मुक्त
आभाळातून बरसून ही
पानावरच्या दवासम अस्तित्व
मिसळायच नाही वाहायच नाही..
अनाहूतपणे भेटून ही
स्वप्नांचा कापसासम स्पर्श
बांधून नाही हूरहूर नाही..
भेटीची ओढ असूनही
अनवट वाटेसम गूढ
टाळणार नाही विसरणार नाही..
आभाळातून बरसून ही
पानावरच्या दवासम अस्तित्व
मिसळायच नाही वाहायच नाही..
अनाहूतपणे भेटून ही
स्वप्नांचा कापसासम स्पर्श
बांधून नाही हूरहूर नाही..
भेटीची ओढ असूनही
अनवट वाटेसम गूढ
टाळणार नाही विसरणार नाही..
तुझ्या डोळ्यांचे
काजळ मी आहे
मला जरासे तू
लावून घे ना
तीट म्हणूनी गालावरती
फुलबागेमधले
मी फूल सुगंधी
मला जरासे तू
माळून घे ना
तुझ्या तिमिरी केसांवरती
मी एक गाणे
युगल, प्रितीचे
मला जरासे तू
गाऊन घे ना
चांदणवर्षावातल्या राती
तुझा मी होईन
पदर भिरभिरता
मला जरासे तू
लपेटून घे ना
तुझ्या शहारत्या अंगाभोवती
काहीही होतो
तुझ्या आवडीचे
मला जरासे तू
सांगून बघ ना
उभा मी तुझ्याच वाटेवरती
- संदीप चांदणे
शुभेच्छा देतो की मस्करी करतो? : नागपुरी तडका
सुख-समृद्धीच्या देतो शुभेच्छा
की तू करतो मस्करी?
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?
सायबीन सवंगाचं काम
बिलकुल नाही पडलं
चकरभुंग्यापायी पीक
खुमसूखुमसू रडलं
घरी धन आणासाठी
करु का रे गांजा-तस्करी?
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?
औंदाच्या पावसापायी
भलतंच ईपरीत घडलं
कापसाचं अख्खं बोंड
बुडापासून सडलं
आता काय तुह्याच घरी
म्या करावी का चोरी?
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?
- डॉ. सुधीर रा. देवरे
अनादी काळापासून
सरपटत चाललोय मी
प्रचंड अस्ताव्यस्त पसारा घेऊन
माझी लांबी रुंदी उंची
मोजता येत नाही मलाच
अंगाखांद्यांवर वाढणार्या
असंख्य जीव जंतूंचं
संगोपन करत
कुठून निघालो
नि कुठं संपणार
हा आदिम चिंतनाचा प्रवास
माहीत नाही
माहीत नाही कोणत्या देशी येऊन मी थांबले,
ना ओळख या पाऊल वाटांशी, ना इथल्या संकेतस्थळाशी
पण पाऊसात माञ ओळखीचा गंध परिमळे
ना सोबती कुणी माझ्या, ना मी कोणाची सोबती
पुसत सारया दिशांना, कापत अंतरातले अंतर
स्वतः च्या दिशेने स्वतः ला दिशा देत चालले
गाफिल राहिली माझ्यातली कविता माझ्यामध्येच,
अन माझेच शब्द आता मला ओळखेनासे झाले
डोहातल्या चांदण्यापर्यत मौन माझे पोहचले
सारे शब्द अलगद तुझ्या ओंजळीत येऊन ओसरले
-प्राजक्ता
( मी इथे नवीन आहे, आणि ही पाहिलीच पोस्ट आहे , काही चुकलं तर माफ करा)
प्राणप्रिये,
सात फेरे घेऊन जीवनात माझ्या आलीस ,
अन अंगणातील तुळस झालीस तू.
हसून खेळून सुखी संसाराची स्वप्ने रंगवतेस,
अन मला समाधानाचा गारवा देतेस तू.
प्राणप्रिये,
अंधाराच्या जाळ्यामध्ये ही प्रकाशाची फुंकर घालतेस,
अन प्रितीच्या वाऱ्यावर झोका झुलवतेस तू.
जिद्दीने उंच उंच भरारी घेण्यास शिकवतेस,
अन मनाच्या गाभऱ्याचे दरवाजे उघडतेस तू.
प्राणप्रिये,
सहजीवनात आधार देऊन साथ निभावलीस,
अन माझ्या घरची परसबाग झालीस तू.
सुख दुःखाच्या प्रत्येक गोष्टीत भागीदारी केलीस,
कोविडमुळे नाक-शिंकर-प्राणायाम करताना आठवतं काहीबाही..
'शिंच्या येणारे, तंबाखू चुना आण 'आऽआऽऽआऽऽआक्षीऽऽऽऽऽ' गाय-छाप!
पितळेच्या तबकात पोपटी हिरवी पाने मांडताना
नाकपुडीतनं नसं ओढलेला हात शिकंर-नाकासहीत
धोतराला पुसतं आजोबा आवाज द्यायचे.
बरेचसे इतर आजोबा पुजाअर्चात रमायचे
पण हे मात्र
सुपारीची खांड फोडतानाचा घोळक्यासह
मास्तर पैसे लावून रम्मी खेळतात म्हणूनशान
विद्यार्थ्याने चालवलेल्या छोट्याश्या
गावातल्या पेप्रातपण यायचे
नि:संग उदासीन नभ हे
धरतीला भिडते जेथे
त्या धूसर क्षितिजावरती
अस्फुट काही खुणवीते
मरुभूमीतुनी जडाच्या
चैतन्य जिथे लसलसते
त्या अद्भुत सीमेवरती
अस्फुट काही खुणवीते
शब्दांच्या निबिड अरण्यी
अर्थाचे बंधन नुरते
त्या अपार मुक्तीमध्ये
अस्फुट काही खुणवीते
केवळ कविता लिहुन वाचून ऐकुन कोरोना पळत नसतो
कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ?
घर पुन्हा एकदा सॅनिटाईज होईल, अमिताभ बरा होईल
तरीही प्रश्न शिल्लक रहातो
सगळे नोकर चाकर व्यवस्था असून
कोरोना अमिताभ पर्यंत कसा पोहोचतो ?
प्रत्येक स्पर्शित जागा सॅनिटाईज व्हायला हवी
प्रत्येक स्पर्ष सॅनिटाईज असायला हवा
प्रत्येक माणूस दूर उभा रहायला हवा
प्रत्येकाच्या नाकतोंडावर मास्क असायला हवा
कुणितरी कुठेतरी गलथानपणा करतो
अन्यथा कोरोना अमिताभपर्यंत कसा पोहोचतो ?
दोघांत सांडलेला अंधार मी गिळालो.
चंद्रास वाहिलेल्या रात्रीस मी मिळालो.
काळीज फाटले तेव्हा आसवे गळाली.
हा काळ त्या स्मृतींचा सोडून मी पळालो.
पाऊस वाजताना पाण्यात मी भिजावे.
तेव्हाच वाटलेले वाहून दु:ख जावे.
अस्तित्व सांधताना अंधारली निळाई.
विश्रब्ध वेदनांच्या ओघात मी जळालो.
माझ्याच भावनांना माझाच स्पर्श झाला.
संदिग्ध जाणिवांचा आकांत फार झाला.
हे फोल खेळ सारे प्रारब्ध झाकण्याचे.
स्वप्नांध प्राक्तनांना मोडून मी निघालो.
-कौस्तुभ
वृत्त- आनंदकंद