कविता माझी

पाकोळी

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
10 Sep 2018 - 2:36 pm

निळ्या-जांभळ्या
आभाळाखाली,
हिरव्यागार कुरणाच्या
लुसलुशीत गवतावर
निवांतपणे
पहुडलेला असताना,
पलीकडच्या,
ताटव्यातल्या फुलांवरून
एक नाजूकशी पाकोळी
उडतउडत
माझ्याकडे आली
आणि मला म्हणाली…
"बाबा, तू आज आपिशला ज्यावू नको,
आपण गार्डनमध्ये खेळायला ज्यावू"

- संदीप चांदणे (१०/०९/२०१८)

कविता माझीशांतरसबालकथाकवितामौजमजा

पूर

कहर's picture
कहर in जे न देखे रवी...
7 Sep 2018 - 8:58 am

इथे गूढ अंधार दाटून येता, तिथे तारकांचे दिवे लागले
मिटताच डोळे हे होतील जागे, पुन्हा आठवांचे थवे मागले

जुनी तीच ओढ, जुनी तीच उर्मी, जुनी तीच ती आर्त व्याकुळता
भरुनी अकस्मात अस्मान येते नि जाते कडाडून विदयुल्लता

दिसेना कुणाला तिच्या अंतरीचे, फुत्कारते जीवघेणे प्रकार
"तिळा तिळा" मी किती घोकतो पण उघडीत नाही का हे कवाड

अस्वस्थ आसू ठिबकतो अबोल, डोळ्यांमध्ये उतरते रक्त का ?
पितांबरात घुसमटे एक काया, ये कंठात बावनकशी हुंदका

मनाच्या तळाशी उदसताच पाणी, त्या वेदनांचा का पूर होतो ?
चातकाप्रमाणे आतुर कोणी, उध्वस्त तेव्हा गझल पीत जातो

कविता माझीभावकवितामाझी कवितामुक्त कविताकविता

निघताना....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
23 Aug 2018 - 5:02 pm

मी हळूहळू पण निश्चितपणे
पार दिसेनाशी होईन
तेव्हा तू चौकट ओलांड,
आणि निघताना.....

आपल्या हसल्याबोलल्या
आवाजांची फूले घेऊन ये
आपल्यातल्या गहिवरांचे
कढ, न हिंदकळता आण

मी न ओलांडलेली अंतरे
तू सहजच पार करुन ये
माझे न उच्चारलेले नाव
चारचौघांत सरळच घे

सगळे उठून जातील तेव्हा
आपल्यातल्या शब्दांची
आरास मांड
त्यानंतर आपोआप दिवा लागेल
तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल

कविता माझीप्रेम कविताभावकवितामाझी कवितासांत्वनाहट्टकरुणमांडणीवावरवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजप्रवास

गर्भार सातव्या महिन्याची

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
1 Aug 2018 - 10:28 am

जिच्यासाठी झटून दिनरात
दिली परीक्षा प्रीतीची
आज भेटली ती, होऊन
गर्भार सातव्या महिन्याची!

मावळला ध्यास, गळाली आस
गळ्यापाशी कोंडला श्वास
म्हणतील मामा, तिची लेकुरे
भीती मला त्या नात्याची!

क्षण पदोपदी झुरण्याचे
नकळत मागे फिरण्याचे
आता आठवती ते खर्च
आणि उसनवार मित्रांची!

आता काय, शोधू दुसरी
तीही नसेल तर तिसरी
करणार काय, मुळातच
आहे, बागेत गर्दी फुलांची!

- संदीप चांदणे

eggsmiss you!अनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीकविता माझीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगाणेजिलबीनागपुरी तडकाप्रेम कविताफ्री स्टाइलभूछत्रीमाझी कवितारतीबाच्या कविताभयानकहास्यकरुणशांतरसकविताप्रेमकाव्यविनोदमौजमजा

दोन रुपक कविता

मित्रहो's picture
मित्रहो in जे न देखे रवी...
26 Jul 2018 - 8:20 pm

छत्री
ती रोज सोसते घोंघावनाऱ्या वाऱ्याचा मारा
ती हसत झेलते बरसनाऱ्या पावसाच्या धारा
कधीही, कुठेही, मी तिचीच मदत घेतो एका झटक्यात
घरात मात्र माझ्या मी तिला ठेवतो दूर एका कोपऱ्यात

माती
तो गडगडतो, आवाज करतो म्हणून मग मी घाबरतो
ती कडकडते, चमकते, म्हणून मी घरात लपून बसतो
ती देते हिरवळ, ती देते गंध, ती घेते मला कुशीत
पण साधा चिखल झाला म्हणून मी तिला लाथाडतो

कविता माझीकविता

आज हलके वाटले तर

कहर's picture
कहर in जे न देखे रवी...
17 Jul 2018 - 2:27 pm

आज हलके वाटले तर
चांदण्या तोलून धर

बोल.. पण नयनातुनी
उघडू नको देऊ अधर

उजळुनी हे विश्व अवघे
सावरिशी का पदर

होऊ दे गलका उसासा
मोकळे कर मूक स्वर

जीव घे हासून हलके
ओठ हेच धनु नि शर

ने कुशीतून कालडोही
गुदमरूदे रात्रभर

बरस आता अंतरातुनी
हो पुरी सारी कसर

व्यापूनिया ये तमासम
गात्र गात्र नि शांत कर

चांदण्या तोलून धर

कविता माझीशृंगारकविताप्रेमकाव्यगझल

असाव कोणीतरी

तृप्ति २३'s picture
तृप्ति २३ in जे न देखे रवी...
8 Jul 2018 - 4:02 pm

आयुष्यात कोणाची तरी साथ असणं खूप गरजेचं असत म्हणून कोणीतरी आपल्यासोबत कायम असाव त्याच वर्णन मी या कवितेत केल आहे. तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू शकता. https://www.truptiskavita.com

अभय-काव्यकविता माझीप्रेम कवितामाझी कविताकविताप्रेमकाव्य

वाया गेलेली कविता

कहर's picture
कहर in जे न देखे रवी...
28 Jun 2018 - 2:00 pm

प्रहर चालला तो दुपारचा
त्यातून घन आलेले दाटून
दमट जराशी हवा पसरली
लपाछपी खेळतसे ऊन

दूर कुठे तो बसून रावा
घालीत होता किर किर शीळ
उदास होते आयुष्य झाले
सरता सरेना आजची वेळ

अशाच वेळी बसून एकटा
हळूच असे तो निरखत तिजला
एक भेंडोळे एक लेखणी
होता हाती घेऊन बसला

काही अंतरावर ती होती
घागर बुडवीत पाण्यामध्ये
रेखीव काया लवचिक बांधा
वर्ण गोमटा कपडे साधे

तिला ना होती जाणीव त्याची
गुणगुणतसे आपल्या तंद्रीत
आडोशास तो बसला होता
काही खोडीत काही लिहीत

कविता माझीकाहीच्या काही कविताप्रेम कवितामाझी कवितामुक्त कविताकविताप्रेमकाव्य

युगधंर

Patil 00's picture
Patil 00 in जे न देखे रवी...
25 Jun 2018 - 12:24 am

युगधंर-कविता-
रास रंगे गोपिकांसवे
गोपाळा कृष्ण कान्हा
धन्य धन्य ती मथुरा
पावा वाजवीतो कान्हा

गाई चारीशी वनावनात
संगे तुझ्या सुदामा
गोपिकांसवे खेळखेळता
तू युगधंर मी सुदामा

दह्या दुधाचे हांडे
रचवीशी तू एकक
अडवूनी गोपिकांचे
खोड्या तुझ्या अनेक

तुझ्यासवे खुशीत साऱ्या
सदैव मोहवी त्यांना
युगधंर तू युगायुगांचा
हवाहवासा असे त्यांना

हाती घेऊन सुदर्शन
धडा शिकवी गुन्हेगारास
तरी शंभर आकडे मोजुन
करशी सावध अन्यायास

कविता माझीकविता

कितीसा पुरोगामी आहेस ?

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
19 Jun 2018 - 9:58 am

(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी)

कमिटेड टू हूम
कमिटेड टू व्हॉट

पुरोगामी पुरोगामी
कितीसा पुरोगामी आहेस ?

तुझ्यासाठी
आपले कुणीच नाही

तूला तू त्यांचा आहेस असे वाटते
तेही फसवे नसते का ?

आपल्यातल्या आपल्यांचा
होऊ शकला नाहीस

त्यांचाही होऊन रहाणे
खरेच जमेल का तूला ?

आणि तूही कुणाचाच नाहीस
हेच खरे नसते का ?

त्यागी आहेस
हे बरे आहे एका अर्थाने

आपल्या अंगच्या वस्त्रांचाही
त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे
जंगलात जाऊन कायमचा
एकांतवास अनुभवून पहाशील का ?

dive aagareggsgholmiss you!अनर्थशास्त्रअभंगअविश्वसनीयआता मला वाटते भितीकखगकविता माझीकालगंगाकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलभावकविताभूछत्रीमार्गदर्शनमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.वाङ्मयशेतीविठ्ठलमुक्तकमराठी पाककृतीव्यक्तिचित्रणगुंतवणूकचित्रपटस्थिरचित्र