कळले मला न काही हा रुसवा कशास सजणी
डोळ्यात दाटले का हे आता तुझ्या ग पाणी.
कसला म्हणू अबोला तू गुमसुम कशास असशी
सांगून टाक आता जे सलते मनात राणी.
येता धुके असे हे बघ दाटून प्राक्तनाचे
जवळी असून सारे ते अपुले असे न कोणी.
ही रात चांदण्याची बघ भिजली दवात सारी
या चांदण्या क्षणात कुणी गाते उदास गाणी.