मिपावर मी दोन दिवसांपूर्वीच आलो आहे. तसे मिपाचे वाचन खूप दिवसांपासून करत आहे. आज आल्या आल्या एक शाब्दिक चकमक झाली जिच्यामुळे हा लेख लिहिणे महत्वाचे वाटले.
प्रथम, वर्तमानपत्री लिखाण याविषयीचा माझा समज म्हणजे निरर्थक ताणून धरलेले आणि मराठी भाषेला परिचयाचे नसलेले किंवा 'रोमांटीक लव' सारख्या पाश्च्यात संकल्पनांना मराठीतल्या शृंगार रसाशी जुळवून मुक्तछंदात लेखन करणारे कवी आणि तत्सम लेखक यांचा लेखन प्रपंच.
याचेच एक उदाहरण म्हणजे फक्त वाचकांना रंजक वाटावी याच हेतूने लिहिली जाणारी आधुनिक प्रकारची धड गद्यही नाही आणि पद्यही नाही अशी कथा. या कथा म्हणजे माझ्या आतापर्यंतच्या मराठीतल्या वाचानापैकी सर्वात क्षुद्र वाङमय प्रकारात मोडतील.
काही तरी एक दोन चमत्कृतीपूर्ण किंवा 'शृंगारिक' मानसं किंवा घटना चोळून चोळून चार-पाच पानं क्रमशः धूर्तपणाने लिहिणार्यांची आजकाल खूप गर्दी झाली आहे. एक तर अशा प्रकारच्या तीन चार पानात एवढा कमी भाषीक अवकाश अभिप्रेत असतो कि त्यात फारसे काही सांगता येतच नाही.या जानुबुजून आणलेल्या रंजकपणामुळे अतिशोक्तीकडे कल वाढतो आणि लेखनात चटपटीत पणा हा एक गुण होऊन बसतो अर्थात हा उद्योग वर्तमानपत्रात आणि नियतकालीकातच होतो. सोशल मेडिया हेही एक नवीन साधन आता या लोकांनी हाताळायला सुरुवात केली आहे.
खरे म्हणजे 'कथा' या प्रकारात लिहिण्यासाठी भाषेवर भलताच ताबा असणे महत्वाचे असते, कवितेसारखे. पण हि नवलेखक मंडळी उगाच मानसिक, भावनिक, शृंगारिक किंवा जाणूनबुजून अंधुक ताण मांडतात आणि 'आभाळ भरून आले होते', 'बाहेर उन मी म्हणत होते', असली रटाळ पद्यात्मक वाक्ये वापरून वरील अटीला पद्धतशीर कलाटणी देतात. हा हातखंडा यायला खरच एक अनुभवी वर्तमानपत्री व्हाव लागतं हे मात्र मला मान्य.
याच लेखकातली काही मंडळी वर्तमानपत्रात 'फालतू' समीक्षणे करतात. आणि अमुक नवकवींची कविता हि "प्रत्येक वेळी वाचल्यावर नवा अर्थ सांगते" असली धाडसी विधाने करतात. खरतर हे सगळे लेखक आणि कवी टोळ्यांनी कार्यरत असतात. एकमेकांची स्तुती करून हे मोठेपणा मिळवतील आणि आयुष्यभर फक्त लेखक किंवा कवी म्हणवून घेण्यासाठी हे फुकट लिखाण करतील. मग हेच टोळके म्हातारे होता होता प्रतिष्ठित 'साहित्यिक' होऊन बसतील आणि चांगले लिखाण करणाऱ्या एखाद्या नवख्याला मुर्खात काढतील.
नावाच्या अगोदर 'प्राध्यापक' 'डॉक्टर' 'कवी' किंवा 'साहित्यिक' ह्या पदव्या लावणे यांच्यासाठी साहित्यापेक्षाही महत्वाचे असते. कुणी काही बोलायला जावे तर 'तुम्ही काय समीक्षक आहात काय?' किंवा "हा साहित्याचा एक नवा प्रकार आहे" असली ठराविक ठेवणीतली उत्तरे देऊन मोकळे होतात. च्यायला वाचा म्हणावं एकच कविता वीस वेळा आणि सांगा वीस वेगवेगळे अर्थ.
अजूनही काही लिहायचे आहे पान आता रात्रीचे दीड वाजत आलेत नंतर कधीतरी याच लेखाचा दुसरा भाग आणखीन विस्तारित लिहीन म्हणतोय. राग येऊ द्या हवे तर, पान आपण लिहायाला घाबरत नाही ब्वा!
(मिपाच्या या सोफ्टवेअरचा अनुभव नसल्याने काही शब्द चुकीचे लिहिले गेले आहेत. चू.भू.द्या.घ्या.)
प्रतिक्रिया
25 Feb 2016 - 4:46 am | बहुगुणी
मी तुमच्या सदस्यत्व घेतल्यानंतरच्या ४ दिवस ४ तास इतक्या प्रदीर्घ अनुभवानंतर लिहिलेली दोन लिखाणं वाचली, एक कविता (जी तुम्ही स्वतः बाळबोध म्हणालात तरी मला आवडली) आणि एक related लेख, तोही काहीसा आवडला. पण त्या लेखाच्या प्रतिसादात एका प्रांजळ प्रतिसादानंतर (मला वाटतं ती अंमळ गंमत होती, त्या प्रतिक्रियेच्या) प्रतिक्रियेत संतापून जाऊन खालील काही विधानं केलीत.
हे असले "अस्सल" मासिक चालवणारे वर्तमानपत्री लिखाण सोडून इतर काही लिहिण्याच्या (किंवा वाचण्याचा), प्रयत्न करत जा एवढी एकच माझी आपणाला विनंती आहे, प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे साहेब.
(माझा असा समज आहे कि तुम्ही "प्राध्यापक" म्हणून मराठी साहित्य किंवा कविता यांचे अध्यापन करत नसाल. आणि तो खरा ठरावा यासाठी मी नवस करतो आहे.)
आणि हो 'कमाल राशीद खान' नावाचा एक अतिशय नामांकित अभिनेता आहे. तुम्ही त्यालाच ट्विटर वर फोलो करा आणि त्याचेच लेखन वाचा! तुमची भावनांविशयीची उदासीनता पाहता तेच योग्य ठरेल..
प्रा. डाँ ना मी व्यक्तिश: भेटलेलो नाही, पण त्यांचं भावपूर्णच (आणि अगदी साहित्यिक मूल्य वगैरेही असलेलंही) नव्हे तर अभ्यासपूर्णही असलेलं लिखाण मात्र नक्की वाचलेलं आहे. काही दुवे मी खाली देतो आहे, आपल्याला वेळ मिळेल तेंव्हा वाचा. पण जिथे लेखक-वाचक (थट्टा-मस्करी करीत का असेना, पण) एकमेकांकडून काही चांगलं वाचायला मिळावं म्हणून अशा संस्थळांवर येतात तिथे असा तिरीमिरीचा संताप सोडलात तर तुमचंच भलं होईल.
सर, इतकं जिवापाड प्रेम करु नका!
बालकवी
अंत:स्थ
कोणता मानू मी विठठल?
मी अशा वैयक्तिक वादांमध्ये सहसा पडत नाही, पण तुमच्याकडून व्यक्तिशः काही चांगलं वाचायला मिळेल अशी आशा आहे, त्या अपेक्षेवर असले नसते वाद घालून पाणी ओतू नका.
25 Feb 2016 - 6:33 am | रातराणी
सहमत.
हा लेख वाचून अगदी हेच विचार मनात आले होते पण मला नेमक्या शब्दात ते मांडता नाही आले.
वर्तमानपत्रीय लेखन वाचायला या अशी पत्रिका घेऊन मिपाकर तुमच्याकडे आले नाहीत निखा. आवडेल ते वाचा. न आवडेल ते सोडून द्या.
25 Feb 2016 - 8:42 am | स्पा
ओ, अच्च जाल्ल खाडे बाबुला
25 Feb 2016 - 9:46 am | जेपी
येऊद्या पुढचा भाग.
आपण वाचायला घाबरत नाही.
25 Feb 2016 - 9:58 am | मोदक
=))
25 Feb 2016 - 10:35 am | पैसा
=))
25 Feb 2016 - 11:00 am | अजया
=))
जेपीला भावीसंपादक करा ब्वा.
25 Feb 2016 - 11:12 am | नाखु
तेव्हा तरी घाबरायला लागेल (अशी भाबडी अपेक्षा)
25 Feb 2016 - 4:06 pm | खेडूत
म्हणजे ते भावी संपादक नाहीयेत?
25 Feb 2016 - 9:55 am | सतिश गावडे
कुणी जर घोळक्याने 'वर्तमानपत्री' लिखाण करत असेल आणि नव्या लेखनाविषयीची असहिष्णुता दाखवत असेल तर:
- ते त्यांचे निरर्थक अत्मकुंथन आहे.
- तो त्यांचा भ्रम आहे.
- त्यांना मुद्दा कळलेला नाही
- ते निरर्थक भ्रमवादाचे बळी आहेत.
25 Feb 2016 - 9:59 am | प्रचेतस
आणि असा आपला समज आहे आणि
तुम्हाला स्व गवसलेला नाही
25 Feb 2016 - 10:02 am | सतिश गावडे
हे दोन अतिशय महत्वाचे मुद्दे मी विसरलो होतो.
25 Feb 2016 - 10:06 am | मोदक
तुम्हाला स्व गवसलेला नाही
असे पिवळे लिहिले तरच या हिर्यासारख्या वाक्याला पिवळ्या सोन्याचे कोंदण लाभते प्रचेतस सर!
25 Feb 2016 - 10:07 am | सतिश गावडे
=))
25 Feb 2016 - 10:16 am | प्रचेतस
खी खी खी.
अगदी अगदी.
25 Feb 2016 - 10:33 am | नाखु
तिघांना आणि जेप्याला कुंथुनाथ (मधल्या सुट्टीत) बघून घेईल इतके बोलून मी खाली बसतो.
सातवी फ शेवटून दुसरा बाकडा
आम्ही कश्यालाच घाबरत नाही विद्यामंदीर
25 Feb 2016 - 11:07 am | स्पा
कुंथुनाथाय नम :
अत्मकुंथनाय नम :
हस्त तांब्या ( तु ये तुला फुकट दीन) प्रक्षालनम समर्पयामी
26 Feb 2016 - 6:27 am | अत्रुप्त आत्मा
दुधूनाथाय नम :
पुचुपुचुओढायनम :
हस्तमध्ये घट्ट पकड दुग्ध-कलश ( तु ये ,मी सगळं पीईन! ) सतत पीवयामी!!!
इति दुग्धाळ पांडू कुर्तीम् .
26 Feb 2016 - 9:09 am | प्रचेतस
अरे क्काय हे...
भलतंच चित्र डोळ्यांसमोर येऊ राह्यलं ना. =))
26 Feb 2016 - 9:13 am | नाखु
बुवांना ओळखलेच नाही ते "चित्रदर्शीच" लिहितात, फक्त तुमची बघण्याची नजर हवी !!!
पळा पळा पुढे कोण पळे तो नाखु
26 Feb 2016 - 9:58 am | किसन शिंदे
आवरा!!
=)) =)) =))
26 Feb 2016 - 9:18 am | सतिश गावडे
अरे सत्यनारायणा...
उशिरा का होईना, तुम्ही तू ये, तुला फुकट देईन ची दखल घेतलीच. ;)
26 Feb 2016 - 4:43 pm | सूड
आवरा!! दिवटे परवडले असं वाटलं हे वाचून...
29 Feb 2016 - 2:35 pm | बॅटमॅन
ठरकी आत्मा =)) =)) =))
25 Feb 2016 - 11:15 am | बोका-ए-आझम
ल्ल् ल्ल् ल्ल ल्ल् ऊ आणि दू दू वगैरे राहिलं ना हो!
26 Feb 2016 - 4:42 pm | सूड
दू दू दिलिहीलंय की हो वर स्पावड्याला...
25 Feb 2016 - 11:17 am | भाग्यश्री कुलकर्णी
बहुगुणींच्या प्रतिसादाशी सहमत. प्रा.डॉ.नी त्या धाग्यावरील नंतरच्या प्रतिसादात थोडी गंमत असे म्हटलेय बहुतेक. चांगले लिहीता तुम्ही.त्रागा न करता मिपा परीवारात राहीलात तर हा खुप मोठा आधार आहे. स्वानुभव सांगते. रुळलात की त्रास नाही जाणवणार. वैचारीक मतभेद असले तरी सगळी आपलीच आहेत.
25 Feb 2016 - 11:23 am | निशांत_खाडे
यापुढे लक्षात ठेवीन..
25 Feb 2016 - 11:32 am | महासंग्राम
मग आपली वर्तमानपत्री' लिखाण- याची व्याख्या सुद्धा सांगून टाका जाताजाता .
25 Feb 2016 - 12:27 pm | निशांत_खाडे
वर्तमानपत्री लिखाण याविषयीचा माझा समज म्हणजे निरर्थक ताणून धरलेले आणि मराठी भाषेला परिचयाचे नसलेले किंवा 'रोमांटीक लव' सारख्या पाश्च्यात संकल्पनांना मराठीतल्या शृंगार रसाशी जुळवून मुक्तछंदात लेखन करणारे कवी आणि तत्सम लेखक यांचा लेखन प्रपंच. याचेच एक उदाहरण म्हणजे फक्त वाचकांना रंजक वाटावी याच हेतूने लिहिली जाणारी आधुनिक प्रकारची धड गद्यही नाही आणि पद्यही नाही अशी कथा.
25 Feb 2016 - 5:20 pm | महासंग्राम
एखादे नवीन लेखन जर मराठी भाषेत येवू घातले असेल तर त्याला विरोध का म्हणून करावा ??? कोणत्याही नवीन लेखनाचे आपण स्वागतच करायला हवे ना. आणि मुक्त छंदात लेखन करणे म्हणजे गुन्हा नक्कीच नाही. कोणी काय लिहावे आणि ह्याच पद्धतीत लिहावे असे नियम आहेत असे माझ्या तरी स्मरणात नाही.
तसेही प्रसिद्ध कवींनी म्हंटलेच आहे कि
जुने जाउद्या मरणा लागुनी
जाळूनी किवा पुरुनी टाका ( चुभूदेघे )
25 Feb 2016 - 6:52 pm | सिरुसेरि
अजुन काही उदाहरणे थोडी विस्ताराने सांगीतली तर संदर्भ समजायला मदत होईल .
25 Feb 2016 - 10:21 pm | गामा पैलवान
निशांत खाडे,
वर्तमानपत्री लेखन असंच असणार आहे. शेवटी वर्तमानपत्र म्हणजे तरी काय असतं हो ? क्षणभराचं वाङ्मय आणि अनंतकाळची रद्दीच ना? मग रद्दीतले रद्दड म्हातारपणी साहित्यिक झाले तर होऊद्या की ! सांगा, कोण भितो त्यांना ?
आ.न.,
-गा.पै.