Skip to main content

विहीर खोदण्याचा विचार

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 03/05/2019 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
विहीर खोदण्याचा विचार... डोळ्यांतील उजेड कमीकमी होऊ लागला हसण्यातील सच्चेपणा संपू लागला तेव्हा मी विहीर खोदण्याचा विचार करू लागले.... जमिनीला भेगा, उन्हाच्या झळा पाण्याची पातळी इतकी खोल इतकी खोल.... कि आतला लाव्हाच दिसू लागला! विहीर खोदल्यावर पाणीच लागेल हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले? डोळ्यांतील उजेड संपताना, संपू द्यावा उन्हात हसू हरवताना, हरवू द्यावे दुष्काळात विहीर खणू नये जमिनीला कष्ट देऊ नयेत ..... इतकेच काय पावसाचीही वाट पाहू नये आता, डोळ्यातील क्षीण उजेडाला फसवू नये संपू पाहणाऱ्या हसण्याला धरून ठेवू नये..... विहीर खोदण्याचा विचार मात्र.....?? विचार काही माझ्या आधीन नाही...... -शिवकन्या

वाचने 8786
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

तहान लागल्यावर विहीर खोदणे यालाच म्हणत असावे पैजारबुवा,

कि आतला लाव्हाच दिसू लागला! विहीर खोदल्यावर पाणीच लागेल हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?

म्हातारपणावर आहे का हो कविता ? वय झाल्यावर जीवनरस संपत जाणारी कविता ?

खॅ खॅ खॅ विहीर नको पण पाऊस पडण्यापुर्वी जमीनीची नांगरट करावीच लागते ना? नांगरट खोल झाली तर जमीन भुसभूशीत होते. बी बियाणं चांगलं रुजते. वरून पाऊस असतोच दणकेबाज. मग पीकही चांगले जोमदार येते. आमची माती अन त्यांची झालेली माती. खॅ खॅ खॅ

चांगली आहे, पण काही तरी मिसींग वाटले. बाकी "धागा काढण्याचा विचार" असे विडंबन कोण लिहीतयं बघू. ;-)

खोल आहे.

जीवनरस शुष्क करणारे असे काही शब्द पाहून चटके बसले डोळ्यांना. घश्याला कोरड पाडणारी कविता !