प्राणप्रिये

डॉ.अमित गुंजाळ's picture
डॉ.अमित गुंजाळ in जे न देखे रवी...
9 Sep 2020 - 1:08 am

प्राणप्रिये,
सात फेरे घेऊन जीवनात माझ्या आलीस ,
अन अंगणातील तुळस झालीस तू.
हसून खेळून सुखी संसाराची स्वप्ने रंगवतेस,
अन मला समाधानाचा गारवा देतेस तू.
प्राणप्रिये,
अंधाराच्या जाळ्यामध्ये ही प्रकाशाची फुंकर घालतेस,
अन प्रितीच्या वाऱ्यावर झोका झुलवतेस तू.
जिद्दीने उंच उंच भरारी घेण्यास शिकवतेस,
अन मनाच्या गाभऱ्याचे दरवाजे उघडतेस तू.
प्राणप्रिये,
सहजीवनात आधार देऊन साथ निभावलीस,
अन माझ्या घरची परसबाग झालीस तू.
सुख दुःखाच्या प्रत्येक गोष्टीत भागीदारी केलीस,
अन जीवन माझे रोशन केलेस तू.
प्राणप्रिये,
अमाप प्रेम करून वर्षोनुवर्षे संगत केलीस ,
अशीच या पूढेही करशील ना तू.
जन्मोजन्मी एकत्र राहण्याची तू शपथ घेतलिस,
देतो ग्वाही मी पण , संग राहू मी आणि तू.
प्राणप्रिये,
संग राहू मी आणि तू,
संग राहू मी आणि तू.

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

रंगीला रतन's picture

28 Apr 2021 - 3:34 pm | रंगीला रतन

अमाप प्रेम करून वर्षोनुवर्षे संगत केलीस ,
तर मग
अशीच या पूढेही करशील ना तू.
असा प्रश्न तिला का विचारावा बरे? अविश्वास की संशय?

गॉडजिला's picture

1 May 2021 - 2:14 pm | गॉडजिला

ख्या: ख्या: ख्या:

इतकी वर्षे संसार करून जीवन रोशन केले, संसारात समाधानाचा गारवा आणला तरी शेवटी परसबागच झाली, आल्या आल्या दिसणारी, मन प्रसन्न करणारी पुढच्या अंगणीची फुलबाग का नाही?

तुषार काळभोर's picture

30 Apr 2021 - 10:12 pm | तुषार काळभोर

बायकोवर केलेलं इतकं प्रेमळ, उत्कट, मनस्वी काव्य मिपावर पहिल्यांदा वाचलंय.

रंगीला रतन's picture

30 Apr 2021 - 11:01 pm | रंगीला रतन

+३००४२०२१
:)

तुम अगर साथ देने का वादा करो मै यूंही मस्त नगमे लुटाता रहूं...
हम तुम युग युग से ये गीत मिलन का गाते रहेंगे ...
वादा करले साजना ... न होंगे जुदा ये वादा रहा.
वगैरे गाणी आठवली. परसबाग च्या ऐवजी 'तुळशीबाग' कसे वाटेल ? "अंगणातील तुळस झालीस तू" असे सांगितलेच आहे म्हणून वाटले. नसेल चांगले वाटत तर जाऊ द्या. परसबाग तर परसबाग.
... आणि हो. भा. रा. तांब्यांची "सहज तुझी हालचाल मंत्रे जणु मोहिते" ही कविता पण या निमित्ताने आठवली.