निळ्या-जांभळ्या
आभाळाखाली,
हिरव्यागार कुरणाच्या
लुसलुशीत गवतावर
निवांतपणे
पहुडलेला असताना,
पलीकडच्या,
ताटव्यातल्या फुलांवरून
एक नाजूकशी पाकोळी
उडतउडत
माझ्याकडे आली
आणि मला म्हणाली…
"बाबा, तू आज आपिशला ज्यावू नको,
आपण गार्डनमध्ये खेळायला ज्यावू"
- संदीप चांदणे (१०/०९/२०१८)
प्रतिक्रिया
10 Sep 2018 - 3:57 pm | अनन्त्_यात्री
ही कविता आठवली:
I didn't go to church today,
I trust the Lord to understand.
The surf was swirling blue and white,
The children swirling on the sand.
He knows, He knows how brief my stay,
How brief this spell of summer weather,
He knows when I am said and done
We'll have plenty of time together.
by Ogden Nash
10 Sep 2018 - 6:00 pm | अत्रुप्त आत्मा
आह्हा!
10 Sep 2018 - 6:06 pm | श्वेता२४
छानच
10 Sep 2018 - 8:49 pm | दुर्गविहारी
मस्तच ! एकदम गोड ! नाजुक पाकोळी आवडली आणि भावली. :-)
11 Sep 2018 - 8:37 am | प्रचेतस
अप्रतिम
7 Oct 2018 - 10:40 am | नाखु
अलबत्या गलबत्या पालक नाखु
7 Oct 2018 - 10:04 pm | यशोधरा
कसलं गोड!
8 Oct 2018 - 4:17 am | निशाचर
सुंदर!
8 Oct 2018 - 5:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त....!!
-दिलीप बिरुटे
10 Oct 2018 - 3:56 pm | सिरुसेरि
छान पाकोळी . बाकी , "बाबा, तू आज आपिशला ज्यावू नको, तुला वाघ खातो " हा लेखही छान होता .
10 Oct 2018 - 11:30 pm | चांदणे संदीप
ती मोठी मुलगी ही तिची धाकटी बहीण! :)
ही एकच गोष्ट त्या दोघीत कॉमन आहे. दोघींना माझ्या ऑफिसला जाण्यावर खूपच प्रॉब्लेम आहे. =))
Sandy