पावसा पावसा पड रे
पावसा पावसा पड रे
---------------------------------------------------
पावसा पावसा पड रे
लागू देत झड रे
पाऊस पडला संततधार
सगळं झालं हिरवंगार
रान सारे चिंब झाले
वाहू लागले नद्या नाले
पावसा पावसा पड रे
लागू देत झड रे
पावसा पावसा पड रे
---------------------------------------------------
पावसा पावसा पड रे
लागू देत झड रे
पाऊस पडला संततधार
सगळं झालं हिरवंगार
रान सारे चिंब झाले
वाहू लागले नद्या नाले
पावसा पावसा पड रे
लागू देत झड रे
खुशाल कोडगं व्हायचं
कशाला मनाला लावून घ्यायचं
मनाला लावून घेण्याने परिस्थिती
थोडीच बदलणार आहे
अवतीभवतीची माणसं
थोडीच बदलणार आहेत
कशाला पाहिजे हळवं संवेदनशील मन
लहान सहान गोष्टींनी चरे पाडून घ्यायला
ओरखडे पडायला
काय सुख मिळतं संवेदनशील मनाने
चार ओळी लिहिता येतात
पानभर खरडता येते... एवढंच
सरळ निर्लज्ज व्हायचं
सुखी रहायचं
अर्ध्या हळकुंडात पिवळं व्हायचं
ज्याचं खायचं त्याच्यावरच ऊडायचं
रूबाब करायला कमी नाही पडायचं
येता जाता पिंका टाकायच्या
माणुसकीच्या बाता मारायच्या
तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय –
डोळे न उघडता तुला पाहून आलेय
रस्ते ओलांडताना तुझा हात धरला आहे –
तुझा हात घामेजला आहे
मंदिरातले कासव ओलांडले आहे –
तुझ्या हातावर तीर्थ ठेवले आहे
दर्ग्यातल्या जाळीतून डोकावले आहे –
लोबानचा गंध दरवळत आहे
मिठाईच्या दुकानात इमरती घेतली आहे –
हात चिकट, तोंड गोड झाले आहे
भर बाजारात चिक्कीच्या बांगड्या घेतल्या आहेत –
तुझे डोळे चमकत आहेत
रसवंतीत पांढऱ्या मिशीचा रस प्याले आहे –
तुझा रुमाल पुढे, हसू मागे आहे
मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते....
माझे खळाळणारे हसू
अनुभवांच्या भोवऱ्यांतून तरून
सुशांत जलाशयातल्या
शांत स्मितासारखे
तुझ्या ओठांशी येऊन थांबेल......
मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते......
तुझ्या एवढी होईन तेव्हा
शब्दांची झोळी बाहेर खुंटीला टांगेन
अर्थाच्यामागे धावणे थांबेल आणि,
उंच झाडांच्या गहन जंगलातून
निवांत चालत तुझ्या डोळ्यांच्या
वाटेशी थांबेन .......
करू थोडा हट्ट, करू थोडी मस्ती
करू थोडा दंगा, लागली आहे सुट्टी
करू थोडा खेळ, बसला आता मेळ
करू थोडी मज्जा, लागली आहे सुट्टी
भावा सोबत दंगा, मामा सोबत पंगा
दादा सोबत कुस्ती, लागली आहे सुट्टी
दीदीची काढली खोड, कॉर्टूनला नाही तोड
जाईल सर्व सुस्ती, लागली आहे सुट्टी
आज्जी करते थाट, आजोबा म्हणतात माठ
मावशी सोबत गट्टी, लागली आहे सुट्टी
दिवस गेला छान, रात्रीने टाकली मान
खेळाला आत्ता बुट्टी, संपेल आत्ता सुट्टी
काल झोपता झोपता, वेळ बाराची आली.
आमच्या बालकानी काल, जरा लै(च) रात केली.
अडीच वाजता पुन्हा,बालकाला आली जाग
त्याला वाटलं,अंथ-ऋण नव्हे..ही तर बाग!
बागडू लागलं,खेळू लागलं,
माझ्या हिच्या अंगावरून,मुक्तपणे लोळू लागलं!
बरच खेळल्यावर मग, त्यालाही पेंग आली.
पण तोपर्यंत आमची ,पहाट लाले लाल झाली.
मेली झोप, मोडून अंगं!
मीच दिली मग, कोंबड्यासारखी बांगं!
अश्या अवस्थेत, उठून आवरायला,
झुलतच मी गेलो, टॉवेल धरायला!
धरला टॉवेल ओ-रडली ही,
मला म्हणते, "गाऊन सोडा...शीSssssss!"
कवित्व इथले संपत नाही
रोज गळवं ठणकत राहते
प्रोवक्ता अजुनही गातो
पाठशाळेत शिकवीली गिते
ते झरे भक्तीउमाळ्याचे
ती उधारीची भगवी माया
यांच्यात खपलो आपण
फुकां पुन्हा उगवाया
जोरात इंद्रिये अवघी
भुणभुणायची दुःख सैनिकांचे
आठवणार नाही आता
स्मरण त्यांच्या त्यागाचे
ती जळमटं मेंदुत विणलेली
आयुष्य कुरवाळायां गेली
बेरोजगारीच्या वनवासातील
अनस्थेशिया जणु उरलेला
बरे झाले मीराबिरा, राधागिधा तेव्हाच होऊन गेल्या....
मिनिटाला मेसेज, तासाला कॉल, हाऊ आर यूच्या
लिक़्विड जमान्यात
प्रेमबिम, हळवेबिळवे, मनात संगत
ओहो....ते काय असते आणि?
आठवण बिठवण वेड्यांचा बाजार...
एक कॉल मारायचा
नाहीतर मेसेज धाडायचा
बात करनेका मामला खतम.
मनात आठवण, झुरणे बिरणे
अरेरे, हाताबाहेरच्या केसेस...
डिजीटल डिजीटल फिजिकल फिजिकल
एवढेच काय ते रियल रियल
बाकी जग तो मृगजल मृगजल...
खरं सांगा तुम्हाला वाटतं की नाही
कुणीतरी आपल्यावर बेहद्द प्रेम करावं
तसे आयुष्यात भेटतात हजारो लोक
त्यात आपणही कुणाचं विश्व म्हणून जगावं
कुणाच्या नुसत्या कल्पनेने गुदगुल्या होतात का
कुणाच्या तरी आठवणी तुम्हालाही छळतात का
नसेल जाणवलं अगदीच तुम्हाला काहीही जरी
भरलेल्या डोळ्यातल्या भावना तरी कळतात का
कुणीतरी असेलच की तुमच्यासाठीही झुरणारं
तुमचे दुर्गुण माहित असूनही भरभरुन प्रेम करणारं
अशी आपली व्यक्ती मिळायला लागतं अपार भाग्य . . .
तुमच्यावर जो प्रेम करतो तोच तुमच्यासाठी योग्य !
विहीर खोदण्याचा विचार...
डोळ्यांतील उजेड कमीकमी होऊ लागला
हसण्यातील सच्चेपणा संपू लागला
तेव्हा मी विहीर खोदण्याचा विचार करू लागले....
जमिनीला भेगा, उन्हाच्या झळा
पाण्याची पातळी इतकी खोल
इतकी खोल....
कि आतला लाव्हाच दिसू लागला!
विहीर खोदल्यावर पाणीच लागेल
हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?
डोळ्यांतील उजेड संपताना, संपू द्यावा
उन्हात हसू हरवताना, हरवू द्यावे
दुष्काळात विहीर खणू नये
जमिनीला कष्ट देऊ नयेत .....
इतकेच काय पावसाचीही वाट पाहू नये