यांचा केवळ आयोग होता. कोर्ट केस नव्हती. ज्यांच्यावर कोर्ट केसेस झाल्या त्यात ते अडकले, (उदा. सरपोतदार) शिक्षा मिळाली वगैरे.

आणि हो मुंबईच्या त्या दंगलीबद्द्ल (१९९३ जाने-फेब) बोलताना राधाबाईचाळ पण लक्षात ठेवणे गरजेचे आहे असे वाटते.

आजानुकर्ण's picture

14 Mar 2014 - 8:11 pm | आजानुकर्ण

असो शब्दच्छलासाठी तुमचा मुद्दा योग्य असला तरी अद्याप श्रीकृष्ण आयोगाच्या लेजिटिमसीबाबत कोणी शंका उत्पन्न केलेली नाही. मात्र तुमचा मूळ दावा हा खालीलप्रमाणे होता. आयोगाच्या अहवालानुसार तुमच्या दाव्यात काही तथ्य दिसत नाही. आयोगाने कुठेही या (अगदी राधाबाईचाळीसकट) दंगलीसाठी बाबर किंवा सेटलवाड-आझमी वगैरे स्युडोसेक्युलरिस्ट लोकांना जबाबदार धलेले नाही.

कारण इतिहासात चारएकशे वर्षांपूर्वी बाबराने देऊळ पाडले म्हणून आणि नजीकच्या सेक्यूलॅरीजमच्या नावाखाली स्युडोसेक्यूलर्सनी समाजात दुही निर्माण केली म्हणून.

अर्थात तेंडुलकर-पाध्ये-लागू यांना त्रास देणारे, पाध्यांची राडासारखी पुस्तके जाळणारे, सखाराम बाईंडरला त्रास देणारे (किंवा साहित्यिकांना बैल म्हणणारे, पुलंना झक मारुन जसाकाय स्वतःच्याच खिशातून पुरस्कार दिला असा अविर्भाव गाजवणारे) कै. शिवसेनाप्रमुख हे जसे हे सर्व करुनही कलेचे भोक्ते मानले जातात (प्लीज णोट- इथे हुसेनचे नाव नाही. सर्वजण हिंदू-म्हराटीच कलाकार आहेत..) तसेच अतिरेकी हिंदुत्त्ववादाचा पुरस्कार करुनही ते स्युडोसेक्युलर मानले जावेत असा तुमचा दावा असेल तर ते एकंदर प्रतिसादाशी तर्कसुसंगत ठरेल.

आत्मशून्य's picture

12 Mar 2014 - 11:48 pm | आत्मशून्य

काही प्रश्र्न......

व्वा. आता प्रश्न पडु लागले आहेत, ही अतिशय सकारात्मक बाब आहे.

प्रसाद गोडबोले's picture

13 Mar 2014 - 12:07 am | प्रसाद गोडबोले

अवघड प्रश्न विचारु नका हो , आधीच काँग्रेसी लोकांची गोची झालीये ... शिवाय इथे बरेच गांधीवाद लोक आहेत , त्यांना का बरे कोंडीत पकडता ??

४. अफगणीस्तान मधील मुर्तींचा नाश केला गेला तेंव्हा, भारताची नक्की भुमिका काय होती?
>>> मला इथे उपप्रश्न आहेत . बामियान बुध्द मुर्ती नाशाबद्दल बौध्दांची काय भुमिका होती ? किंवा बोधगया येथील बॉम्बस्फोटाबद्दल बौध्द लोकांचे काय मत आहे ?

६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले?
>>> माझ्यामतेतरी भाव अचानक बाढलेले नाहीत , रीयल इस्टेट ही नेहमीच महाग होती

७. भिवंडी, मुंब्रा ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत?
>>>अस्थिर म्हणजे ?

१०. तेलाच्या आणि सोन्याच्या आयातीचा, भारतीय अर्थ कारणावर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी तेल आणि सोने आयात केले तर, आपला रुपया बलवान होईल का?
>>>
हा खरा अवघड प्रश्न आहे . आणि हो , जर आपण तेलाचे आणि सोन्याचे एक्सेस उत्पादन करुशकलो तर नक्कीच ह्या निमित्ताने देशाबाहेर जाणारा करन्सी फ्लो कमी होईल आणि रुपया खचितच बलवान होईल !!
किंबहुना ,माझ्यामाहीती नुसार, करन्सी बलवान की कमकुवत हे त्या देशाच्या जीडीपी अर्थात ग्रॉस डोमेस्टीक प्रॉडक्ट वरुन ठरत असते ... जितका जीडीपो जास्त तितकी करन्सी बलवान !!

बाकीच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहीत आहेतच , फक्त ती गांधीवाद्यांच्या तोंडुन ऐकायला मिळतात का ते पाहुया :)

आत्मशून्य's picture

13 Mar 2014 - 12:16 am | आत्मशून्य

असो. बिकांना +४२० आधिच केले आहे.

लॉरी टांगटूंगकर's picture

13 Mar 2014 - 12:31 am | लॉरी टांगटूंगकर

कुठं त्रास घेता, चला एक कट्टा करूयात.

बाळकराम's picture

13 Mar 2014 - 2:46 am | बाळकराम

तुमच्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे इथली तज्ञ मंडळी काय ते देतीलच, पण तुम्हाला प्रश्न पडायला लागले ते बघून मला मात्र आनंद झाला. आज प्रश्न पडू लागले, म्हणजे उद्या तुम्ही विचारही करु लागाल आणि कोणी सांगावे, हळूहळू तुम्ही अगदी तर्कसुसंगत सुद्धा विचार करु लागाल, हू नोज? उम्मीद पे दुनिया कायम है!
पण तुम्हाला हे असले प्रश्न वगैरे पडणं अलाऊड आहे का तेही एकदा मोदीबागेतून वा रेशीमबागेतून कन्फर्म करुन घ्या म्हणजे झालं. नाही म्हणजे, "दक्ष-सावधान", "अग्रेसर-पुरस्सर" वगैरे करायला काही विचारशक्ती असायची/ बुद्धी असायची गरज नाही पण तुम्ही एकदा प्रश्न विचारायला लागलात, विचार करायला लागलात की तुमचे संघजंती वरिष्ठ "मुवी विचार करायला लागला म्हणजे आता हा आता आपल्यातला राहिला नाही" असा काहीतरी विचार करुन तुमचा महात्मा गांधी करुन टाकायचे आणि मिपाकरांचं हक्काचं "गिर्‍हाईक" जाईल ही भीती आम्हाला वाटते म्हणून हा आगाऊ प्रपंच!

सौंदाळा's picture

13 Mar 2014 - 10:21 am | सौंदाळा

तुमचा संघजंती शब्द काही लोकांना आवडला म्हणुन प्रत्येक प्रतिसादात तो ओढुनताणुन पेरण्याचा अट्टाहास आवडला.

बाळकराम's picture

15 Mar 2014 - 1:33 am | बाळकराम

हे ही काही कमी नाही, कुठूनतरी सुरुवात झाली. तुम्हाला आता चांगल्या गोष्टी कळायला सुद्धा लागतील हा विश्वास वाटतो. धन्यवाद.
अरे हो, एक राहिलंच की- संघजंती सौंदाळा! हे कसं झ्याक वाटतंय! अगदी फिरंगोजी नरसाळा सारखं वाटतंय.

आजानुकर्ण's picture

14 Mar 2014 - 2:14 am | आजानुकर्ण

बाळकराम, मस्त! तुम्ही तेंडुलकर आहात की गावसकर? नुसती दणकेबाज फटकेबाजी करताय म्हणून म्हटलं.

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Mar 2014 - 11:25 am | llपुण्याचे पेशवेll

कोणीही असोत पण 'जुने' आहेत इतके नक्की. (जाणते हा शब्द मुद्दामहून वापरलेला नाही)

बाळकराम's picture

15 Mar 2014 - 1:44 am | बाळकराम

तुम्ही जाणते हा शब्द वापरणार नाहीच- तुम्हाला थोडंच माहितीये जाणतेपणा म्हणजे काय ते? आणि जातीयवादाने, "सेल-बाय-डेट" उलटून गेलेल्या तत्त्वज्ञानाने "बुरसटलेलं" असण्यापेक्षा ज्ञानाने, अनुभवाने शिकून योग्य वेळी "जुनं" झालेलं असलं कधीही चांगलं, नाही का? :)

बाळकराम's picture

15 Mar 2014 - 1:36 am | बाळकराम

मी खरंतर सेहवाग आहे (कधी कधीच खेळणारा!)) :D

असले जड प्रश्न पडलेलेच राहु द्या ओ...उचलले की काहिंच्या पोटात कळ येते.

भाते's picture

13 Mar 2014 - 10:01 am | भाते

प्रश्र्न कसले हि तर १०० मार्कांची प्रश्र्नपत्रिकाच आहे! १० मार्कांचे १० प्रश्र्न.
म्हणजे सगळे प्रश्र्न कम्पलसरी, ऑप्शनला एकही नाही.

जाऊदे, हा विषयच मी ऑप्शनला टाकला आहे, त्यामुळे माझ्याकडुन पास.

अवांतर : मुवि, ऊन्हाळा नुकताच सुरु झाला आहे. अजुन पुढले किमान तिन महिने काढायचे आहेत. इतक्यात वैतागलात?

चला, आणखी एक बियर कट्टा करूयात. ह. घ्या. :)

प्रसाद गोडबोले's picture

13 Mar 2014 - 12:04 pm | प्रसाद गोडबोले

+१ हे बियर कट्टा करण्याला :D

चिरोटा's picture

13 Mar 2014 - 12:01 pm | चिरोटा

बादशाहीत कोण येणार जेवायला?

जागेचे भाव अचानक कसे काय वाढले?

अचानक? मला नाही वाटत. ३० वर्षापूर्वीही जागा घेणे,फ्लॅट घेणे महागच होते.स्वतःच्या आर्थिक बळावर फ्लॅट घ्यायचा तर त्यावेळीही तीशी सहज उलटायची.आता दर जरा जास्त वेगाने वाढत आहेत कारण स्थानिक धंदे,व्यवसाय बरेच वाढले आहेत व काळ्या पैशाचे प्रमाणही बरेच वाढले आहे. त्यामुळे गरज नसताना फ्लॅट घेणे हा प्र्कार व्यवसाय्,धंदे करणार्‍या लोकांमध्ये दिसून येतो.

१. गुजरात मधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर आग गाडी जाळलीच नसती तर दंगल झाली असती का?
२. मुझफ्फर नगर दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे जाट मुलीची छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का?

कल्पना नाही. झालीही असती किंवा नसतीही. जर द्वेष असेल तर हे किंवा ते कोणतेही तत्कालिन कारण पुरते! १८५७चा उठाव काडतुसांना डुकराची चरबी लावली नसती तरी झालाच असता असे वाटते कारण सैनिकांत असंतोष होता. तसेच इथे आहे. दोन समाजात द्वेष असला की कारणाची वाट बघत दोन्ही समाजातील कंटक टपून बसलेले असतात.

३. आज काल हिंदी सिनेमांतील हिंदू नायकांचे प्रमाण कमी का झाले आहे?

तसे काही वाटत नाही. तितकेच असावे.

४. अफगणीस्तान मधील मुर्तींचा नाश केला गेला तेंव्हा, भारताची नक्की भुमिका काय होती?

तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी घटनेची निंदा केली होती. (बातमी)

५. काश्मीर मधील हिंदूंचे प्रमाण अचानक कमी का झाले?

काश्मिरात हिंदु नेहमीच अल्पसंख्य होते. अचानक कधी कमी झाले? कोणत्या सालाबद्दल म्हणत आहात?

६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले?

लोकांच्या हातात लिक्वीड मनी वाढला, कर्जे स्वस्तही झाली व मिळणे सुकरही झाले.

७. भिवंडी, मुंब्रा ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत?

कोणत्या दृष्टीकोनातून अस्थिर आहेत? तिथे एवढ्यात इमारती कोसळल्या त्याबद्दल बोलताय का? ते कच्च्या बांधकामामुळे झाले असे म्हणतात.

८. पाकिस्तान आणि बांगला देशातील हिंदूंचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या क्रिकेटच्या संघात हिंदू व्यक्ती का नसतात?

फाळणीमुळे तेथील हिंदूंचे प्रमाण कमी झाले. क्रिकेट संघात तेथील हिंदूच्या प्रमाणात क्वचित हिंदु खेळाडू दिसले आहेत. शिवाय ते भारतासारखे धर्मनिरपेक्ष देश नसल्याने त्यांच्याकडे अल्पसंख्यांवर अन्यायही होतो व त्यांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य बरेच मर्यादित असते.

९. गुन्हेगारीत हिंदू व्यक्तींचे लोकसंख्येच्या प्रमाणात, भाग का नसतो?विशेषतः सामुहीक बलात्कार आणि स्त्रियांची छेड छाड.

कशावरून म्हणताय? काही विदा आहे काय? बघायला आवडेल

१०. तेलाच्या आणि सोन्याच्या आयातीचा, भारतीय अर्थ कारणावर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी तेल आणि सोने आयात केले तर, आपला रुपया बलवान होईल का?

बरेच विस्ताराने उत्तर द्यावे लागेल! माझ्यापेक्षा इतर काही तज्ज्ञ मिपाकर या बाबतीत उत्तम उत्तर देऊ शकतील असे वाटते.

विकास's picture

13 Mar 2014 - 9:23 pm | विकास

काश्मिरात हिंदु नेहमीच अल्पसंख्य होते. अचानक कधी कमी झाले? कोणत्या सालाबद्दल म्हणत आहात?

कदाचीत मूळ प्रश्न वाचताना वेगळेच विश्लेषण केलेले दिसतयं. :) मूळ प्रश्न "काश्मीर मधील हिंदूंचे प्रमाण अचानक कमी का झाले?" असा आहे. अर्थात काश्मीरमधे हिंदू अल्पसंख्य आहेत/होते/झाले असा त्यात मुद्दा नसून जी काही संख्या होती ती का घटली हा मुद्दा आहे. मला वाटते त्याचा संदर्भ १९९० च्या सुमारापासून जे दहशतवादी वाढले आणि काश्मिरी पंडीतांना स्थलांतरीत व्हावे लागले त्या आकडेवारीशी असावा. नाहीतर असाच मुद्दा कोणत्याही अल्पसंख्य समाजावर काश्मिरीपंडीतांसारखेच अथवा हिटलरने ज्यूंवर केले तसे अत्याचार करून स्थलांतरीत करून त्या संदर्भातील आकडेवारीशी करता येईल. तेंव्हा तुमचे विश्लेषण हे दुधारी शस्त्र ठरू शकते, म्हणून हा प्रतिसाद प्रपंच.

मुक्त विहारि's picture

14 Mar 2014 - 11:24 pm | मुक्त विहारि

"लोकांच्या हातात लिक्वीड मनी वाढला."

कुठल्या आणि किती लोकांच्या हातात लिक्वीड मनी वाढला?समाजांत ह्या लोकांचे प्रमाण किती?

माझ्या अंदाजाने एक आयटी क्षेत्र सोडले तर इतर क्षेत्रांतील पगार चलनवाढीच्या प्रमाणांतच वाढळेला आहे.जागेचे भाव मात्र चलनवाढीच्या किमान तिप्पट प्रमाणांत वाढलेले आहेत.हा पैसा नक्की कुणाकडे गेला?

कर्जे स्वस्तही झाली व मिळणे सुकरही झाले. =====> म्हणून बिल्डर लॉबीने त्याचा फायदा उठवणे कितपत योग्य आहे?सरकार बिल्डर लॉबी बनवते हे सत्य आहे की सरकार सामान्य जनता बनवते हे सत्य?

नितिन थत्ते's picture

15 Mar 2014 - 11:10 am | नितिन थत्ते

>>माझ्या अंदाजाने एक आयटी क्षेत्र सोडले तर इतर क्षेत्रांतील पगार चलनवाढीच्या प्रमाणांतच वाढळेला आहे.जागेचे भाव मात्र चलनवाढीच्या किमान तिप्पट प्रमाणांत वाढलेले आहेत.हा पैसा नक्की कुणाकडे गेला?

मी १९९७ मध्ये जागा घेतली तेव्हा १० लाखाला घेतला आज त्याची (म्हणजे आमच्या एरियात सिमिलर फ़्लॅटची- पण बेसिक अ‍ॅमेनिटीज पेक्षा बर्‍याच जास्त अ‍ॅमेनिटीज असलेल्या फ्लॅटची) किंमत सुमारे ५० लाख आहे. या हिशेबाने दरवाढीचा दर दरवर्षी १०.५४% होतो जो चलनवाढीच्या दरापेक्षा फार जास्त नाही.

साधारणतः जागांचे दर स्पर्टसमध्ये वाढतात. काहीपिरियडमध्ये भसाभस वाढतात तर काही पिरियडमध्ये स्थिरसुद्धा राहतात.

मुक्त विहारि's picture

14 Mar 2014 - 11:28 pm | मुक्त विहारि

"लोकांच्या हातात लिक्वीड मनी वाढला."

कुठल्या आणि किती लोकांच्या हातात लिक्वीड मनी वाढला?समाजांत ह्या लोकांचे प्रमाण किती?

माझ्या अंदाजाने एक आयटी क्षेत्र सोडले तर इतर क्षेत्रांतील पगार चलनवाढीच्या प्रमाणांतच वाढळेला आहे.जागेचे भाव मात्र चलनवाढीच्या किमान तिप्पट प्रमाणांत वाढलेले आहेत.हा पैसा नक्की कुणाकडे गेला?

कर्जे स्वस्तही झाली व मिळणे सुकरही झाले. =====> म्हणून बिल्डर लॉबीने त्याचा फायदा उठवणे कितपत योग्य आहे?सरकार बिल्डर लॉबी बनवते हे सत्य आहे की सरकार सामान्य जनता बनवते हे सत्य?

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2014 - 11:24 pm | श्रीगुरुजी

>>> १. गुजरात मधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर आग गाडी जाळलीच नसती तर दंगल झाली असती का?

गोध्रा येथील काही स्थानिक मुस्लिमांनी अयोध्येहून परतणार्‍या कारसेवकांचा डबा पेटवून दिला. त्यात ५९ जणांचा मृत्यु झाला. त्यामुळे दंगल पेटली. डबा पेटवलाच नसता तर दंगल झालीच नसती.

>>> २. मुझफ्फर नगर दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे जाट मुलीची छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का?

जाट मुलीची छेड काढली नसती तर तिचे भाऊ छेड काढणार्‍यांना जाब विचारायला गेलेच नसते. त्यामुळे त्यांचे खून झालेच नसते व पुढील सर्व घटना टळल्या असत्या.

>>> ३. आज काल हिंदी सिनेमांतील हिंदू नायकांचे प्रमाण कमी का झाले आहे?

हिंदू नायकांचे प्रमाण कमी झालेले नाही.

>>> ४. अफगणीस्तान मधील मुर्तींचा नाश केला गेला तेंव्हा, भारताची नक्की भुमिका काय होती?

भारताने अधिकृत निषेध नोंदविला होता.

>>> ५. काश्मीर मधील हिंदूंचे प्रमाण अचानक कमी का झाले?

काश्मिरमध्ये १९९० मध्ये ६५ टक्के मुस्लिम व अंदाजे ३० टक्के हिंदू होते. श्रीनगर खोर्‍यातील ४ लाखांहून अधिक (म्हणजे एकूण १० टक्क्यांहून अधिक) हिंदूंना अतिरेक्यांच्या धमक्यांमुळे घरे सोडून दिल्लीत यावे लागले. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या आपोआप कमी झाली.

>>> ६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले?

जागेचे भाव कायम वाढतच असतात.

>>> ७. भिवंडी, मुंब्रा ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत?

सामाजिक शांततेच्या दृष्टीने अस्थिर असे तुम्हाला म्हणायचे असावे. भिवंडीला दंगलींचा जुना इतिहास आहे. दोन्हीकडे मुस्लिमांची संख्या खूप जास्त आहे. मुम्ब्र्यात तर अनेक बेकायदेशीर बांगलादेशी आहेत (म्हणे). सर्वसाधारणपणे मुस्लिम जिथे जास्त आहेत तिथे जास्त दंगे होतात.

>>> ८. पाकिस्तान आणि बांगला देशातील हिंदूंचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या क्रिकेटच्या संघात हिंदू व्यक्ती का नसतात?

पाकिस्तान व बांगलातील दडपशाहीमुळे अनेक हिंदू भारतात आले. काही जणांनी गळचेपीमुळे नाईलाजाने धर्म बदलला तर काही जणांवर धर्मबदलाची सक्ती झाली. त्यामुळे हिंदूंची संख्या कमी झाली. मुख्य कारण देश सोडणे हे आहे.

पाकिस्तान व बांगलामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात हिंदू खेळाडू नसतात कारण तिथल्या बहुसंख्य क्षेत्रात फक्त मुस्लिमांनाच संधी मिळते. तस्लिमा नसरीन च्या "लज्जा" पुस्तकाच याचा सविस्तर उल्लेख आहे. निव्वळ क्रीडाक्षेत्रातच नाही तर इतर अनेक क्षेत्रात धर्म आडवा येतो. श्रीलंकेमध्ये सुद्धा १५ टक्के तामिळ आहेत. परंतु आजतगायत मुरलीधरन हा एकमेव तामिळ त्या संघात होता. बाकी सर्व सिंहली होते.

>>> ९. गुन्हेगारीत हिंदू व्यक्तींचे लोकसंख्येच्या प्रमाणात, भाग का नसतो?विशेषतः सामुहीक बलात्कार आणि स्त्रियांची छेड छाड.

सर्वसाधारणपणे व्यक्ती सांपत्तिक व शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेली असली तर अशा व्यक्ती स्वतःच्या प्रतिष्ठेला जपून असतात व त्या कायद्याला भिऊन वागतात. इतर धर्मियांच्या तुलनेत विशेषतः मुस्लिमांच्या तुलनेत हिंदू जास्त समृद्ध व शिकलेले असतात म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचे गुन्हेगारीचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

काश्मिरमध्ये १९९० मध्ये ६५ टक्के मुस्लिम व अंदाजे ३० टक्के हिंदू होते.

काश्मिर म्हणजे काश्मिर खोरे म्हणताय की जम्मी आणु काश्मिर राज्य? नुसत्या काश्मिर खोर्‍यात ~९७% मुस्लिम होते - आहेत. अख्खे राज्य म्हणत असाल तर माहिती ढोबळ मानाने योग्य आहे.

श्रीनगर खोर्‍यातील ४ लाखांहून अधिक (म्हणजे एकूण १० टक्क्यांहून अधिक) हिंदूंना अतिरेक्यांच्या धमक्यांमुळे घरे सोडून दिल्लीत यावे लागले. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या आपोआप कमी झाली.

आकडेवारीत घोळ आहे.
जर ४ लाख म्हणजे १०% हिंदू असा तुमचा दावा असेल तर काश्मिर खोर्‍यात मुळातच ४०लाख हिंदु होते असा तुमचा दावा आहे का? एकुण काश्मिर खोर्‍याची लोकसंख्याच रफली ५५लाख आहे. त्यापैकी ४०लाख हिंदु आहेत/होते? असा खरंच तुमचा दावा असेल तर स्रोतही द्यावा.

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2014 - 1:23 pm | श्रीगुरुजी

>>> जर ४ लाख म्हणजे १०% हिंदू असा तुमचा दावा असेल तर काश्मिर खोर्‍यात मुळातच ४०लाख हिंदु होते असा तुमचा दावा आहे का? एकुण काश्मिर खोर्‍याची लोकसंख्याच रफली ५५लाख आहे. त्यापैकी ४०लाख हिंदु आहेत/होते? असा खरंच तुमचा दावा असेल तर स्रोतही द्यावा.

४ लाख हा आकडा बरोबर आहे, पण ४ लाख म्हणजे १० टक्के हा आकडा चुकलेला दिसतोय. खरं तर २५ टक्क्यांहून अधिक हिंदूंनी काश्मिर राज्यातून स्थलांतर केलेलं दिसतंय.

पोटे's picture

16 Mar 2014 - 12:50 pm | पोटे

सर्वसाधारणपणे व्यक्ती सांपत्तिक व शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेली असली तर अशा व्यक्ती स्वतःच्या प्रतिष्ठेला जपून असतात व त्या कायद्याला भिऊन वागतात. इतर धर्मियांच्या तुलनेत विशेषतः मुस्लिमांच्या तुलनेत हिंदू जास्त समृद्ध व शिकलेले असतात म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचे गुन्हेगारीचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

अडाणी लोक खून , मारामार्‍या, बलात्कार असे सामान्य गुन्हे करतात.

उच्चशिक्षित लोक शेअर बाजार बुडवणे, ब्यान्क बुडवणे, बोगस विक्री करुन एकच फ्लॅट चार लोकाना विकणे, लैंगिक शोषण करणे , असे असामान्य गुन्हे करतात.

अशिक्षित लोकाना वकिल करणे परवडत नाही, त्यामुळे ते सापडले की अडकतातच.

शिक्षित लोकांना वकील करणे परवडते, त्यामुळे निर्दोष सुटू शकतात.

कल्पक's picture

14 Mar 2014 - 10:21 am | कल्पक

प्रश्न क्र. ५ साठी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल श्री. जगमोहन यांचे 'धुमसते बर्फ' हे पुस्तक नक्की वाचा. प्रश्न क्र. ८ साठी तस्लिमा नसरीन यांचे 'लज्जा' हे पुस्तक तसेच ब्रिगेडीअर हेमंत महाजन यांचा हा लेख (http://www.esakal.com/esakal/20120822/4791804341115950977.htm) वाचा.

मुक्त विहारि's picture

14 Mar 2014 - 10:58 am | मुक्त विहारि

बद्दल धन्यवाद.....

कल्पक's picture

14 Mar 2014 - 10:44 am | कल्पक

प्रश्न क्र. १०: मध्यंतरी असं वाचलं होतं कि चिदम्बरम यांनी भारतीय लोकांना सोनं खरेदी करू नका असं आवाहन केलं होतं. कारण आपण जे सोनं खरेदी करतो ते पूर्णतः परदेशातून आयात केलं जातं, म्हणजेच परकीय चलनातून हा व्यवहार होतो आणि म्हणून रुपया कमजोर होतो. आणि जे सोनं भारतात आहे ते सरकार विक्रीसाठी उपलब्ध होऊ देत नाही नाही. मध्यंतरी असंही वाचलं होतं की भारत सरकारने देशाच्या तिजोरीतील ४६% (साधारणतः २६५ टन) सोनं प्रसिद्धीमाध्यमांपासून लपवून परदेशातील बँकेत कर्जासाठी तारण म्हणून ठेवलं जे भारतीय कायद्याच्या (८५% सोनं देशात ठेवावं असं सांगणाऱ्या) विरोधात आहे. याविषयी खटले सुद्धा चालू आहेत. सरकारच्या अशा धोरणाचा सुद्धा रुपयावर परिणाम होतो. मलेशियात असताना मला असं कळलं होतं कि जगातल्या कोणत्याही दोन देशातील चलन रुपांतर हे डॉलर द्वारेच होतं. म्हणजे भारतीय रुपया > डॉलर > मलेशिअन रिंगीट्स. या गोष्टीमुळे सुद्धा अमेरीकेतर चलनांवर परिणाम होतो.

मृत्युन्जय's picture

14 Mar 2014 - 1:34 pm | मृत्युन्जय

च्यायला मुवि चालले मुसलमानांच्या सौदीत आणि इथे हिंदु मुसलमान पर्श्नांच्या काड्या टाकुन राह्यले. थांबा सौदीतल्या उंटांनाच सांगतो तुम्हाला पाठीवरुन वाळुत पाडायला. ;)

नितिन थत्ते's picture

14 Mar 2014 - 7:47 pm | नितिन थत्ते

अविनाशकुलकर्णींनी आयडी बदलला वाट्टां

विकास's picture

14 Mar 2014 - 7:55 pm | विकास

आत्ताच सगळी उत्तरे तपासली... श्री. नितिन थत्ते यांना १००/१०० गूण मिळालेले आहेत.

First

रमेश आठवले's picture

14 Mar 2014 - 8:05 pm | रमेश आठवले

आपल्या सगळ्या प्रश्नामधेच त्यांचे उत्तर ही आहे. अश्या प्रश्नाना उपरोधिक किंवा इंग्लिश भाषेत rhetoric प्रश्न असे म्हणता येईल. प्रश्नांची निवड करण्यात आपण दाखविलेली मार्मिकता स्तुत्य आहे.