ज्योतिष विषयातील चर्चा करण्यासाठी ज्योतिष व्हॉट्सअॅप समुह तयार केला आहे.
हा समुह ज्यांना ज्योतिषाची थोडीफार माहिती आहे, या विषयात रस आहे अशा सदस्यांसाठीच आहे याची नोंद घ्यावी.
ज्योतिष विषयावर
माहितेची देवाण घेवाण,
सल्ला मसलत,
कुंडलीची चर्चा,
बदलत्या ग्रहस्थितीमुळे होणारे परिणाम याची चर्चा,
नवीन प्रसिद्ध झालेली मासिके, पुस्तके आणि लेख यावर विचार विनिमय,
अशा विषयांसाठी असावा अशी धारणा आहे.
या समुहावर ज्योतिष/भविष्य संबंधित विषयाशिवाय इतर कोणतीही चर्चा करता येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. प्रसंगी समुह दिवसेंदिवस थंड राहिला तरी चालेल.
समुहात सामील होण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक व्यनि ने कळवावा (येथे सार्वजनिकरित्या देउ नये)
आपला नम्र
निनाद
प्रतिक्रिया
9 Jun 2016 - 8:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जग कुठे चाललं आणि आपण कुठे चाललो ? छ्या निनाद सरांचा अशा विषयांवरचा धागा पाहुन नर्व्हस झालो. माझा उपक्रम नावाच्या संस्थळावर गुंडोपंत नावाचा एक मित्र होता तो म्हणायचा, हजारो लाखो कोटी वर्ष अंतरावर असलेले दगड गोटे औरंगाबाद मधील माझ्या घरी जिथे सूर्य प्रकाश देखील भीत भीत येतो तिथे तो दगड मला काय शोधनार आणि माझ्यावर काय प्रभाव टाकनार. मला या गोष्टी पटत नसल्या तरी वाट्सएप ग्रुप साठी शुभेच्छा. मलाही नै म्हणून ग्रुपवर घेण्यात यावे, वाचनमात्र राहीन. काय काय गप्पा करतात त्याची उत्सुकता म्हणून. आपण माझा नंबर रागाच्या भरात डिलीट केला नसेल तर पुन्हा पाठवतो. धन्यवाद. :)
-दिलीप बिरुटे
(गुंडोपंतांचा जाल मित्र)
9 Jun 2016 - 9:41 am | निनाद
नर्व्हस होण्यासारखे काही नाही. ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही त्याची माहिती करुन घेणे कधीही उत्तम.
या जीवनाचा अर्थ लावण्याचे जे काही अनेक प्रयत्न आहेत त्यापैकीच ज्योतिष हा ही आहे.
9 Jun 2016 - 10:39 am | शाम भागवत
फोन नंबर नीट मुहुर्त काढून पाढवा म्हणजे डिलीट होणार नाही.
;-))
9 Jun 2016 - 3:52 pm | सत्याचे प्रयोग
+1111
9 Jun 2016 - 9:43 am | निनाद
या समुहावर ज्योतिष खरे की खोटे इत्यादी चर्चा करता येणार नाहीत याची नोंद घ्यावी.
ज्योतिष शास्त्राची आवड आणि त्यातील बाबींची चर्चा करण्यासाठी हा समुह आहे. तेव्हा त्यात ज्योतिष खरे की खोटे इत्यादी चर्चा होणार नाही. जे सदस्य अशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतील त्यांना या समुहातून त्वरित बाहेरचा रस्ता दाखवला जातो.
तसेच या समुहाचा वापर व्यावसायिकरित्याही करता येणार नाही, याचीही नोंद घ्यावी.
सर्व ज्योतिष प्रेमी सदस्यांचे सहर्ष स्वागत आहे!
9 Jun 2016 - 10:15 am | टवाळ कार्टा
एखादी व्यक्ती या ग्रुपमध्ये येउन ज्योतिशविरोधी मत मांडेल की नाही त्याचे भविष्य सांगता आले तरी पुरे =))
9 Jun 2016 - 10:54 am | कंजूस
हे एक चांगलं केलं निनाद. धाग्याची इकडे पंचिंग ब्याग व्हायची तशी ग्रुपची नाही होणार.मायबोलीवर बरेच वर्ष बिनबोभाट धागा चाललेला.पण आता त्यांची चर्चा केपीवर होऊ लागली.चारदोन विनोदी प्रतिसादकर्त्यांना ग्रुपमध्ये असू द्या.म्हणजे गम्मत राहील.मला आवड आहे परंतू वाटसप नको वाटते.
9 Jun 2016 - 1:15 pm | कलंत्री
एक वेगळा विषय म्हणून समजावून घ्यायला काय हरकत आहे.
नाही आवडल्यास ग्रुप कधीही सोडता येतोच ना?
9 Jun 2016 - 10:18 pm | कंजूस
आवडल्यास ग्रुप कधीही सोडता येतोच ना?"
--
तसं नाही.मुद्दा असा आहे की वाटसप "IM instant messaging app " आहे.एका ग्रुपातल्या लोकांना एकच निरोप पाठवण्यासाठी आहे.संस्थळाची धागे/अनुक्रमणिका/पुर्वीचं लेख वाचन क्षमता आहे का?अशा कामासाठी ते तोकडे पडते.
10 Jun 2016 - 12:37 am | निनाद
आपले म्हणणे योग्य आहे, सहमत आहे.
परंतु तेथे वेगवान संपर्क आणि पंचिंग ब्याग ना होण्याची क्षमता हे प्रमुख भाग आहेत.
10 Jun 2016 - 6:45 am | कंजूस
कोणी कोणत्या विषयावर काय मत व्यक्त केलं हे पाहण्यासाठी काहीच सोय नाही.फेसबुक ग्रुपमध्येही सारखं"load more stories?" असे उत्खनन करत मागे जावं लागतं.सगळी मेहनत वाहून जाते.त्यापेक्षा मिपाची तुमची/दोनचार जणांची खरडवही वापरता येईल.ज्योतिष न आवडणारे नेहमी तिथे जाऊन लिहिणार नाहीत.संगतवार लेखन कायम उपलब्ध राहील.करून पाहा एकवार.वाटसपपेक्षा उपयुक्त ठरेल.
9 Jun 2016 - 1:21 pm | निनाद
सर्वांचे भ्रमणध्वनि मिळत आहेत.
प्रत्येकास वेगवेगळी पोच न देता ही एकच पोच देत आहे ती गोड मानून घ्यावी!
सर्वांचे स्वागत आहे समुहात...
9 Jun 2016 - 4:01 pm | अनन्य
छान उप्क्रम अहे
9 Jun 2016 - 8:19 pm | उपयोजक
जे लोक मिपाचे सदस्य नाहित त्यांनाहि सामिल होता येईल का?कसे?
10 Jun 2016 - 12:34 am | निनाद
ग्रुप सर्व ज्योतिषप्रेमींसाठी खुला आहे.
15 Jun 2016 - 12:28 pm | निनाद
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.
वेळ मिळेल तसे सदस्य समुहात सामील होत आहेत.
अतिशय उत्कृष्ट चर्चा आणि कुंडल्यांचे विवेचन होत आहे.
'ज्योतिष विषयातील चर्चा' हा उद्देश फार चांगला सफल होत आहे.
आपल्या सहकार्याबद्दल अनेकानेक धन्यवाद!
15 Jun 2016 - 12:47 pm | कलंत्री
निनाद : अभिनंदन. पुरातन शास्त्र आणि आधुनिक तंत्राचा वापर करुन देशीविदेशी समविचारी लोकांचा संघ बांधण्याचे काम आपण करुन दाखविले आहेत.
माणूस आपल्या समस्यांनी गांजलेला असतो अश्या वेळेस कोठेतरी उपाय आहेत याचा विश्वास सामान्य माणसांना देण्याचे सामर्थ्य यात आहे.
त्याचबरोबर सारासार विवेक वापण्याचे बंधनही आपोआप लागु पडतेच पडते. योजक दुर्लभ असतो असे म्ह्णणतात हेच खरे.
अश्याच प्रकारचे आपल्या छंदाचे वेगवेगळे गट निर्माण करता येतीलच.