रंडीबाज कवी
काल मी माझ्या कविता एका पोत्यात भरुन टाकल्या
पोत्यात भरता भरता काही मधल्यामध्येच फाटल्या
'तुझ्या'वरच्या कविता मात्र एक एक करुन कापल्या
घरामागे शेकोटी करुन मग त्यात काही फेकल्या
'रंडी'वरच्या कविता मात्र पुन्हा पुन्हा वाचल्या
घडी घालून त्यांना मग पोत्यातच घातल्या
तरीही काही कागद उडतच राहीले
अर्धे मुर्धे जळालेले तुकडे फिरतच राहीले
काही आभाळी जाऊन पुन्हा खाली झरतच राहीले
तर काही राख होऊन वेदनांना कुरवाळत मरतच राहीले
अजूनही काही कविता या पोत्यात सडतच आहेत
एक 'ही' सोडली तर बाकी सगळ्या रडतच आहेत