विखुरलेलं चांदणं
हल्ली कमीच झालंय तस तुझी आठवण येणं,
ओसरत आहे हळू हळू हळव्या समुद्राच उधाण
हल्ली कमीच झालंय तस रात्र रात्र तळमळणं,
मला बघून अंधारानेही कमी केलंय उसासे सोडणं.
हल्ली कमीच झालंय आता मला मोग-याने खुणावणं,
त्यालाही झालंय सवयीचं झुरत झुरत गळून जाणं.
हल्ली कमीच झालंय स्वप्नांनी डोळ्यात गर्दी करणं,
मलाच कसं नाही जमलं असं वेळीच शहाणं होणं.
हल्ली कमीच केलंय मी माझ्याच मनाच ऐकणं,
तुझ्याकडे तरी आलंय का रे माझं टिपूर चांदणं?
(नाव सुचलंच नाही कवितेला.)