(जगणं फक्त निमित्तमात्र)
मग पुढे असं होतं की ..
वाचण्यामधलं स्वारस्य विरत जातं.
फडताळी पुस्तक, नवकोरं घडी न मोडता जागीच राहतं.
वर्तमानपत्र फक्त हातचाळा उरतं.. बरेचदा न वाचताच आपसूक शिळं होतं
पुस्तकांच्या आठवणी,आठवणीतली पुस्तकं होतात विसरायला..
आणि आभासी जग लागतं बागडायला
याला ठेंगा त्याला ईंगा लागतात साठवायला..
स्वत्व लागतं आकसायला..
असं होऊ नये म्हणून भिडायचंच आयुष्याला..
चढ उतार हे निमित्तमात्र..