कवित्व इथले संपत नाही

Primary tabs

mrcoolguynice's picture
mrcoolguynice in जे न देखे रवी...
30 May 2019 - 2:02 pm

कवित्व इथले संपत नाही
रोज गळवं ठणकत राहते
प्रोवक्ता अजुनही गातो
पाठशाळेत शिकवीली गिते

ते झरे भक्तीउमाळ्याचे
ती उधारीची भगवी माया
यांच्यात खपलो आपण
फुकां पुन्हा उगवाया

जोरात इंद्रिये अवघी
भुणभुणायची दुःख सैनिकांचे
आठवणार नाही आता
स्मरण त्यांच्या त्यागाचे

ती जळमटं मेंदुत विणलेली
आयुष्य कुरवाळायां गेली
बेरोजगारीच्या वनवासातील
अनस्थेशिया जणु उरलेला

कविता माझीविडंबन

प्रतिक्रिया

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

31 May 2019 - 2:08 pm | प्रलयनाथ गेंडास...

हे काय आहे ??

mrcoolguynice's picture

31 May 2019 - 2:21 pm | mrcoolguynice

नै समज़ल तर सोडुन दया.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jun 2019 - 3:11 pm | अत्रुप्त आत्मा

बुळुक बुळुक बुळुक!

मोक्ल्य दहि धिश चि आथ्वन आलि

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

4 Jun 2019 - 4:16 pm | प्रलयनाथ गेंडास...

आथ्वन आलि

ऑ अच्चं जालं तर् चामीजी

श्वेता२४'s picture

4 Jun 2019 - 3:17 pm | श्वेता२४

ही ग्रेस यांच्या कवितेचे विडंबन