बहुचर्चित "सैराट"
बहुचर्चित "सैराट" काल बघितला. इतका उशीरा का ? असं काहींच्या मनात आलं सुद्धा असेल, खास करून , माझे काही मित्र मैत्रिणी , ज्यांना हा सिनेमा खूपच भिडलाय. असो. खरं म्हणजे कुठलाही सिनेमा ...अगदी सुपरेस्ट हिट ही का असेना , मला लग्गेच थेटरात जाऊन पहावा असा उत्साह बिलकुल नव्हता, अजूनही नाही.
घरात , रविवारी वगैरे , तो पण सैराट किंवा गेल्या रविवारचा मुं-पुणे-मुंबई :२ वगैरे अगदी गाजलेले चित्रपट असतील तर मात्र घरात , हाफ चड्डी घालून , ऐस पैस बसून मला पाहायला आवडतात. मध्ये मध्ये चहा - खाणं चालूच. जाहिराती ? नो प्रोब्लेम man !