आठवण
परडीत काढुन ठेवला मोगरा तरी
हातास सुगंध तसाच राही कितीतरी वेळ
तसचं तुला स्मरुन लिहलं मी काही तरी
शब्दास सुगंध तुझाच राही कितीतरी वेळ
-प्राजक्ता
परडीत काढुन ठेवला मोगरा तरी
हातास सुगंध तसाच राही कितीतरी वेळ
तसचं तुला स्मरुन लिहलं मी काही तरी
शब्दास सुगंध तुझाच राही कितीतरी वेळ
-प्राजक्ता
तुझ्या वाटेवर उभा मी एकाकी
डोळे मुके होऊन झाली नजर बोलकी
चोरपावलाने हळूच तू येऊन जा
पाखरांचे उदास सूर घेऊन जा
जाग्या झाल्या भोवती रानसावल्या
आकाशवाटा ढगांना बिलगून बसल्या
जीवघेणी ओढ तुझी प्राणात दाटली
क्षितीजावर उभी राहीली मावळतीची सावली
पापण्यांच्या पंखात अश्रूंचे घन भरले
प्रितीची आग ह्रदयात ठेऊन गेले
आणि अश्या वेळी,
चंद्राने लपायला हवं ढगांआड...
अन लपेटून घ्यायला हवं आपण,
भोवतालचं गुलाबी धुकं...
एकमेकांच्या श्वासांमधून
उधळायला हवीत,
प्रितीची गंधफुले...
घट्ट मिटायला हवीत,
डोळ्यांची नक्षत्रं...
टेकवायला हवेत
गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे,
ओठ एकमेकांवर...
आणि मग पहावं,
श्वास रोखले जातात की;
हृदय धडधडायचं थांबतं..?
-कौस्तुभ
पैजणी चांदणरात
तुझ्या स्पर्शात
हे प्राण घेऊनी आली...
स्पर्श संदिग्ध
जरासे मंद
गुलाब फिरले गाली...
ढवळते वारा
छेडील्या तारा
आकाश असे सचित्र...
उधळती रंग
पसरले गंध
हे भास मला विचित्र...
उरी मोगरा
प्रसविते झरा
तुझी मधुर काया...
क्षणाची भूल
उठविते झूल
निळी सावळी माया...
- कौस्तुभ
(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)
.
.
.
.
महापुरुष आणि तीर्थस्थाने
बाप आणि आई
डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत
तुला बापू म्हणू की बाप्या ?
स्वतःच्याच
स्खलनशीलतेने
असुरक्षीत
ईतरांनाही
असुरक्षीतता वाटणारा
तुला बापू म्हणू की बाप्या ?
जीवातला शिव
भुकेला प्रणयाच्या लीलेला
निसर्ग सुंदर प्रकृती
मायेच्या प्रितीला
"असुं"या च्या जिद्दीने
व्यवहार सिद्ध होतो
असूया घर करते
सुंदर सत्यास कडवट मानत
खुले विनाअट प्रेम पारखे होते
कल्पना आणि विचार करा..
एकपत्नी व्रताचे बंधन तोडून
राधेकडे पाहिल्या बद्दल ..
सीता रामाची
अग्नी परीक्षा घेते
रेणुका जमदग्नीचा
प्राण मागते
अहल्या गौतमास
पत्थर होण्याचा
शाप देते
नका ग चांदण्यांनो
नका येऊ खिडकीत
तिच्या मनाचा ठाव
सांगा येऊन पडवीत
सांगा तिच्या गाण्यात
का, आहे नाव माझे?
माझ्याविन विरहाचे
का, सोसते ती ओझे?
ठावे तिलाही आहे
का, रात्री कवितांचे
येती जथ्थे, जाती
स्वप्न गाऊन उद्याचे?
आतूर प्रीत आत
रोज झुरते उरात
सांगा तिला हे सारे
चमचमत्या सुरात
तिचे चालणे बोलणे
भास होऊन छळते
लय श्वासांची तेव्हा
आठवांशी अडखळते
सारे आठव आठव
युगांच्या जणू फेऱ्या
रेखू पाहती नशीबाला
तळहातावर कोऱ्या
ज्या कृष्णांना राधा नसतात
आणि ज्या राधांना कृष्ण नसतात
त्यांनी काय करावे ?
ज्या कृष्णांना राधा असतात
आणि ज्या राधांना कृष्ण असतात
त्यांचे मनोमन कौतुक करावे
त्यांच्या प्रेमाच्या पावित्र्याचा
आदर करावा किमान राधेच्या
चारित्र्याचे उगाचच जज बनू नये.
एका उदास संध्याकाळी
कोणी गात होती विराणी ||
शब्दांत अशी आस नव्हती
चाल नव्हती अशी कोणती
धारही नव्हती त्या शब्दांना
तरी काळीज जाय चिरूनी ||
संधीप्रकाश निळा जांभळा
खालून गेला वर आभाळा
कुंद हवा अन वारा पडला
हवेत सूर राही भरूनी ||
धिरगंभीर सूर कवळूनी
गीत हृदयीचे आळवूनी
उलगडे आर्त सरगम
भरूनी राहिली कानी ||
- पाषाणभेद
०५/०२/२०२०