खरं तर आता शोध लागल्या सारखा वाटतो !
पण तसं नसतं, खूप लांब असलेलं धेय, अगदी जवळ
आल्या सारखं वाटत, तसा अंधारात चालताना मी सावध असतो,
पण अंधार त्याहूनही सावध, फक्त घनदाट काळोख दाखवतो,
मग स्वप्ने तुमची तुम्हीच पहा,
रात्र आणि स्वप्ने हे गणित तुमच्यासाठी,
स्वप्नांना काय ? तुम्ही रात्री बघा नाही तर दिवसा,
टाळु म्हणता न टाळता, काट्याची वाट धरायची,
काटा का ये म्हणतो ? तरी पण जाणून न जणल्यासारखे
करायचे, भांपकपणा दुसरे काय !
आता मला काय वाटते आणि शरीराला काय वाटते ?
ह्याचा विचार मी करायचा की शरीराने ?