Skip to main content

तू...

लेखक कवि मानव यांनी मंगळवार, 04/10/2016 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
आठवलीस तू धुसर धुसर, वेळ असे ती कातर कातर, स्मरता तुझ्या त्या आठवणींना, दरवळलो मी अत्तर अत्तर !!१!! तव नयनांचे घाव उराशी, अदा तुझी ती कातील कातील, स्तुती करावी काय सौंदर्याची, शब्द अपुरे पडतील पडतील !!२!! रूप तुझे भरपूर देखणे, त्यात लाजणे सुंदर सुंदर, तुझे हृदय जिंकण्यासाठी, हरून गेले बहु धुरंधर !!३!! पाहून तुझे लावण्य साजरे, माझी अवस्था मंतर मंतर, पाहताना तुझ मरण ही आले, त्यास विनंती नंतर नंतर !!४!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4136
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

पाहताना तुझ मरण ही आले, त्यास विनंती नंतर नंतर !!४!!

पाहताना तुझ मरण ही आले, त्यास विनंती नंतर नंतर

धन्यवाद !! खरा तर... लिहिताना वाटलं की ही कल्पना फार अवास्तव आहे पण एकूणच त्याचा अर्थ छान निघून आला