निर्गुणी भजने (भाग २.२) - सुनता है गुरु ग्यानी
सुनता है गुरु ग्यानी या भजनात अनेक रूपके आहेत. आणि प्रत्येक रूपक दुसऱ्याशी सुसंगत देखील नाही. म्हणून शोधलेल्या संदर्भातील वाचलेले अर्थ मनाचे समाधान करीत नव्हते. एक दिवस डॉ परळीकरांच्या आणि लिंडा हेस यांच्या पुस्तकातील भजनांचा क्रम बघत होतो. परळीकरांच्या पुस्तकात भजने कुठल्याही क्रमाने येतात तर हेस बाईंच्या पुस्तकात ती अक्षरमालेच्या अकारविल्हे क्रमाने येतात. आणि एकदम जाणवले दोन्ही लेखक कबीरांच्या मनस्थिती किंवा भावस्थिती ऐवजी शब्द आणि अक्षरप्रधान अर्थ देत आहेत. जिथे भजनाचा आत्मा निर्गुण आहे तिथे सगुण शब्द मुख्य मानून लावलेला अर्थ माझ्या मनाचे समाधान करणारा होत नव्हता.