दो डोळ्यांचे....
दो डोळ्यांचे झरते पाणी इथून मजला स्पष्ट दिसे
त्या पाण्याच्या आवेगावर ओठावरले गीत फिरे
डोळ्यांमधल्या रेषा तांबूस पूरी सांगते व्यथा खरी
सांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी
गदगद्णारे हृदय राजसा तुझा पोचतो इथे हुंदका
पाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला
सहवासाचे अत्तर नाही तरी मिठीचा भास कोवळा
इथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा
-शिवकन्या