त्या एका पावसात...

प्रसाद_कुलकर्णी's picture
प्रसाद_कुलकर्णी in जे न देखे रवी...
4 Oct 2016 - 4:50 pm

ती कित्येक वर्षांनी भेटलीय मला या अशा दिवसात,
अन भावनांचा बांध फुटला माझा...त्या एका पावसात...

लहानपणी हातात हात घेऊन खेळलो आम्ही त्या मागच्या अंगणात,
नशिबान वेगळे झालो...अशाच एका पावसात...

तिच्यासाठी धडपडलो मी कित्येक अशा वर्षावात,
भेटेल मला परत ती, हीच एक भाबडी आशा...त्या हर-एक पावसात...

आज समोर उभी आहे ती, अन शब्द फुटत नाहीत ओठात,
न बोलताही मन भिडली...त्या एका पावसात...

भिजलेले केस तिचे ज्वालाग्नी पेटवताहेत माझ्या मनात,
थर-थरते अंग तिचे कंप करतेय मला...त्या एका पावसात...

ती जवळ आहे माझ्या इतकी, कि विरघळलीय ती माझ्यात,
अन माझे अश्रू विरघळताना दिसताहेत मला...त्या एका पावसात....

प्रेम कविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

कवि मानव's picture

4 Oct 2016 - 5:07 pm | कवि मानव

छान कविता...छान बांधणी !!

प्रसाद_कुलकर्णी's picture

4 Oct 2016 - 5:40 pm | प्रसाद_कुलकर्णी

धन्यवाद !!!

राजेंद्रच्या या कवितेवरनं सुचली का? कवितेच्या विषयात बरचसं साधर्म्य दिसतंय.

टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

प्रसाद_कुलकर्णी's picture

5 Oct 2016 - 10:57 am | प्रसाद_कुलकर्णी

साधारण 2 वर्षांपूर्वी सुचली आहे हि कविता... पण डायरीत तशीच अडकून पडली होती... आज इथे पोस्ट केली :) राजेंद्र यांची पण कविता खूप छान आहे.

जव्हेरगंज's picture

5 Oct 2016 - 10:29 pm | जव्हेरगंज

वाह!!!