हाक........
देवा, मारु कशी रे तुजला हाक...
किती संबोधने कामी आली..
मम प्रतिभाही इथे निमाली..
तरी म्हणसी मजला तू रे..
अजुनी करुणा भाक...
ईश्वरा, मारु कशी रे तुजला हाक..
संग तुझा नित मजला असुनी..
कधी वाटते एकाकी मी..
पसरुनी बाहु पुन्हा मागते..
तुझीच केवळ साथ..
प्रभो, मारु कशी रे तुजला हाक..
आयुष्याच्या अवघड वळणी..
देवदूताची साथ घेऊनी..
पुढती आले कशीबशी मी..
संमुख आहे ही वैतरणी..
गाठू कसा रे काठ..
कृष्णा, मारु कशी रे तुजला हाक..
गुरुरायांनी धरुनी मम कर..
अश्रू पुसुनी दिधला मज धीर..
प्रेमभरे दाखविली त्यांनी..
नामाची ही वाट..
अनंता, मारु कशी रे तुजला हाक...
क्षणभंगुर हे मनुष्य जीवन..
निःशेष जळो हे माझे "मी"पण..
हृदयी धरुनी तुझीच शिकवण..
तरुनी जावो क्रोधादिंचे..
अवघड डोंगर घाट...
माधवा, मारु कशी रे तुजला हाक..
जयगंधा....
३-७-२०१४.
प्रतिक्रिया
27 Apr 2021 - 3:47 pm | रंगीला रतन
क्षणभंगुर हे मनुष्य जीवन..
निःशेष जळो हे माझे "मी"पण..
हृदयी धरुनी तुझीच शिकवण..
तरुनी जावो क्रोधादिंचे..
अवघड डोंगर घाट...
झकास!