‘तुला’
तुला मानण्यात काहीच अर्थ नाही, तू आहेस ही जाणिव मुळात नकोशी आहे. इथे तू हवाच कुणाला आहे.
तुझ्या आदर्शांचा न्याय जगात सर्वत्र लावता येत नाही. तूला स्मरायचे ते फक्त मन:शांती साठी ? मन:शांती ती फक्त योग्य निर्णयासाठी. आणि योग्य निर्णय तो फक्त आपल्या फायद्यासाठी ? पिडीत, उपेक्षित, अन्याय सहन करणारे अश्या ढाली घेवून जगणार्यां, समानतेची मागणी करणार्यांना तुझ्यावरच विश्वास नाही. तुझ्या तत्वांचे उपदेश देणार्यांमध्ये ‘मी’ पणाचा वास येतो. असे दोन्हीही सतत तुलना करत असतात. तुझ्या चांगल्या वाईटची. आस्तिक नास्तिकाच्या विचारांची. यश अपयश – चढ उतार सगळ्याचं पाहावे लागतात.