कावळा..

Primary tabs

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
31 Jul 2019 - 12:17 pm

बैसला फांदीवरी हा चिंब भिजुनी कावळा
मेघांपरी आभाळीच्या, रंग त्याचा सावळा.

तीक्ष्ण त्याची नजर आणि बुद्धी तर तिच्याहुनी,
ना धजे कोणी म्हणाया पक्षी दिसतो बावळा.

व्यर्थ शोधी भक्ष्य अपुले, ना फळेही दृष्टीला
निवडले जे झाड त्याने ते निघावे आवळा?

कर्ण जरी नसती, शिरी...आर्त काही घुमतसे
थांबला जो थेंब नयनी, काक अश्रू सावळा?

या अशा ओल्या दिनी काय भरवावे पिलां
आजही नाही कुणाचा पिंड पुजला राऊळा?

( मीटरमध्ये खूप चुका आहेत. पण बिचा-या कावळ्यावरची बिचारी कविता.. मानून घ्या. :))

Nisargकविता माझीकाहीच्या काही कविताजिलबीकविता

प्रतिक्रिया

चांगलंय.. पण प्रयोजन समजले नाही. रूपक म्हणून तर नाही ना वापरले असा विचार मनाला चाटून गेला एवढंच! ;-)

प्राची अश्विनी's picture

4 Aug 2019 - 10:03 pm | प्राची अश्विनी

नाही, अगदी सहज.

इरामयी's picture

31 Jul 2019 - 3:11 pm | इरामयी

मानली. घेतली.

थोडीशी आवडली. थोडीशी गंडल्यासारखी वाटली.

"आवळा" केवळ यमकासाठी टाकल्यासारखा वाटतो. (काव्यनिर्मितीच्या वेळी "यमक" हे जर जाचक बंधन होत असेल तर ते झुगारून द्यायचं. मुक्तछंद सुद्धा छानच वाटतो.)

गोळाबेरीजः छान!

प्राची अश्विनी's picture

4 Aug 2019 - 10:04 pm | प्राची अश्विनी

हो. म्हणूनच आधीच माफी मागितली.:)