ॠषीकुमाराचे प्रश्र्ण
एका माळरानावर एक हरीणाची जोडी निवांतपणे चरत होते. अतिशय सुंदर गोजीरवाणी जोडी होती ती. दोघांनीही नुकतेच यौवनात पदार्पण केले होते. सहजीवनाचा हा त्यांचा पहिलावहीला अनुभव होता. तारुण्याचा उन्मादाच्या शिखरावर होते ते दोघेजण. एकमेकांच्या तोंडावर तोंड घासत. एकमेकांना ढुशा मारत त्यांचे प्रणयाराधान सुरु होते. नुकत्याच झालेल्या पावसा मुळे मोठे छान लुसलिशीत गवत उगवलेले होते. नविनच उगवलेल्या या कोवळ्या गवता मुळे त्यांना पोट भर खायला मिळत होते. त्यामुळे खुश झालेली जोडी इकडे तिकडे हुंदडत फिरत गवताचा आस्वाद घेत होती. त्यांच्या गवतात फिरण्या मुळे गवतातले किडे पण उडत होते.