अवती भवती तरंगे.
अवती भवती तरंगे तुझ्याच श्वासाचा दरवळ
अंतरी फुलते आहे तुझ्याच प्रीतीची हिरवळ.
रस्त्यावर पाऊल खुणा कि होई आभास तुझा
वाऱ्यावर गंध फुलांचा कि दरवळे श्वास तुझा
जिकडे तिकडे दाटली तुझ्याच पदराची सळसळ.
संध्याकाळ ही उधळीत रंग तुझ्या आठवांचे
रात्र दाटता का आठवे मज पळ चांदण्यांचे?
उठता बसता सारखा तुझाच भास मला हरपल.
छेडूनी दुखास माझ्या आता हे सूर लाविले तू
ते माझेच शब्द होते येथे जे गीत गायिले तू
कशास करशी मना तिचीच तू आता कळकळ.