माहिती
Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ५
त्या सॅलरी स्लिप त्याने बँकेत जमा केल्यावर त्याने (आनंदाने) एक बातमी दिली तुझी सॅलरी २,००,००० पेक्षा कमी आहे त्यामुळे तुझं लोन फक्त १,७०,००० एवढच होऊ शकत... (काय???? बाकीचे १,८०,००० कुठून आणु.) मी माझ्या मैत्रिणीला फोन केला मी ३. ५० लाख जमा करू शकत नाही आहे. तर तू मला थोडी मदत करशील का या वर माझ्या चुलत सासूबाई आजारी आहेत माझा नवरा चेकबुक आताच घेऊन गेलाय त्यामुळे मी काही मदत करू शकत नाही तुझं तुला पाहावं लागेल. (अरे हि तर म्हणत होती कि तुझ्या पैशांची जबाबदारी मी घेते, कमी पडलं तर मी मदत करेन ) मी गप्प बसलेली पाहून ती बोलली अग त्या खूप सिरिअस आहेत त्यामुळे मी तुला मदत नाही करू शकत.
नेत्रसुखद - मनोरंजक - उत्कंठावर्धक.... (भाग १) - नांदी
मित्रहो, कधी सुंदर, मनमोहक -- "मृदु मंजुळ कोमळ" तर कधी " भव्य अद्भुत विशाळ" अश्या, विविध रसांचा अविष्कार करणाऱ्या प्रतिमा बघण्यासाठी हा धागा आहे. . यात वाचण्यासारखे फारसे काही असेल- नसेल, पण बघण्यातून आनंद मिळेल, मनोरंजन होईल, थोडीशी माहितीत भर पडेल अशी आशा आहे. वाचकांनीही विषयानुरूप आपापली भर इथे टाकली, तर सोन्याहून पिवळे.
तर आगामी भागांतून इथे काय काय बघायला मिळेल, याची एक झलक या 'नांदी' मधून देतो आहे.
१. 'साडी'तील सौंदर्य (-वती)
Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ४
या फोन नंतर मी माझ्या नवऱ्याशी बोलली काय वाटतंय तुला. तर तो बोलला कि Mr. परेश फक्त आणि फक्त पैसे आणा एवढच बोलत होता. त्याने मला समजेल असं काहीही सांगितलं नाही आहे. त्याला पैशाची घाई लागलीय. मला पटायला लागलं होत. या वर तुझ्या मित्र राजकारणात आहे त्याला Mr. परेशी माहिती काढायला सांग असं सुचवलं. मी त्याला सांगितलं कि तो लोढा ग्रुप मध्ये civil engineer आहे , आणि तो आपल्या गल्लीतच्या जवळच राहतो. यावर नवऱ्याने शांत राहणे पसंत केलं ;)
Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी २
त्यानंतर त्याने मला सांगितलं कि तुला यात काही अमाऊंट गुंतवावी लागेल कारण या अमाऊंट मधून तुझं इ -शॉपीचा ID विकत घ्यावा लागेल ती अमाऊंट ३. ५० लाख , ५. ५० लाख, ७. ५० लाख, १०. ५० लाख आणि या पुढे तू कितीही टाकू शकतेस. यावर मी ३. ५० लाख गुंतवू शकते कारण मी कोणाकडे मागायला जाऊ शकत नव्हती माझे आई बाबा भारत बाहेर होते आणि मी सासू सासऱ्याकडे मागु कसे? जे काही होत ते मला माझ्या जबाबदारीवर उभं कराच होत. मी त्याला माझा पैशाचा प्रॉब्लेम आहे पण मी बिझनेस साठी टाइम मॅनेज करू शकते असं सांगितलं.
Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी
आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी
आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे पुस्तकाला पारितोषिक
माझ्या अनुवादाला,
"आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे" ह्या
ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित पुस्तकाला,
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे,
’लोकहितवादी रा.ब.गोपाळ हरी देशमुख’ पारितोषिक देण्याचे ठरले आहे.
इष्ट जनांस आमंत्रण आहेच.
बलुची लोक व बलुचिस्तान : एक संक्षिप्त आढावा
पंतप्रधान मोदींनी बलुचिस्तानचा आपल्या १५ ऑगस्ट २०१६ च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात उल्लेख केल्यानंतर त्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. परंतु, जगभरच्या लोकांत, बलुचीस्तानबद्दल जितकी माहिती आहे त्यापेक्षा अनेक पटींनी अज्ञान आहे. तेव्हा माझे अल्पज्ञान इथे मिपाकरांबरोबर वाटून घ्यावे असे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच. असो.
स्वानुभव
(फक्त) ऑफिस ला पर्याय...
नमस्कार मिपाकरहो !
कृपया मला कुणी (फक्त) ऑफिसला साजेसा पर्याय सांगेल का?
अवतीभवती अशी बरीचशी माणसे आहेत ज्यांना तिथे काम करणे आवडत नाही आणि उपाशी राहणेही योग्य वाटत नाही. अशांसाठी काही पर्याय माहित असल्यास सुचवावे.
धन्यवाद.
योगशिबीरातले दिवस २: योगाभ्यास- A man is as old as his spine is flexible
मागच्या लेखात शिबीराची ओळख, दिनचर्या सांगितली . या लेखात शिबीरात काय काय शिकलो हे थोडक्यात सांगत आहे. अर्थात शेवटी, केंद्रातले व्यासंगी, प्रगल्भ वक्ते हे सगळे अतिशय प्रभावीपणे अगदी सहजगत्या उलगडुन सांगतात. तिथले प्रदुषणमुक्त वातावरण, आहार-विहार आणी मुख्यतः सामुहिक साधनेचा खुप फरक पडतो. सकारात्मक स्पंदने मिळतात.
अष्टांग योगात यम नियम वगैरे असतात हे आपण वाचले/ऐकले आहे. पण यम नियम म्हणजे तरी काय, याबद्दल जे आम्हाला सांगितले ते इथे मुद्द्यानिशी मांडतेय . यातही ८ पैकी पहिल्या ५ बहिरंग योगावरच इथे सांगणार आहे.