प्रेमात हे असेच घडते....
हे मन का अधीर होते
स्पर्शाने मोहून जाते..
कधी पावलात अडखळते
कधी चांदण्यात उलघडते
प्रेमात हे असेच घडते
प्रेमात हे असेच घडते .....।।
हे स्वप्न असे की भास असे
तुझी आस लागे मनाला
स्वच्छंद नवा सहवास तुझा
मग वेड लावी जीवाला
असे मन हे माझे भुलते
अन् पाखरू होऊन उडते
स्वप्नात तुझ्या हे वेडे
दूर आभाळाला भिडते....
प्रेमात हे असेच घडते
प्रेमात हे असेच घडते .....।।