तू नाहीस ...

कवि मानव's picture
कवि मानव in जे न देखे रवी...
17 Oct 2016 - 4:31 pm

तू येणार नाहीस हे माहित असताना,
मी आपल्या नेहमीच्या ठिकाणी गेलो होतो,
न पुन्हा एकदा मैफिल जमवावी म्हणून,
जुन्या आठवणींना नव्याने हाक देत होतो !!१!

संध्याकाळ डोक्यावरून हळूहळू सरत होती,
धरणीने आकाशाला दिलेलं आलिंगन पाहून भारावलो होतो,
न आपण एक असण्याच्या एखादा तरी पुरावा म्हणून,
तिथल्या दगडांवर आपले दोघांचे नाव कोरत होतो !!२!!

सरोवराचा गारवा अंगाला भिडत होता,
तु जवळ होतीस त्या आठवणींनी उब घेत होतो,
जड पावलांनी घरी परतल्या हे कळलं की,
मी उगाच तुझ्या आठवणींचे ओझे वागवत होतो !!३!!

त्या रात्री झोप वैरी झाली होती,
उघड्या डोळ्यांनी तुझ्या आठवणींच्या स्वप्नात बुडालो होतो,
रात्रभर चमचमणाऱ्या तारे पाहून असमाधानी राहिलो,
कारण मी अमावसेच्या रात्री चंद्र शोधत होतो !!४!!

आठवणींना आठवत प्रहर झाली होती,
बर्याच दिवसांनी रीयाजा करता तानपुरा घेतला,
तर आयुष्याच्या तुटलेल्या तारांवरती,
आपल्या विरहाची भैरवी गात होतो !!५!!

तू येणार नाहीस हे माहित असताना...........

प्रेम कविताकविता

प्रतिक्रिया

राजेंद्र देवी's picture

17 Oct 2016 - 4:52 pm | राजेंद्र देवी

कविता आवडली... छान आहे....

कवि मानव's picture

17 Oct 2016 - 5:03 pm | कवि मानव

_/\_ हलकी फुलकी :))