छकु

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
14 Nov 2018 - 12:10 pm

छकु

एकदा एक गंम्मत झाली....
माझी आईच शाळेत गेली.
प्रयोग वही अपूर्ण म्हणून... हातावर पट्टी देखील ख्खाली;
इंग्रजीच्या स्पेलिंगची; प्प्रॅक्टिस तिने नव्हतीच् केली...
सरांनी 'ढ़ढ्ढोबा' म्हणताच मात्र, हिरमुसली झाली!
'छकुला नाव सांगिन....' अस मनातच म्हणाली;
तेवढं म्हणून मग... माझ्यासारखीच खुश झाली.

'सारखा सारखा अभ्यास... मग खेळायचं कधी आम्ही?
तुम्ही मोठे झालात..... आमच्यासाठी काही?'
खूपसारं खेळून मग खूप खूप दमली;
घरी येऊन एकदम 'हुश' करुन बसली.

'भूक लागली ग खूप छकु... खायला काय आहे?
शूज काढून दे न....' म्हणे मी दमले आहे.
'अग तू आई नं... मग मी काय खायला देऊ?'
म्हंटलं...
शाळेत मिच जाईन... मला राहु दे फ़क्त छकु!

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

14 Nov 2018 - 12:13 pm | यशोधरा

किती गोड! :)

ज्योति अळवणी's picture

14 Nov 2018 - 12:52 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद यशोधरा जी

चांदणे संदीप's picture

14 Nov 2018 - 12:52 pm | चांदणे संदीप

छकुला छकुच राहू द्यावी. :)

Sandy

अनन्त्_यात्री's picture

14 Nov 2018 - 2:40 pm | अनन्त्_यात्री

"ढढ्ढोबा" शब्दाशी कितीतरी वर्षांनी पुनर्भेट झाली.

ज्योति अळवणी's picture

14 Nov 2018 - 3:57 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद चांदणे संदीप आणि अनंत यात्री

टर्मीनेटर's picture

20 Nov 2018 - 4:36 pm | टर्मीनेटर

एकतर 'छकु' हे नावच खूप क्युट आहे, आणि हि कविताही.

पिंट्याराव's picture

10 Dec 2018 - 7:11 pm | पिंट्याराव

छकूसारखीच निरागस कविता