तुझ्या वाटेवर उभा मी एकाकी
डोळे मुके होऊन झाली नजर बोलकी
चोरपावलाने हळूच तू येऊन जा
पाखरांचे उदास सूर घेऊन जा
जाग्या झाल्या भोवती रानसावल्या
आकाशवाटा ढगांना बिलगून बसल्या
जीवघेणी ओढ तुझी प्राणात दाटली
क्षितीजावर उभी राहीली मावळतीची सावली
पापण्यांच्या पंखात अश्रूंचे घन भरले
प्रितीची आग ह्रदयात ठेऊन गेले
प्रतिक्रिया
23 Jul 2020 - 5:57 pm | गणेशा
पापण्यांच्या पंखात अश्रूंचे घन
वा अप्रतिम..
लिहीत रहा.. वाचत आहे..
24 Jul 2020 - 11:43 am | चांदणशेला
धन्यवाद
24 Jul 2020 - 2:35 pm | टवाळ कार्टा
"तुझी खाट" असे विडंबन लिहिण्यास घ्यावे अशी पोपशास्त्री किंवा पैजारबुवांना विनंती