विरह.....4
रात्री सर्व झोपल्यावर मी मागच्या पाईपने आत शिरलो, अवनी रडत होती मला बघताच ती गळ्यात पडून रडू लागली मग दोघांच्या आसवांपुढे पावसाचा वर्षाव कमी पडू लागला, मी तीला समजावून सांगू लागलो पण ती एकतच नव्हती, ती म्हणाली,सम्यंक मी तुझी नाही तर कोणाचीच नाही होणार, आणि तुझीही नाही झाले तर आत्महत्या करणार, मी अवनीला खूप समजवलं पण ती ऐकतचं नव्हती मी म्हटलो ठिक आहे तर मी पण तुझ्याशिवाय नाही जगू शकतं आपण उद्या सोबत जिव देऊ! अवनी म्हणाली अरे पण आपण पाहीलेली स्वप्न एकत्र जिवन जगण्याची ती सर्व स्वप्न?