प्रेम...

Primary tabs

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
8 May 2019 - 11:53 am

खरं सांगा तुम्हाला वाटतं की नाही
कुणीतरी आपल्यावर बेहद्द प्रेम करावं
तसे आयुष्यात भेटतात हजारो लोक
त्यात आपणही कुणाचं विश्व म्हणून जगावं

कुणाच्या नुसत्या कल्पनेने गुदगुल्या होतात का
कुणाच्या तरी आठवणी तुम्हालाही छळतात का
नसेल जाणवलं अगदीच तुम्हाला काहीही जरी
भरलेल्या डोळ्यातल्या भावना तरी कळतात का

कुणीतरी असेलच की तुमच्यासाठीही झुरणारं
तुमचे दुर्गुण माहित असूनही भरभरुन प्रेम करणारं
अशी आपली व्यक्ती मिळायला लागतं अपार भाग्य . . .
तुमच्यावर जो प्रेम करतो तोच तुमच्यासाठी योग्य !

कविता माझीप्रेम कविताफ्री स्टाइलकविताप्रेमकाव्यमुक्तक

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

8 May 2019 - 5:07 pm | अभ्या..

वा वा वा वा वा वा वा
शेवटच्या ओळीत अजुन एखादा शब्द असता तर मस्त तिरपा तिरपा पॅटर्न तयार झाला असता.

चांदणे संदीप's picture

10 May 2019 - 8:57 am | चांदणे संदीप

दादानु, त्याचं कॉपीराईट दुसऱ्या मिपाकवीकडे आहे. ;)

Sandy

सोन्या बागलाणकर's picture

10 May 2019 - 6:26 am | सोन्या बागलाणकर

अशी आपली व्यक्ती मिळायला लागतं अपार भाग्य . . .

खरंय!