शोध
लेखनविषय:
काव्यरस
माहीत नाही कोणत्या देशी येऊन मी थांबले,
ना ओळख या पाऊल वाटांशी, ना इथल्या संकेतस्थळाशी
पण पाऊसात माञ ओळखीचा गंध परिमळे
ना सोबती कुणी माझ्या, ना मी कोणाची सोबती
पुसत सारया दिशांना, कापत अंतरातले अंतर
स्वतः च्या दिशेने स्वतः ला दिशा देत चालले
गाफिल राहिली माझ्यातली कविता माझ्यामध्येच,
अन माझेच शब्द आता मला ओळखेनासे झाले
डोहातल्या चांदण्यापर्यत मौन माझे पोहचले
सारे शब्द अलगद तुझ्या ओंजळीत येऊन ओसरले
-प्राजक्ता
( मी इथे नवीन आहे, आणि ही पाहिलीच पोस्ट आहे , काही चुकलं तर माफ करा)
वाचने
2271
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
माहीत नाही कोणत्या देशी येऊन
In reply to माहीत नाही कोणत्या देशी येऊन by चौथा कोनाडा
आभारी आहे
In reply to आभारी आहे by Prajakta Sarwade
व्वा, छनच ! +१