विचार

पर्यटन विशेषांक - बॉलीवूड

हृषिकेश पांडकर's picture
हृषिकेश पांडकर in जनातलं, मनातलं
9 Jun 2016 - 10:50 am

परवा 'चेन्नई एक्स्प्रेस' प्रदर्शित झाला.दीपिका पादुकोणच्या निमित्ताने माझे पाहणे झाले.सुमारे तीन तासाच्या प्रवासानंतर मी थियेटर मधून बाहेर पडलो.सिनेमाची कथा,गाणी,संवाद या गोष्टींवर नेहमी होते ती चर्चा झाली.सिनेमा कसा आहे, कोणाचा अभिनय कसा आहे इत्यादी पिसे काढून झाल्यावर आम्ही तिथून मार्गस्थ झालो.आता पिक्चर कसा आहे वगरे हे मुद्दे थोडे वादग्रस्त असू शकतात,कारण कोणाला काय आवडावे किव्वा काय आवडू शकेल याचा ताबा आपल्याजवळ नसतो.अर्थात याच वेगवेगळ्या चवी जश्या पाहणार्यांच्या असतात तश्याच त्या दिग्दर्शक गायक आणि लेखक यांच्या देखील असतातच.त्यामुळे सिनेमा कसा होता याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न नक्कीच

चित्रपटविचार

ज्योतिष विषयातील चर्चा करण्यासाठी ज्योतिष व्हॉट्सअ‍ॅप समुह

निनाद's picture
निनाद in जनातलं, मनातलं
9 Jun 2016 - 8:39 am

ज्योतिष विषयातील चर्चा करण्यासाठी ज्योतिष व्हॉट्सअ‍ॅप समुह तयार केला आहे.
हा समुह ज्यांना ज्योतिषाची थोडीफार माहिती आहे, या विषयात रस आहे अशा सदस्यांसाठीच आहे याची नोंद घ्यावी.
ज्योतिष विषयावर
माहितेची देवाण घेवाण,
सल्ला मसलत,
कुंडलीची चर्चा,
बदलत्या ग्रहस्थितीमुळे होणारे परिणाम याची चर्चा,
नवीन प्रसिद्ध झालेली मासिके, पुस्तके आणि लेख यावर विचार विनिमय,
अशा विषयांसाठी असावा अशी धारणा आहे.

समाजविचार

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ८: इस्राएलचे जल- संवर्धन

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
6 Jun 2016 - 10:33 pm
संस्कृतीधर्मसमाजजीवनमानतंत्रविचारलेख

पर्यावरण संवेदनशील इमारती/ शहरे (Environment sensitive buildings/ urban Development): गरज

उल्लु's picture
उल्लु in जनातलं, मनातलं
6 Jun 2016 - 8:11 pm

गेली काही वर्षे आणि विशेषतः गेले काही महिने आपण वातावरण बदलाचे परिणाम अनुभवतोय. दरवर्षी होणारी पाणी कपात, दुष्काळामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, लातूरला पाठवलेली जलदूत रेल्वे ह्या सारख्या बातम्या आपल्याला नित्याच्या झाल्या आहेत. बर्याच वेळेला ह्या विषयांवर अनेक मंचांवर झालेल्या चर्चाही आपण पहिल्या आहेत किंवा केल्याही आहेत. मिपा वरही अनेक धाग्यातून ह्या विषयांवर चर्चा झाल्या आहेत. ह्या विषयावर होणाऱ्या बहुतेक चर्चांमध्ये आपण आता मान्य करतोय कि वातावरण बदल (climate change) होतोय आणि त्याचा मानवी जीवनावर दुष्परिणाम होत आहे.

जीवनमानविचारमाहिती

कृत्रिम शीतपेये - सावधान ! ! !

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
6 Jun 2016 - 1:19 pm

cold drinks
कृत्रिम शीतपेये पिताना अनेक घातक द्रव्ये पोटात जातात. या शीतपेयांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. या शीतपेयांचे सातत्याने सेवन केल्यास मधुमेहासारखा गंभीर विकार जडू शकतो. त्यामुळे ही पेये पिण्याऐवजी देशी शीतपेये पिण्यास प्राधान्य द्यायला हवे.

हे ठिकाणशिक्षणप्रकटनविचार

मी एकटा आहेच कुठे?, , , , , "खरे सुपरमॅन - आमचे आप्पा" या लेखात नमूद केलेला लेख.

स्वीट टॉकरीणबाई's picture
स्वीट टॉकरीणबाई in जनातलं, मनातलं
3 Jun 2016 - 4:39 pm

'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात मी आप्पांच्या या लेखाचा उल्लेख केला होता आणि तुम्ही मंडळींनी तो लेख इथे टाकावा अशी इच्छा व्यक्त केली होती. तो हा लेखः

माझी पत्नी प्रतिभा सुमारे अडीच वर्षांपूर्वी निधन पावली. त्या वेळेपसून मी एकट्याचे जीवन जगत आहे. सुरवातीला हा एकटेपणा खूप त्रासदायक वाटत असे. विशेषतः ‘या परिस्थितीत आता फरक पडणार नाही’ या जाणीवेने अतिशय त्रास होई. पण मी सतत विचार करीत राहिलो. आता या परिस्थितीत जर फरक पडणार नाही तर त्या परिस्थितीशी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त जुळवून घेणं हे श्रेयस्कर नाही का? विचार पटला तरी हे करणं सोपं नसतं आणि सोपं नव्हतंच!

कथासमाजजीवनमानविचारलेखअनुभव

तो प्रवाही प्रवास…!

अश्विनी वैद्य's picture
अश्विनी वैद्य in जनातलं, मनातलं
3 Jun 2016 - 5:02 am

नदीकिनारी चालत जाताना उन्हाची ऊब जरा जास्तच जाणवत होती. तळपायांना थोडा गारवा मिळावा म्हणून किनाऱ्यावर लांबच लांब पसरलेल्या हिरव्या, थंडगार लुसलुशीत गालिच्यावर शूज काढून पाय टेकवत एका झाडाखाली बसले. तिथल्या नीरव शांततेचाही एक वेगळाच आवाज कानांना जाणवत होता.

जीवनमानविचार

किल्ला चित्रपटाच्या निमित्ताने

पैसा's picture
पैसा in जनातलं, मनातलं
2 Jun 2016 - 11:20 pm

1

रविवारी "किल्ला" (२०१५) पाहिला. अतिशय सुंदर अनुभव देणारा चित्रपट. १०/११ वर्षांचा चिनू आणि त्याची आई चिनूचे वडील नुकतेच गेल्यावर आयुष्याशी तडजोड करत आहे ती परिस्थिती स्वीकारायला शिकतात, त्यांच्या आयुष्यातल्या साधारण एका वर्षातल्या घडामोडीं या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात. चित्रपट प्रदर्शित होऊन आता बरेच दिवस झालेत त्यामुळे कथेचा काही भाग इथे त्यानिमित्ताने मनात आलेले विचार लिहिताना आला तर तो स्पॉयलर ठरू नये.

चित्रपटविचार

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण..२

अक्षय१'s picture
अक्षय१ in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 9:14 pm

ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत, की जेणेकरुन लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही.

टीपः वरील भाषण संपादित स्वरुपात आहे.
(स्रोत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३- १९४६ ते १९५६)

इतिहाससमाजविचार

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण.१

अक्षय१'s picture
अक्षय१ in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 9:07 pm

२६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे.

इतिहाससमाजविचार