मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तू...

कवि मानव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आठवलीस तू धुसर धुसर, वेळ असे ती कातर कातर, स्मरता तुझ्या त्या आठवणींना, दरवळलो मी अत्तर अत्तर !!१!! तव नयनांचे घाव उराशी, अदा तुझी ती कातील कातील, स्तुती करावी काय सौंदर्याची, शब्द अपुरे पडतील पडतील !!२!! रूप तुझे भरपूर देखणे, त्यात लाजणे सुंदर सुंदर, तुझे हृदय जिंकण्यासाठी, हरून गेले बहु धुरंधर !!३!! पाहून तुझे लावण्य साजरे, माझी अवस्था मंतर मंतर, पाहताना तुझ मरण ही आले, त्यास विनंती नंतर नंतर !!४!!

वाचने 4122 वाचनखूण प्रतिक्रिया 8

कवि मानव Tue, 10/04/2016 - 17:05
धन्यवाद !! खरा तर... लिहिताना वाटलं की ही कल्पना फार अवास्तव आहे पण एकूणच त्याचा अर्थ छान निघून आला