मरण
काळाच्या उंबरठ्यावर
अस्पृश्य सावली हलते.
श्वासांच्या झुळूकेसरशी
प्राणज्योत मिणमिणते.
साऱ्यांच्या अधरांवरती
तुझ्या रूपाची नावे.
हा प्रवास अटळ माझा
नि मागे पडती गावे.
इवल्याशा ज्योतीचा
विझून भडका झाला.
जो इथवर घेऊन आला
तो क्षणात परका झाला.
-कौस्तुभ