खेळाडूवृत्तीचा आणि सर्वसमावेशकतेचा अभाव असलेले खेळ; उर्फ क्रीडा, संस्कृती इत्यादी क्षेत्रातील कंपुगिरी

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
28 Mar 2014 - 2:03 pm
गाभा: 

सर्व सामान्य जनतेच लक्ष देशाच्या राजकारणाकडे लागल असताना भारतीय सर्वोच्च न्यायालय क्रिडाक्षेत्रातील राजकारणावर (BCCI) उपाय योजण्यात व्यस्त झाले आहे. क्रिडा, संस्कृती, सहकार, शिक्षण या क्षेत्रातील कंपुगिरी हल्ली राजकारणातील राजकारणावर ताण करताना दिसते आहे.

Many of the associations by virtue of being not-for-profit companies, abuse the system of proxies, and retain control by controlling the memberships.

The BCCI uses India in their logo, they use government land for stadium, they use state security for conducting matches, yet they are not agreeable to come under the RTI Act! The politicians who are now entrenched in BCCI ensure that the government cannot act against BCCI.

संदर्भ : Whose business is it anyway? - किर्ती आझाद (डिएनए इंडीया डॉट कॉम)

हे एका BCCI चे झाले पण अशीच स्थिती कम अधिक प्रमाणात बहुतांश क्रिडा, संस्कृती, सहकार, शिक्षण संस्थांची नाही का ? या क्षेत्रातील कंपुगिरी आणि वतनदारी बद्दल न्यायालये हस्तक्षेप करतील कदाचीत विधानमंडळे लाजे काजेने कायदे करतील पण मला पडत असलेला मुख्य प्रश्न असा आहे की कंपुगिरी करण्यात निर्लज्जतेच्या स्तराचे गर्व बाळगणार्‍या आमच्या सामाजिक विचार प्रणालीतच दोष असतील तर कोणतेही कायदे आणि न्यायालये कुठवर कामाला येणार?

व्यक्गीगत यशापयशाबद्दल भारतीय लोक एवढे आत्मकेंद्रीत असतो की टिमवर्क हा प्रकार बहुतांश भारतीय जीवनातून हद्दपार असल्या सारखा असतो मग क्रिडा असू द्यात संस्कृती का अगदी व्यावसायिक जीवन आपण असे का आहोत याचे आत्मपरीक्षण कसे करावे ? परिस्थिती सुधारण्या साठी काय उपाय असू शकतात ?

क्रिकेट आहे BCCI आहे न्यायालय प्राधान्य देऊन लक्ष घालतय यात एकतर न्यायालयात वर्षानुवर्षे तुडूंब भरलेल्या केसेस आणि त्यांना पाहून न आलेल्या केसेस यात कुठे अप्रत्यक्ष अन्यायच होत असतो दुसरे इतर सांस्कृतीक आणि क्रिडा क्षेत्रांच काय ?

अशा सर्व संघटनांचे मेंबर कोण होत असतात ? यात सर्व समावेशकतेचा अभाव का निर्माण होतो ? कंपुगिरी राजकारण का होत ? क्रिडाक्षेत्रात कॅप्टन होऊ शकणारे स्वतःचे व्यक्तीगत व्यवसाय ब्रँड व्यवस्थीत चालवणारे ऑदरवाईस व्यवस्थापन कौशल्य आणि खेळावर प्रेम असणारे क्रिडापटू क्रिडा संस्थांमध्ये उसन्या राजकारण्यांवर का अवलंबून असतात ?

धाग्याचा परिघ व्यापक केला आहे केवळ BCCI पुरता मर्यादीत नाही कारण माझ्या व्यक्तीगत मतानुसार " BCCI तो केवल झाकी है; इसमे तो पुरा देश साथी है" याच्याशी कदाचित बरेच जण सहमत होणार नाहीत, या प्रश्नांची उत्तरे माझ्या कडे नाहीत आपल्या पैकी कुणाकडे असतील तर विचार जाणून घेण्यास आवडतील.

प्रतिक्रिया

केवळ BCCI पुरता मर्यादीत नाही कारण माझ्या व्यक्तीगत मतानुसार " BCCI तो केवल झाकी है; इसमे तो पुरा देश साथी है" +१

आत्मशून्य's picture

29 Mar 2014 - 1:44 pm | आत्मशून्य

जुनी दारु....

असो भारतात कंपूबाजी ची बीजे ही जेष्ठ नागरिकांच्या गाढवपणाची फ़्ळे आहेत हे नक्की.