प्रेम कविता

एक होती चिऊ

वैभव पवार's picture
वैभव पवार in जे न देखे रवी...
21 Oct 2016 - 12:01 am

एक होती चिऊ
तिला दोन भाऊ
ती बोलु लागली की वाटे मऊ मऊ,

तिची सकाळची सातची एन्ट्री झकास
दहाची एक्झीट करुन जाई भकास
एकला तिच्या परतीची लागे आस
तो पर्यंत होई डोळ्यांना नुस्तेच भास

एक दिवस ती बोलली स्वतःहुन
तिचा आवाज ऐकुन बदलली जीवनाची धुन
गालावर तिच्या खळी, चेहरा तिचा मुन
विचारले तिला होशील का माझ्या आईची सुन?

ती म्हणाली यार तु बोलतोस खुप छान
तुझ्याशी बोलुन कमी होतो मनावरचा ताण
गोड गोड बोलुन बाईसाहेब झाल्या मुक्त
माझ्या प्रश्नावर नकारार्थी मान हलवली फक्त

प्रेम कविताफ्री स्टाइलकविता

तू नाहीस ...

कवि मानव's picture
कवि मानव in जे न देखे रवी...
17 Oct 2016 - 4:31 pm

तू येणार नाहीस हे माहित असताना,
मी आपल्या नेहमीच्या ठिकाणी गेलो होतो,
न पुन्हा एकदा मैफिल जमवावी म्हणून,
जुन्या आठवणींना नव्याने हाक देत होतो !!१!

संध्याकाळ डोक्यावरून हळूहळू सरत होती,
धरणीने आकाशाला दिलेलं आलिंगन पाहून भारावलो होतो,
न आपण एक असण्याच्या एखादा तरी पुरावा म्हणून,
तिथल्या दगडांवर आपले दोघांचे नाव कोरत होतो !!२!!

सरोवराचा गारवा अंगाला भिडत होता,
तु जवळ होतीस त्या आठवणींनी उब घेत होतो,
जड पावलांनी घरी परतल्या हे कळलं की,
मी उगाच तुझ्या आठवणींचे ओझे वागवत होतो !!३!!

प्रेम कविताकविता

त्या एका पावसात...

प्रसाद_कुलकर्णी's picture
प्रसाद_कुलकर्णी in जे न देखे रवी...
4 Oct 2016 - 4:50 pm

ती कित्येक वर्षांनी भेटलीय मला या अशा दिवसात,
अन भावनांचा बांध फुटला माझा...त्या एका पावसात...

लहानपणी हातात हात घेऊन खेळलो आम्ही त्या मागच्या अंगणात,
नशिबान वेगळे झालो...अशाच एका पावसात...

तिच्यासाठी धडपडलो मी कित्येक अशा वर्षावात,
भेटेल मला परत ती, हीच एक भाबडी आशा...त्या हर-एक पावसात...

आज समोर उभी आहे ती, अन शब्द फुटत नाहीत ओठात,
न बोलताही मन भिडली...त्या एका पावसात...

भिजलेले केस तिचे ज्वालाग्नी पेटवताहेत माझ्या मनात,
थर-थरते अंग तिचे कंप करतेय मला...त्या एका पावसात...

प्रेम कविताप्रेमकाव्य

तू...

कवि मानव's picture
कवि मानव in जे न देखे रवी...
4 Oct 2016 - 1:32 pm

आठवलीस तू धुसर धुसर,
वेळ असे ती कातर कातर,
स्मरता तुझ्या त्या आठवणींना,
दरवळलो मी अत्तर अत्तर !!१!!

तव नयनांचे घाव उराशी,
अदा तुझी ती कातील कातील,
स्तुती करावी काय सौंदर्याची,
शब्द अपुरे पडतील पडतील !!२!!

रूप तुझे भरपूर देखणे,
त्यात लाजणे सुंदर सुंदर,
तुझे हृदय जिंकण्यासाठी,
हरून गेले बहु धुरंधर !!३!!

पाहून तुझे लावण्य साजरे,
माझी अवस्था मंतर मंतर,
पाहताना तुझ मरण ही आले,
त्यास विनंती नंतर नंतर !!४!!

प्रेम कविताकविता

राया...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
24 Sep 2016 - 8:21 am

राया...

मखमली मंचकी पसरली, मखमली काया,
नका सोडून जाऊ, नका ना जाऊ राया ॥ध्रु॥

करून बसले मंचकी थाट
किती दिवस पाहिली वाट
उगवेल आता चैत्री पहाट
सोनचाफ्याचा सुटेल घमघमाट
अत्तराच्या लावल्या या समया
नका सोडून जाऊ.... ॥१॥

ल्याले शालू भरजरी
देह झाला आज शेवरी
ठेवा बाजूला तुम्ही शेला
घ्या अलगद कवेत मजला
जाईल ज्वानी माझी वाया
नका सोडून जाऊ.... ॥२॥

राजेंद्र देवी

कविता माझीप्रेम कविताभावकवितामुक्त कविताशृंगारकविताप्रेमकाव्यमुक्तक

मी एकटी ....

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
8 Sep 2016 - 3:42 pm

मी एकटी ....

एल तीरावर मी एकटी
पैलतीर त्याला नाही
समोर पसरला अथांग दर्या
साजणाचा पत्ता नाही

परतुनी आले सारे
अजून तो आला नाही
रात्रीचा चंद्र देतसे
तो येईल याची ग्वाही

रंग हळदीचा अन मेंदीचा
अजून उतरला नाही
स्वप्नांचे जहाज बुडाले
साजणाचे तारू वाचले का नाही ?

बघत बसते खुणा वाळूतल्या
निरखीत असते लाटांनाही
नकोत रत्ने मज सागरा
का साजण माझा परत देत नाही ?

राजेंद्र देवी

कविता माझीप्रेम कविताभावकवितामुक्त कविताकरुणकविताप्रेमकाव्य

( मी बी पिरेम करीन म्हनते ) : प्रेमळ तडका

नीलमोहर's picture
नीलमोहर in जे न देखे रवी...
24 Jul 2016 - 10:00 pm

सावळ्याची त्या जोगीन बनीन म्हनते,
मी बी पिरेम करीन म्हनते...

राया तो माजा
भ्येटंल काय, न भ्येटंल काय,
वाट पहायाची आपली
पुरी तयारी हाय,
दैवाचीबी परीक्शा
घेइन म्हनते,
मी बी पिरेम करीन म्हनते...

जीवाचा सखा
गावंल काय, न गावंल काय,
समदं ह्या कपाळी
लिव्हल्यालं हाय,
नशिबासंगं आज
पैज लावीन म्हनते,
मी बी पिरेम करीन म्हनते...

प्रेम कविताहे ठिकाण

रिमझिम रिमझिम

सुधीरन's picture
सुधीरन in जे न देखे रवी...
24 Jul 2016 - 10:11 am

रिमझिम रिमझिम पाऊसधारा
न्हाऊनी निघाला आसमंत सारा
बेधुंद अशा या क्षणी
साथ तुझी हवी साजणी

ओले ओले वृक्ष अन वेली
पानांवरून टपटपते पाणी
त्यात आठवली तुझी कहाणी
ओलावली मग डोळ्यांची पापणी

खळखळत वाहणा-या या नद्या
मिळतात सागराला सा-या
का न मग होई आपले मिलन
प्रश्न पडे हा फार गहण

भरारत वाहणारे हे वारे
आले अंगावर शहारे
दुःखाने मी कळवळतो
हृदयाच्या वेदनेने विव्हळतो

चिंब चिंब झाले माझे तन
दुःखाने भिजले माझे मन
आसवांचा आला आहे पूर
सापडेना आयुष्याचा सूर

प्रेम कविताकविता

आठवतेय का?

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
6 Jul 2016 - 1:37 pm

आठवतेय का?
पावसातली पहिली भेट

धुक्याची दुलई पांघरूण
लपुन बसलेली वाट
आणि तोल जाता जाता
तू हाती घेतलेला हात

ओल्या गवताळ मातीचा
थंड हुळहुळता स्पर्श
आणि भिजल्या पापण्यात
तुझ्या श्वासांची ऊब

मला उगीच असलेली
घरी जायची घाई
आणि तुझ्या आर्जवात
शहारलेली जाईजुई

डोळ्यांनीच दिलेघेतलेले
कितीतरी मुके निरोप
आणि परतीच्या वाटेवर
हरवलेली दोन मनं

आठवतेय ना?
पावसातली पहिली भेट

प्रेम कवितामुक्त कविताकविताप्रेमकाव्य

त्याची आठवण,

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
2 Jul 2016 - 10:50 am

त्याची केव्हाही आठवण आली तरी,
सर्वांगावर सरकन् काटा येतो,
डोक्यावरचा केस न केस उभा रहातो,
आणि थंडीच्या दिवसातही दरदरुन घाम फुटतो,

अंधारलेल्या डोळ्या समोर, नाचतात आकृत्या भेसुर,
जिभेला पडते कोरड आणि काना मधून निघतो धुर,
कित्येकांना याने लाचार बनवले, भिकारी बनवले,
याच्या दहशती मूळे कित्येक पापभिरु दूराचारी झाले,

तो आहेच असा भितीदायक,
आता पर्यंत भेटलेला सर्वात मोठा खलनायक,
मी मी म्हणणा-यांची त्याच्या पुढे टरकायची,
नुसत्या आठवणीने कित्येकांची बोलती बंद व्हायची,

kelkarprayogअदभूतअविश्वसनीयआगोबाआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचिकनजिलबीनागद्वारप्रेम कविताभूछत्रीमार्गदर्शनरोमांचकारी.शृंगारकरुणधर्मइतिहासप्रेमकाव्यउखाणेसुभाषितेऔषधोपचारकृष्णमुर्ती