औरंगाबादला सकाळपासूनच आभाळात काळसर ढगांची गर्दी झालीये... बऱ्याच दिवसांनी कम्प्युटरवर काम करत असताना खिडकी बाहेर दुपारच्या ३ वाजताही अगदी संथपणे वाहणाऱ्या थंड वाऱ्यावर झुलणारी नारळाची पाने खूपच सुखद वाटली. मग काम बंद करून बाहेर येउन बसलो.एरवी मला लहानपण, शाळा, पाऊस यांच्याविषयी बोलणं भावनाप्रधान आणि मूर्खपणाच वाटतं पण या प्रचंड शहरात, माणसांच्या गर्दीत, आठ-आठ दहा-दहा मजली इमारतींमध्ये, आपण येउन पडलो हे वाईट कि चांगले हे कळायला मार्ग नाही.
हि झाडं, जमीन, माती, पक्षी, प्राणी, घरातल्या साखरेच्या डब्ब्याला लागलेल्या मुंग्या यांनाही माझ्यासाराखच श्वास कोंडल्यासारखं वाटत नसेल का हा विचारही मनाला चाटून गेला. खरं तर आपणही या निसर्गाचाच एक भाग.. अगदी या नारळाच्या झाडासारखं पण याच्यात आणि आपल्यात एक फरक आहेच, हे माझ्यापेक्षा कितीतरी निरागस आहे, लहान मुलासारखं. राग, लोभ, मत्सर, वासना, तिरस्कार, एकटेपणा, धिक्कार, स्वाभिमान, दुख, आनंद, इच्छा, अपेक्षा, दया असल्या कितीतरी अर्थशून्य आणि अस्सल मानवी भावना आपला पिच्छा स्वप्नातही सोडत नाहीत.
जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मनाच्या कुठल्यातरी कप्प्यात जपून ठेवलेला, लहानपणीचा रम्य गाव नुकत्याच उगवलेल्या गवताच्या हिरवट पोपटी पात्यांसारखा डोळ्यासमोर येऊ लागतो. आई, आजी, भाऊ, शेणाने सारवलेल्या ओसरीत बसून पेरणीची चर्चा करणारे काका आणि आजोबा, घरातला स्वयंपाकाचा धूर, धगधगणारी चूल, घरात आणि पटांगणात वावरणाऱ्या त्यावेळच्या भावाबहिणींचे चेहरे, शेजारपाजारच्या आज्या, एकत्र जमून पापड्या, कुरडया, शेवया करणाऱ्या प्रेमळ बाया, उगाच माझा गालगुच्चा घेऊन मला चिडवणारी त्यावेळची ती अनोळखी बाई, गावातल्या मारुतीच्या पारावर जमणारी माणसे आणि त्याचं हसणं खिदळणं..असं ते नितांत सुंदर आणि शुद्ध पवित्र असं जग चित्रपटाप्रमाणे डोळ्यापुढे येत
खरं म्हणजे या निवडक आठवणी सोडल्या तर आपल्याजवळ काहीच नाही, मग कशाला हा लहानपणीचा भव्य डोलारा डोळ्यासमोर आणून आठवून आठवून बाटवून टाकायचा? तापेक्ष्या त्याला जपून ठेवावा.. आठवणींच्या सुन्न काळोखात... झाडांच्या मुळासारख आणि त्यापासून ओलावा घेत जगत राहावं या असल्या भावनेचा दुष्काळ असलेल्या दरिद्री शहरातले निरर्थक उपद्व्याप करत...
तासभरनंतर परत उन पडायला सुरवात झाली आणि राहिलेलं काम करण्यासाठी हातातला थंड झालेला कपभर चहा संपवून परत कामात बुडून गेलो..
(शीर्षक सुचत नव्हते.. म्हणून शेवटच्या क्षणी जे सुचले ते टाकले)
प्रतिक्रिया
24 Feb 2016 - 9:45 pm | विजय पुरोहित
सुंदर रे भावा........
पाऊस म्हणजे पाऊस असतो...
हृदयात वाजणारा ताऊस असतो...
एखाद्या अनोळख्या संध्याकाळी हृदयात कंपन छेडतो...
मनातल्या गावात कुठेतरी अल्लाद घेऊन जातो...
ते मेघ नव्हे कृष्ण दिसणारे...
माझ्या मनीची ते व्यथा सांगणारे...
तो वारा नव्हे वाहणारा...
माझा सखा तो सवे नाचणारा...
24 Feb 2016 - 9:46 pm | पैसा
नॉस्टॅल्जिक. जग कायम काळं, करडं, पांढरं असतं तसंच असतं. लहान असताना आपण, आपल्या भावना, अनुभवविश्व करप्ट झालेलं नसतं त्यामुळे तेव्हा ते शुद्ध पवित्र वगैरे वाटतं.
24 Feb 2016 - 10:11 pm | निशांत_खाडे
मान्य आहे पैसा! पण त्याच विश्वाची मुळे आपल्याला आयुष्यभर पुरेल एवढी ओळी पुरवत असतात !
24 Feb 2016 - 10:13 pm | निशांत_खाडे
मला ओलम्हणायचे होते :-)
24 Feb 2016 - 10:13 pm | निशांत_खाडे
मला ओल म्हणायचे होते :-)
24 Feb 2016 - 9:48 pm | विजय पुरोहित
मोकळ्या माळातुनी वाहतो वारा भरारा...
रानफुले त्या तालावरी नाचती भरारा...
24 Feb 2016 - 9:52 pm | विजय पुरोहित
गावात तेव्हां लाईट गेली होती. बाहेर मेघ दाटलेले होते. भन्नाट वारा भरारा वाहत होता. कडाड् कड् विजा चमकत होत्या. रात्रीच्या वावडी एकेकट्या मोटरसायकलस्वारांना धमकावत होत्या...
तेव्हांच ते काव्य स्फुरले...
सुंदर...
सुंदर...
24 Feb 2016 - 10:04 pm | विजय पुरोहित
गावाकडची एक संध्याकाळ... ढग आलेले... हृदयात तिच्या आठवणी दाटलेल्या...
बाहेर क्षीण विजा नाचणार्या...
आणि मेघ कड्कड्णारे...
बेभान वारे वाहणारे...
कुठे असेल ती?
बाहेर पालापाचोळा वार्याबरोबर उडणारा...
माझ्या मनीची व्यथा सांगणारा...
पिंपळाची पाने सळ् सळ् करणारी...
गोकर्णीचा वेल थडाथडा उडणारा....
गावच्या विहिरीवर चतुर किडे करतात गोलगोल भ्रमंती...
मनाच्या पारावर आठवणी करतात व्याकुळ भ्रमंती...
कुठे गेले ते दिवस?...
कुठे गेला माझा गाव?...
24 Feb 2016 - 10:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्व मनाचे खेळ असतात. एकंदर लेखनअनुभव काही झेपला नाही. राग येऊ द्या हवा तर. आपण बोलायला घाबरत नाही ब्वा..! :)
-दिलीप बिरुटे
24 Feb 2016 - 10:08 pm | निशांत_खाडे
धन्यवाद विजयजी!
24 Feb 2016 - 10:10 pm | विजय पुरोहित
मनाचं आणि निसर्गाचं नातं असतं...
राग येऊ द्या पाहिजे तर...
24 Feb 2016 - 10:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो, नसतं नातं ! मनाला होणारे हे सर्व भास् असतात. म्हणजे औरंगाबादला पाऊस पड़त असला आणि मुंबईत पाऊस नसतांना एखादा मुंबईकर कल्पनेने पावसात चिंब होतो ते केवळ मनातील कल्पनेने ना ?
-दिलीप बिरुटे
24 Feb 2016 - 10:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विजयजी राग येऊ द्या हवा तर. आपण बोलायला घाबरत नाही.
-दिलीप बिरुटे
24 Feb 2016 - 10:36 pm | विजय पुरोहित
डीबी अण्णा...
तुम्ही तो अनुभव कधीच घेऊ शकणार नाही...
24 Feb 2016 - 10:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असा अनुभव मी का घेऊ शकत नाही. मला रंग कळतो, मला गंध कळतो. मला शब्द आणि अर्थही कळतो, मला गोड गाता येता, मला सुंदर स्वर वेडं करतात. आणि ब-याच गोष्टी आहेत ज्या मला एक वेगळा आनंद देतात, मग आपण म्हणता तो अनुभव मला का येत नाही ?
-दिलीप बिरुटे
24 Feb 2016 - 10:52 pm | विजय पुरोहित
:(
अजून काय म्हणू?
त्यासाठी निरपेक्ष आवड लागते...
:)
24 Feb 2016 - 11:02 pm | निशांत_खाडे
म्हणजे एकंदरीत तुम्ही असे म्हणताय मानवी मन आणि निसर्ग यांचा काहीच संबध नाही. तसेच त्या दोन्हीमध्ये काव्यात्मक नाते दाखवणे मूर्खपणाचे आहे. बरोबर ना? प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे साहेब?
बायदवे, ड्रींक्सचं प्रमाण किती असावं ?, पुरुषांसाठी वेगळा कोनाडा असावा का ?,मासा भेटेना..मासा गावेना, मासा काही केल्या हाती लागेना..., संपादकीय (आपण संपादक आहात वाटते, जपून बोलायाला पाहिजे), लावणी माझं जग आहे... सुरेखा पुणेकर, पॉर्न साइट्सवरील बंदी ; किती योग्य, किती अयोग्य ?, समतेचा संदेश देणारं नाटक, कोण म्हणतं टक्का दिला ?
हे असले "अस्सल" मासिक चालवणारे वर्तमानपत्री लिखाण सोडून इतर काही लिहिण्याच्या (किंवा वाचण्याचा), प्रयत्न करत जा एवढी एकच माझी आपणाला विनंती आहे, प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे साहेब.
(माझा असा समज आहे कि तुम्ही "प्राध्यापक" म्हणून मराठी साहित्य किंवा कविता यांचे अध्यापन करत नसाल. आणि तो खरा ठरावा यासाठी मी नवस करतो आहे.)
राग येऊ द्या हवा तर, आपण बोलायला खरच घाबरत नाही! :-)
24 Feb 2016 - 10:56 pm | विजय पुरोहित
डी.बी. सर काय तुम्हीपण नवीन लोकांना कुत्सित प्रतिसाद देताय राव!!!
24 Feb 2016 - 11:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
http://www.misalpav.com/comment/808205#comment-808205 इथे त्यांनी आल्या आल्या हा मोठा प्रतिसाद टाकला म्हणून जराशी गम्मत. सॉरी सेठ. :)
-दिलीप बिरुटे
24 Feb 2016 - 11:03 pm | निशांत_खाडे
म्हणजे एकंदरीत तुम्ही असे म्हणताय मानवी मन आणि निसर्ग यांचा काहीच संबध नाही. तसेच त्या दोन्हीमध्ये काव्यात्मक नाते दाखवणे मूर्खपणाचे आहे. बरोबर ना? प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे साहेब?
बायदवे, ड्रींक्सचं प्रमाण किती असावं ?, पुरुषांसाठी वेगळा कोनाडा असावा का ?,मासा भेटेना..मासा गावेना, मासा काही केल्या हाती लागेना..., संपादकीय (आपण संपादक आहात वाटते, जपून बोलायाला पाहिजे), लावणी माझं जग आहे... सुरेखा पुणेकर, पॉर्न साइट्सवरील बंदी ; किती योग्य, किती अयोग्य ?, समतेचा संदेश देणारं नाटक, कोण म्हणतं टक्का दिला ?
हे असले "अस्सल" मासिक चालवणारे वर्तमानपत्री लिखाण सोडून इतर काही लिहिण्याच्या (किंवा वाचण्याचा), प्रयत्न करत जा एवढी एकच माझी आपणाला विनंती आहे, प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे साहेब.
(माझा असा समज आहे कि तुम्ही "प्राध्यापक" म्हणून मराठी साहित्य किंवा कविता यांचे अध्यापन करत नसाल. आणि तो खरा ठरावा यासाठी मी नवस करतो आहे.)
राग येऊ द्या हवा तर, आपण बोलायला खरच घाबरत नाही! :-)
24 Feb 2016 - 11:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नवं काय वाचू ते सांगा ? बाकी आपल्या दुर्दैवाने मी साहित्याचा प्राध्यापक आहे.
-दिलीप बिरुटे
24 Feb 2016 - 11:24 pm | निशांत_खाडे
आता मात्र आपला प्रतिसाद आवडला. म्हणजे, वरती मी जे काही बोललो आणि विचारले त्यातला 'काय वाचावे' हा सर्वात सोयीस्कर प्रश्न आपण उचललात! वावावा!
आणि हो 'कमाल राशीद खान' नावाचा एक अतिशय नामांकित अभिनेता आहे. तुम्ही त्यालाच ट्विटर वर फोलो करा आणि त्याचेच लेखन वाचा! तुमची भावनांविशयीची उदासीनता पाहता तेच योग्य ठरेल..
बाकी राग आला तर येऊ द्या आपण बोलायला अजूनही घाबरत नाही!
24 Feb 2016 - 11:29 pm | निशांत_खाडे
प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे असे म्हणा हो.. नुसते दिलीप बिरुटे म्हणजे कुंकू नसलेल्या सुवासिनी सारखे वाटते..
24 Feb 2016 - 11:07 pm | सतिश गावडे
ढग आले की पाऊस येतो. पाऊस आला की आठवणी येतात. आठवणी आल्या की ओल्या भावना निर्माण होतात.
24 Feb 2016 - 11:14 pm | निशांत_खाडे
पटले पटले!
25 Feb 2016 - 5:42 am | तर्राट जोकर
कसं काय होत असावं हे सगळं? नै म्हणजे गंमतच हाय ब्वा!
ओल्या भावना
आमच्या मनात सदोदित असतात,
घसा ओला असतो ना!
पाऊस आताशा येत नाही
गेले चारपाच वर्ष नीटसा.
ढग सरकारी अधिकार्यांसारखे
वरवर पाहणी करुन जातात.
मी गळ्यात फास अडकवत असतो,
तेव्हाही माझ्या भावना ओल्या असतात,
पण पाऊस नसतो,
आठवणी आल्यातर नको होतात.
लटकणे पोस्टपोन होतं.
तसे करुन चालत नाही.
कर्ज पोस्टपोन होत नाही.
कुठे कवी कविता करतो,
ढगाळलेल्या पावसाच्या,
त्याच्या ओल्या आठवनी
रोम्यांटीकली प्रॅक्टीकल असतात.
आमचा जीव जात आहे. गळफास बसला नीट.
त्यांच्यासाठी प्रॅक्टीकली रोम्यांटीक.
आहे पाऊस, आठवणी, ढग, ओल्या भावना!
25 Feb 2016 - 9:33 am | श्री गावसेना प्रमुख
काहो गावडे साहेब,एक सांगा पाऊस आल्यावर प्रेयसीचि आठवण न येता एखाद्या भीतिदायक स्वप्नांची आठवण आली तरी ओल्या भावना निर्माण होतील का हो?
25 Feb 2016 - 9:41 am | जेपी
प्रेयसीची आठवण येऊ द्या नायतर ,एखाद्या भितीदायक स्वप्नाची,
'ओल्या भावना' निर्माण होणारच!.
25 Feb 2016 - 9:51 am | श्री गावसेना प्रमुख
तेव्हाच तर बिरुटे साहेब राक्षसाच रूप घेऊन गाववाल्यांच्या स्वप्नात येताहेत
25 Feb 2016 - 9:51 am | सतिश गावडे
जेपीशी सहमत आहे. एखादी प्रेयसी करून स्वतःच अनुभव घ्या. ;)
25 Feb 2016 - 9:53 am | श्री गावसेना प्रमुख
म्हणजे प्रेयसी ही भीतिदायक स्वप्नच असते तर
25 Feb 2016 - 9:57 am | सतिश गावडे
ते ढग कुठल्या दिशेने येतात आणि पाऊस रीमझीम पडतो की मुसळधार यावर अवलंबून असते.
25 Feb 2016 - 9:58 am | प्रचेतस
आणि पाऊस पडलाच नै तर?
25 Feb 2016 - 10:03 am | सतिश गावडे
आठवणी येणार नाहीत; ओल्या भावना निर्माण होणार नाहीत.
25 Feb 2016 - 10:04 am | प्रचेतस
कोरडं कोरडंच वाटून राहील का मंग?
25 Feb 2016 - 10:12 am | सतिश गावडे
मग 'वर्तमानपत्री' कविता लिहायला घ्यायची...
मन कोरडं कोरडं अन
पाऊसही पडत नाही
जरी जळालं हे रान
हा मोहर झडत नाही
25 Feb 2016 - 10:15 am | प्रचेतस
=))
25 Feb 2016 - 10:37 am | नाखु
त्याच विडंबन:
भाग एक :
माय ओरडे ओरडे अन
हौसही फिटत नाही
जरी ढळते हे वय
प्रतीमा जुळत च नाही!
संदर्भ : प्रतीमा
भाग २:
मन कोडगं कोडगं अन
कंडही क्षमत नाही
जरी मिळाला हा मार
हा* बाहेर पडत नाही
हा*:वैचारीक तुंबलेला बोळा
तूर्तास इतकेच (बाकी बॅट्या आणि जेप्या-टक्यासाठी राखून)
नाखु भुस्काटी
25 Feb 2016 - 10:39 am | प्रचेतस
नाखुण अंकलना अता चाहत्यांच्या जगात स्थाण मिळेल असे दिसतेय. चांगलाच गंडा बांधलाय.
25 Feb 2016 - 10:39 am | प्रचेतस
नाखुण अंकलना अता चाहत्यांच्या जगात स्थाण मिळेल असे दिसतेय. चांगलाच गंडा बांधलाय.
25 Feb 2016 - 10:41 am | नाखु
काही तरी भलतच!!!
आधी तुमची रांग पुढे सरकू द्या मग आम्ही गावकुसाबाहेरचे आत येऊ.
25 Feb 2016 - 10:43 am | प्रचेतस
तुमच्या चारोळ्यांमुळे तुम्ही झटकन रांगेत पुढे गेलेले आहात.
25 Feb 2016 - 10:47 am | नाखु
चारोळ्या तुमच्या फुलांच्या आणि फुल्यांच्याही त्यामुळे तुमचे स्थान अढळ आहे !!! निस्श्चींत असा .
फुल्यांच्याही< साठी सोत्त बुवांशी संपर्क साधावा ही विनंती
25 Feb 2016 - 10:25 am | जेपी
सतिश गावडे - Thu, 25/02/2016 - 09:51
जेपीशी सहमत आहे. एखादी प्रेयसी करून स्वतःच अनुभव घ्या. ;
डोळे ओलावले..;)
25 Feb 2016 - 10:50 am | श्री गावसेना प्रमुख
जेपी तात्या तुम्हाला पानवल्याचा काही अनुभव असल्यास,एखादी टिनपाट(खाडे साहेबांच्या शब्दात) कविता लिहावी अशी विनंती
25 Feb 2016 - 11:20 am | वेल्लाभट
व्याकरणावर काम करायला हवे आहे आपल्याला.
25 Feb 2016 - 12:29 pm | निशांत_खाडे
शिकतोय हळू हळू..